पुणे :लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीतील बोरकर मळा येथील पेट्रोल पंपावर धारदार कोयते आणि लाकडी दांडके घेऊन २८ डिसेंबर रोजी मध्यरात्री २ ते ...
पुणे :लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीतील बोरकर मळा येथील पेट्रोल पंपावर धारदार कोयते आणि लाकडी दांडके घेऊन २८ डिसेंबर रोजी मध्यरात्री २ ते ३ वाजण्याच्या सुमारास ५ अज्ञात व्यक्तींनी पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या कामगारांना मारून जीवे मारण्याची धमकी देऊन जबरी दरोडा टाकला होता. याप्रकरणी पोलिसांनी या गॅंग ला जेरबंद केले आहे. पेट्रोलपंपावर धाडसी दरोडा टाकून लूटमार करणारी आणि खाजगी टूर्स ट्रॅव्हल कार चालकाचा दृश्यम स्टाइल खून करणारी कोयता गॅग जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलीस पथकाने यश मिळवले आहे .
याप्रकरणी किरण भाऊसाहेब थिटे ( वय २१, रा. केंदूर ता. शिरूर जि. पुणे ), गौरव बाळू ढवळे ( वय २१, रा. खोपवस्ती, अष्टापुर ता. हवेली ), संतोष गोरख ब्राम्हणे ( वय २०, रा. शनि शिंगणापूर, ता. नेवासा जि. अहमदनगर ) भाऊसाहेब गौतम कुडुक ( वय २२, रा. शेकटा, ता.गेवराई जि. बीड ) व दक्षिणेस उर्फ दर्शन अनिल दांगट ( वय २१, रा उंब्रज, दांगट पट, ता. जुन्नर ) यांना अटक करण्यात आली आहे. या दरोड्यात २ हजार ५०० रुपये रोख व ३७ हजार रुपये किमतीचे २ मोबाईल असा एकूण ३९ हजार ५०० रुपयांचा माल चोरून नेला होता. या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक तपास करत होते. सीसीटिव्ही फुटेजवरून आरोपींचा माग काढला ते रांजणगाव गणपती येथील असल्याचे समजले. त्यावरून रांजणगाव ५ संशयित पोलिसांनी सापळा रचून ताब्यात घेतले.स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शिवाजी ननावरे, सहाय्यक फौजदार दत्तात्रय गिरमकर, पोलीस हवालदार उमाकांत कुंजीर, राजू मोमीन, जनार्दन शेळके, विजय कांचन, अजित भुजबळ, मंगेश थिगळे, धिरज जाधव, अक्षय नवले, समाधान नाईकनवरे यांच्या पथकाने ताब्यात घेतले.