अहमदनगर : जिल्हयातील सर्व महाविद्यालयांचे प्राचार्य व सदर महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेतलेल्या अनुसूचित जाती, विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर ...
अहमदनगर : जिल्हयातील सर्व महाविद्यालयांचे प्राचार्य व सदर महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेतलेल्या अनुसूचित जाती, विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना कळविण्यात येते की, सन 2020-21 या शैक्षिणिक वर्षात प्रवेशीत मागासवर्गीय प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, शिक्षण फी परिक्षा फी योजनेचे अर्ज भरण्याकरीता महाडिबीटी पोर्टल दिनांक 03 डिसेंबर 2020 पासुन सुरु झालेले आहे.
त्यानुषंगाने अनुसूचित जाती, विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी नुतनीकरणाकरिता दिनांक 15 जानेवारी 2021 तर नव्याने प्रवेशीतांकरिता दिनांक 30 जानेवारी 2021 या अंतिम मुदतीच्या आत महाडिबीटी ऑनर्लान पध्दतीने अर्ज भरावेत, तसेच महाविद्यालयांनी पडताळणी करुन परिपूर्ण, पात्र अर्ज जिल्हा लॉगीनला विहीत मुदतीत ऑनलाईन पध्दतीने पाठवावेत. असे राधाकिसन देवढे, सहायक आयुक्त, समाज कल्याण, अहमदनगर यांनी एका पत्रकान्वये कळविले आहे.