लखनऊः उत्तर प्रदेशच्या दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) आज टेरर फंडिंग व रोहिंग्या प्रकरणी उत्तर प्रदेशमधील पाच जिल्ह्यांमध्ये छापेमारी केली. आ...
लखनऊः उत्तर प्रदेशच्या दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) आज टेरर फंडिंग व रोहिंग्या प्रकरणी उत्तर प्रदेशमधील पाच जिल्ह्यांमध्ये छापेमारी केली. आज सकाळपासून एटीएसच्या पथकाकडून गोरखपूर, खलीलाबाद व अलिगढसह पाज जिल्ह्यांमध्ये छापे टाकले. प्राप्त माहितीनुसार आतापर्यंत सहा संशयितांना या प्रकरणी ताब्यात घेण्यात आले असून, सर्वांची चौकशी सुरू आहे. उत्तर प्रदेश एटीएसची एक तुकडी मुंबईतदेखील शोधमोहीम राबवत आहे, त्यांना महाराष्ट्र एटीएसचे पथक मदत करत आहे. संतकबीरनगरमध्ये लखनऊ एटीएसच्या पथकाने खलीलबाद ब्लॉकमध्ये तैनात एका तांत्रिक सहायकास ताब्यात घेतले आहे. याशिवाय अन्य तिघांनादेखील ताब्यात घेण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. तांत्रिक सहायकास मोतीनगर मोहल्ला येथून ताब्यात घेण्यात आले आहे. काहीजण खोटे पासपोर्ट तयार करण्याप्रकरणी तर काहीजण टेरर फंडिंग प्रकरणी ताब्यात घेण्यात आले आहे.