राहुरी प्रतिनिधी : राहुरी खुर्द येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ कर्मचाऱ्यांच्या श्रीदत्त वसाहतीमधील एका घरात आज पहाटे साडेचार वाजता गॅ...
राहुरी प्रतिनिधी : राहुरी खुर्द येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ कर्मचाऱ्यांच्या श्रीदत्त वसाहतीमधील एका घरात आज पहाटे साडेचार वाजता गॅसच्या भरलेल्या सिलेंडरचा स्फोट झाला.यावेळी दत्त कृपा व नशीब बलवत्तर म्हणून कोणतीही जीवित हानी झाली नाही मात्र घरातील सर्व संसार उपयोगी वस्तू गाडी सायकल फ्रिज टीव्ही सोने नाणे रोख रक्कम महत्वाची कागदपत्रा सह लाखो रुपयाचे साहित्य जळून खाक झाले.
आज पहाटे 4.30वाजता कृषी विद्यापीठातील बी बियाणे विभागातील कृषी साहाय्यक अशोक आत्माराम पाटील हे विद्यापीठाच्या दत्त कॉलोनी मध्ये गेल्या दीड वर्षांपासून रहात असून आज पहाटे 4.30वाजता नित्य नियमानुसार उठले शेजारी असलेल्या दत्त मंदिरात पूजेला गेले होते.पण त्यांना घरात धूर दिसला.त्यांच्या पत्नीही उठल्या होत्या ते पाहुन त्यांनी मुलांना बाहेर काढले सर्व जण तात्काळ बाहेर पडल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. यावेळी घरी श्री पाटील ह्यांच्यासह त्यांची पत्नी 2मुले भाची पुतण्या असे 6जण होते. शेजारच्या घरात मुले झोपले होते.ज्या ठिकाणी भरलेल्या गॅस टाकीचा स्फ़ोट झाला तिथे घरात दोनच दिवसा पूर्वी डिलिव्हरी घेतलेली भरलेली टाकी फ्रिज कपाट इत्यादी वस्तू होत्या.व इलेक्ट्रॉनिक दुचाकी होती.अचानक स्फ़ोट झाल्याने एकेक वस्तूने पेट घेतला प्रचंड आवाज होताच आजूबाजूचे लोक धावून आले तातडीने वीज पुरवठा खंडित करण्यात आला राहुरी देवळाली नगरपालिकेचे अग्नी शामक दलाच्या गाड्या घटना स्थळी पोहचल्या.तो पर्यंत अनेक नागरिकांनी बादलीने पाणी मारून आग विझविण्याचा प्रयत्न केला पोलीस पाटील बबनराव अहिरे ह्यांनी तात्काळ पोलीस निरीक्षक हनुमंत गाडे तहसीलदार शेख ह्यांना फोन करुन घटनेची माहिती दिली.पण आग एवढी प्रचंड होती की आजूबाजूला राहणारे तात्काळ घरा बाहेर पडले सर्व जण साखर झोपेत होते.ह्या आगीत एका नवीन दुचाकीसह घरातील चारही खोल्यांमधील लाखो रुपयाच्या वस्तू, कपडे, किराणा, अन्नधान्य, महत्वाची कागदपत्रे व इतर सामानांची राखरांगोळी झाली.