बुलडाणा/पुरुषोत्तम बोर्डे : पारंपारिक पोशाख, दिंड्या, पताका आणि लोक वाद्यांच्या ठेक्यावर ताल धरीत साहित्यिकांनी आज फुगड्यांचा फे...
पारंपारिक पोशाख, दिंड्या, पताका आणि लोक वाद्यांच्या ठेक्यावर ताल धरीत साहित्यिकांनी आज फुगड्यांचा फेर धरला. नेताजी जागर साहित्य संमेलनामुळे साहित्यिकांच्या आनंदाला उधाण आले होते
. स्त्री शक्तीचा आदर्श ताराबाई शिंदे यांच्या माहेरातआणि कविवर्य भगवान ठग साहित्यनगरीत सकाळी आठ वाजता ग्रंथदिंडी निघाली.संगम चौक ते संमेलन स्थळ गर्दे सभागृहा पर्यंत
ग्रंथांची पालखी सारस्वतांनी खांद्यावरी वाहिली .पालखीमध्ये तुकोबाची गाथा ,ताराबाई शिंदे यांचे स्त्री पुरुष तुलना,
शेतकऱ्यांचा आसूड, महानायक आणि संविधाना सह इतर ग्रंथांचा समावेश होता. स्वातंत्र्याच्या पूर्वसंध्येला शहरात लागवड करण्यात आलेल्या वटवृक्षाचे पूजन सकाळी आठ वाजता करण्यात आले .कारंजा चौक येथे संमेलन आद्यक्ष विश्वास पाटील, संमेलनस्वागत अध्यक्ष डॉक्टर सुकेश झंवर , ॲड जयसिंग राजे , ॲड सतिशचंद्र रोठे, साहित्यिक नरेंद्र लांजेवार ,गणेश निकम,अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषदेचे प्रदेशाध्यक्ष तथा सेनि.इंजि.डि.टि.शिपणे,राज्य उपाध्यक्ष इंजि.अशोक भोसले,
शशिकांत इंगळे,जयश्रीताई शेळके नंदनि रिंढे ,विजयाताई काकडे,शाहीनताई पठाण, गायत्री सावजी, प्राध्यापक आनंत शिरसाठ ,सुनील सपकाळ ,राजेंद्र काळे, रणजीत सिंग राजपूत,अरुण जैन, चंद्रशेखर जोशी सुरेखाताई निकाळजे ,शाहीर हरिदास खांडेभराड ,जगदीश चंद्र पाटील ,राम हिंगे ,युवराज कापुरे, सुभाष देशमुख ,संजय एन्डोले,यांच्यासह मुरंबा धामणगाव बढे ,टाकळी विरो, नांद्राकोळी ,येथील भजनी मंडळ दिंडीत सहभागी झाले होते. मातृतिर्थ बुलढाणा जिल्हा मातृ शक्तीचा आदर्श आहे .जिजाऊंचा जिल्हा आहे. तसाच तो स्त्रीवादी लेखिका ताराबाईंचा जिल्हाआहे.बुलढाणा हे ताराबाईचे गाव असल्याने ताराबाईंना अभिवादन करण्यासाठी साहित्यिकांचा मेळा कारंजा चौक येथील त्यांच्या वाड्यावर पोहचले .या ठिकाणी ताराबाईंना अभिवादन करण्यात आले .नरेंद्र लांजेवार, सुरेश साबळे यांनी ताराबाईंना अभिवादन करून ग्रंथदिंडी संमेलनस्थळी पोहोचली. संमेलनस्थळी आजाद हिंद संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिंडीचे पुष्प उधळून स्वागत केले, आदेश कांडेकर ,संजय एन्डोले, सुभाष निकाळजे, सौ अनिता कापरे ,योगिता रोठे,कोकाटे काका आदींची उपस्थिती होती. नेताजी जागर साहित्य संमेलन प्रथमच बुलढाणा नगरी झाले. नेताजीच्या विचारांना अभिवादन करण्यासाठी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी कोणतीही कसूर ठेवली नाही. दिंड्या पताका नवोदित साहित्यिकांच्या भरगच्च उपस्थिती ने शहरात एकच साहित्यिक माहोल तयार झाला होता.