राजूर प्रतिनिधी : आमच्या आज्या पंजाने त्यांच्या नंतर आई बापाने ही असच आयुष्य काढलं, आम्ही पण असच काढायच का? हा प्रश्न या निरागस मुलांना पाहू...
राजूर प्रतिनिधी : आमच्या आज्या पंजाने त्यांच्या नंतर आई बापाने ही असच आयुष्य काढलं, आम्ही पण असच काढायच का? हा प्रश्न या निरागस मुलांना पाहून पडतो. ज्या वयात मुलांनी शिक्षण घेऊन स्वतः च आयुष्य आणि भविष्य यांचा विचार करायचा असतो, त्या वयात यांना डोक्यावर दोन दोन हंडे घेऊन आपल्या लहान भावाला सांभाळत घरात पाणी भरायचं.
सरकारला भंडारदरा धरणातून आवर्तन देत सर्व जिल्ह्याला पाणी पुरवण्यासाठी जमतंय. पण ज्या आदिवासींच्या जमिनी त्या धरणांमध्ये गेल्यात त्या धरणातील पाणी त्यांच्या गावापर्यंत पोहोच करायला जमत नाही. भोळा आदिवासी समाज मागणी करत नाही, म्हणजे त्यांना पाणीच लागत नाही असा सगळ्यांचा गोड गैरसमज आहे. कित्येक आदिवासी गावांच्या जवळ भांडारदरा धरण आहे गावाखाली रंधा धबधबा आहे, तिथे पाणी अडवलेलं आहे. तरी देखील किती तरी गावांमध्ये अजूनही डोक्यावरील हांडे उतरत नाहीत. येथील मुलांचं भविष्य पण हांडे वाहण्यातच जाणार आहे का.
गावचे सरपंच, जिल्हापरिषद सदस्य, आमदार यांना काही घेणं देणं नाही याबाबत कायम उदासीनता आहे. यांना अजून गावाला पाण्याची सोय करता आली नाही तर हे शेती साठी काय करणार. उदासीनता पाटबंधारे खात्याची देखील दिसून येते, जोपर्यंत कोणी मागत नाही तोपर्यंत त्यांना गरज नाही असा समज यांचा देखील आहे. यांचे माणुसकी म्हणून काहीच कर्त्यव नाही. मुलांच्या मनाच्या स्थिती अश्या झाल्यात की पाणी वाहन हेच घरी असल्यावर काम असत. अजून सुद्धा आमच्या कित्येक पिढ्या आम्हाला अस वाटत आहे पाणी वाहण्यातच जानार आहेत, कारण शिक्षण काय असत हे अजून आम्हाला समजलच नाही.