$type=ticker$snippet=hide$cate=0

पुन्हा तोच वाद

राजकारणी आणि साहित्यिक यांच्या परस्पर संबंधाची चर्चा नेहमी होत असते. अनेक साहित्यिकांनी राजकीय क्षेत्र गाजविलं आहे. त्या वेळी राजकीय नेत्यां...



राजकारणी आणि साहित्यिक यांच्या परस्पर संबंधाची चर्चा नेहमी होत असते. अनेक साहित्यिकांनी राजकीय क्षेत्र गाजविलं आहे. त्या वेळी राजकीय नेत्यांनी साहित्यिकांना कधीच तुमचं या क्षेत्रात काम काय असं विचारलं नाही. राजकीय नेत्यांनी साहित्यिक झालं, तर मात्र तुमचं या क्षेत्रात काम काय, असं विचारलं जातं. ते सर्वस्वी चूक आहे. राजकारण्यांनी साहित्यिक क्षेत्रात हस्तक्षेप करू नये, ही अपेक्षा वावगी नाही; परंतु साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर राजकारण्यांनी येऊच नये, हा दुराग्रह झाला. उस्मानाबादच्या साहित्य संमेलनात अधिकारी व्यासपीठावर आणि राजकीय नेते मात्र समोरच्या रांगेत हे चित्र चांगलं नाही. सरकारकडून साहित्य संमेलनासाठी लाखो रुपयांचा निधी घ्यायचा आणि सरकारमधील मंत्र्यांना मात्र तिथं कस्पटासमान वागणूक द्यायची, हे बरोबर नाही. हस्तक्षेप आणि सन्मान यातला फरक कळला पाहिजे. साहित्य संमेलनात व्यासपीठावर कोण होतं, हा फार महत्त्वाचा मुद्दा नाही, तर तिथं कोणत्या गंभीर विषयावर चर्चा झाली, त्याचं सार काय, हे पाहिलं पाहिजे. साहित्यबाह्य कोणाही व्यक्तीला मुद्दाम मानपान देणं हे अनुचित आहे; परंतु राजकारणी वा अन्य कोणी व्यावसायिक साहित्यप्रेमी असेल तर त्याला संमेलनात स्थान असलंच पाहिजे. एक पथ्य जरूर पाळलं गेलं पाहिजे, की स्थानिक संयोजन समितीत राजकीय पुढार्‍याचा अथवा धनाढ्यांचा वरचष्मा असता कामा नये. राजकारण्यांनी साहित्य संमेलनात यावं की नाही, व्यासपीठ अडवावं की नाही, त्यांचा सहभाग असावा की नाही, असा वाद महाराष्ट्रातल्या बुद्धिमंतांनी अनेक वेळा केला. कराडच्या साहित्य संमेलनात, त्या संमेलनाचे स्वागताध्यक्ष असलेल्या यशवंतराव चव्हाण यांच्यासारख्यांना व्यासपीठावर बसूसुद्घा दिलं नाही. उस्मानाबादच्या साहित्य संमेलनात माजी मुख्यमंत्री, सांस्कृतिक मंत्री, आमदार, खासदार पुढच्या रांगेत आणि अधिकारी व्यासपीठावर असं चित्र दिसल्यानं राजकारण्यांचं स्वतंत्र साहित्य संमेलन भरवण्याची घोषणा करण्यात आली होती. नाशिकच्या साहित्य संमेलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा सहस्त्रचंद्रदर्शन सोहळा आयोजित करण्याचं घाटत होतं; परंतु साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी असं काहीही होणार नाही, असं सांगितलं. त्यातून वाद सुरू झाले; परंतु याच ठाले पाटलांना गेल्या वर्षी उस्मानाबादला झालेल्या साहित्य संमेलनाच्या वेळी आपण काय बोललो होतो, तेच आठवत नसावं. पवार आणि साहित्यिकांचे संबंध फार जुने आहेत. केवळ त्यांना साहित्यिकांची ओढ असते, असं नाही, तर त्यांनी लोक माझे सांगाती असं एक पुस्तकही लिहिलं आहे. गेल्या काही वर्षात हळूहळू साहित्यिकांचा अहंकार निवळले असले, तरी ठाले पाटलांसारख्यांमुळं तो अधूनमधून दिसतो आहे. राजकारण्यांच्या सहभागाबद्दल ज्या साहित्यिकांना रोष आहे, त्याला महत्त्व देऊ नये, इतकी स्पष्ट भूमिका प्रा. डॉ. सदानंद मोरे यांनी मांडली, हेही अतिशय चांगलं झालं.

राजकारणाच्या क्षेत्रात अनेक साहित्यिकांनी आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे आणि अशा साहित्यिक राजकारण्यांचा राजकारणातल्या मंडळींनी कमालीचा आदर केलेला आहे. यशवंतराव चव्हाण यांच्यासारखं उत्तुंग व्यक्तिमत्त्व थोर राजकारणी होतं. तेवढेच थोर साहित्यिकही होते; पण महाराष्ट्रातल्या साहित्यिकांनी यशवंतराव विविध उच्च पदांवर असताना त्यांना साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाला बोलावलं, स्वागताध्यक्ष म्हणूनही स्वीकारलं आणि समारोपसुद्घा यशवंतरावांच्या हस्ते करताना कोणाला खटकलं नाही; पण यशवंतरावांना साहित्य संमेलनाचं अध्यक्ष करण्यात आलं नाही. राजकारणात जे साहित्यिक शिरले, त्यातले महाराष्ट्र वाल्मिकी ग. दि. माडगुळकर, निसर्गकवी ना. धों. महानोर यांच्या गुणांची पारख करून यशवंतराव चव्हाणांनीच त्यांना विधान परिषदेत बसवलं. दुसरे महान साहित्यिक आचार्य अत्रे हे आपल्या कर्तृत्वानेच संयुक्त महाराष्ट्र लढयाचे नेते झाले आणि जनतेनंच त्यांना आपले लोकप्रतिनिधी म्हणून विधानसभेत पाठवले. नरुभाऊ लिमये हे साहित्यिक होते. पत्रकार होते आणि हाडाचे काँग्रेसवाले होते. वा. ब. गोगटे विधानपरिषदेतले विरोधी पक्ष नेते होते. त्या अगोदर ते स्वातंत्र्यलढ्यात क्रांतिकारी होते आणि साहित्यिकही होते. साहित्य महामंडळ पदाधिकारी अशा कितीही वल्गना करत असले, तरी राजकारण्यांच्या गळ्यात माळ घातल्याशिवाय संमेलन पूर्णच होऊ शकत नाही, हेच नाशिकच्या संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी छगन भुजबळ यांची निवड करून त्यांनी दाखवून दिलं आहे. उपाध्यक्षपदी कृषिमंत्री दादा भुसे, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, गोएसोचे सर्वेसर्वा मो. स. गोसावी आणि डॉ. प्रशांत पाटील यांची निवड करण्यात आली आहे, तर संमेलनाच्या कार्याध्यक्षपदीही राष्ट्रवादी काँग्रेसचे कोषाध्यक्ष आमदार हेमंत टकले आणि समिती समन्वयक म्हणूनही राष्ट्रवादी काँग्रेसचे सहकोषाध्यक्ष विश्‍वास ठाकूर यांची नियुक्ती करण्यात आली. संमेलनाच्या नियोजनात सुरुवातीपासूनच राष्ट्रवादीच्या नेत्यांचा भरणा आहे. संमेलनात राजकारण्यांचा भरणा नको, असं कितीही म्हणत असलं, ती ओठावर एक आणि कृतीत एक असंच साहित्य महामंडळ आणि आयोजकांचं सुरू आहे. संमेलनासाठी दोन समित्या जाहीर करण्यात आल्या. त्यात मार्गदर्शक समितीत शहराचे महापौर, उपमहापौर, जिल्ह्यातील दोन्ही खासदार, सगळे आमदार, जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष यांच्यासह स्थायी समिती सभापती, सभागृह नेते, महापालिकेतील विरोधी पक्षनेते, सर्व पक्षांचे गटनेते यांचाच भरणा आहे. त्यात शहरातील एकाही वरिष्ठ वा प्रतिष्ठितांचं नाव दिसत नाही. तसंच सल्लागार समितीतही महसूल आयुक्त, महापालिकेचे आयुक्त, पोलिस आयुक्त, मुख्य कार्यकारी अधिकारी, मुक्त विद्यापीठ आणि आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू यांना घेण्यात आलं आहे. शहरातील इतर कुणालाही या समितीतही स्थान देण्यात आलेलं नाही.

नाशिकमध्ये साहित्यिकांचा मेळावा भरवत या माध्यमातून शरद पवार यांनाही सहस्त्रचंद्रदर्शनाची खास भेट देण्याचा लोकहितवादी मंडळाचा मानस असल्याची चर्चा आहे. ठाले पाटील यांनी मात्र सहस्त्रचंद्रदर्शन वगैरे चर्चा आहे; मात्र तसा प्रस्ताव आल्यास आम्ही परवानगी देणार नाही. तसंच ज्यांचा काही रोल नाही अशा राजकीय लोकांना व्यासपीठावर घेतलं जाणार नाही. उद्घाटक पण राजकीय व्यक्ती नसतील लेखक असतील, असं त्यांनी सांगितलं आहे. संमेलनाचं नियोजन सुरू असतानाच ठाले पाटलांच्या या वक्तव्यामुळं संमेलनाचे आयोजक लोकहितवादी मंडळाची मोठी अडचण झाली. कारण आयोजक मंडळाचे विश्‍वस्त आणि नाशकात होणार्‍या संमेलनाचे कार्याध्यक्ष हेमंत टकले हे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते तर आहेत. यासोबतच ते पवार यांचे निकटवर्तीय आहेत. त्यातच आता सरकारही महाविकास आघाडीचे असल्यानं टकले यांनी पत्रकार परिषद बोलवत राजकीय व्यक्तींना व्यासपीठावर बोलवावंच लागेल असं स्पष्ट केलं. कुठल्याही राजकीय व्यक्तीला आम्ही बोलावणार नाही असं ठाले पाटील जरी म्हणत असले, तरी संमेलनाला शासनाकडून अनुदान मिळतं. इतर मदत मिळते. त्यामुळे आम्हाला मंत्री नेते यांना बोलवावचं लागेल, साहित्य महामंडळाने आखून दिलेली सगळी चौकट आम्ही पाळू, असं टकले यांनी सांगून अप्रत्यक्ष ठाले पाटलांना शह दिला. एकंदरीतच काय तर नेहमीप्रमाणं यंदाही साहित्य संमेलनाच्या पार्श्‍वभूमीवर वादाला ठिणगी पडली आहे आणि याला कारण मात्र एकच आहे ते म्हणजे राजकारण. मुळात साहित्य संमेलनात होणार्‍या राजकीय हस्तक्षेपावर आजवर अनेक साहित्यिकांनी सडकून टीका केली आहे; मात्र त्याचा कुठलाही परिणाम होत नसून यंदा महाविकास आघाडीच्या काळात होणार्‍या संमेलनातही हीच बाब स्पष्टपणे दिसून येईल यात काही शंका नाही. आता फक्त साहित्यिकांपेक्षा राजकारण्यांचीच उपस्थिती संमेलनात जास्त दिसू नये, ही अपेक्षा काही जणांनी व्यक्त केली आहे. 

Name

] ब्रेकिंग,1,] ब्रेकिंग,876,Agralekh,3,baramati,2,desh,2,IPL 2020,19,kolhapur,8,Latest News,5971,letest News,603,Loksabha delhi,1,Loksabha-2019,164,Maharashtra,401,Maharashtra.,5,Mumbai,42,New Window,210,News,321,sangli,82,satara,295,satara.,7,solapur,2,solapur pandharpur,1,updates,453,Videsh,2,Vishesh,2,अर्थ,206,अहमदनगर,10907,औरंगाबाद,380,क्रीडा,681,दखल,749,देश,4614,नाशिक,829,पुणे,860,बीड,1449,बुलडाणा,41,बुलढाणा,878,ब्रेकिंग,17566,ब्रेकिंग न्युज,120,ब्रेकिंग महाराष्ट्र,1,मनोरंजन,176,महाराष्ट्र,14890,महाराष्ट्र सातारा,44,मुंबई,4205,विदेश,665,संपादकी,2,संपादकीय,1644,सातारा,3219,
ltr
item
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: पुन्हा तोच वाद
पुन्हा तोच वाद
https://1.bp.blogspot.com/-F_-8-moTa78/YBKvfDs1N3I/AAAAAAABnrI/QQkc7G1IStQkAwWj5bfQcJdMnuysUxT9wCLcBGAsYHQ/s0/download.jpg
https://1.bp.blogspot.com/-F_-8-moTa78/YBKvfDs1N3I/AAAAAAABnrI/QQkc7G1IStQkAwWj5bfQcJdMnuysUxT9wCLcBGAsYHQ/s72-c/download.jpg
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates
https://www.lokmanthan.com/2021/01/blog-post_793.html
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/2021/01/blog-post_793.html
true
1708963956808886337
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content