शेवगाव : तालुक्यात घरफोड्या, रस्तेलुट, जबरी चोऱ्या, खून, मर्डर दरोडेची मालिका सुरूच . शेवगाव तालुक्यातील होणाऱ्या गुन्हेगारीत वाढ. शेवगाव शह...
शेवगाव : तालुक्यात घरफोड्या, रस्तेलुट, जबरी चोऱ्या, खून, मर्डर दरोडेची मालिका सुरूच . शेवगाव तालुक्यातील होणाऱ्या गुन्हेगारीत वाढ. शेवगाव शहरातील तहसील कार्यलयजवळ असलेल्या आयटीआय शेजारील मोकळ्या जागेत एका अंदाजे ६० ते ६५ वर्षीय महिलेचा मृतदेह तसेच त्यांच्या काही अंतरावर एका १० ते १५ वर्षाच्या मुलाचाही मृतदेह आढळून आला. यातील विशेष म्हणजे या घटनेतील महिलेचे मृतदेहाचे मुंडकेच नसल्याचे आढळल्याने शेवगाव तालुक्यात भीतीचे वातावरण पसरले आहे. तसेच मुंडके नसलेला महिलेचा व लहान मुलाचा मृतदेह आढळून आल्याने शहरासह तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.