नवी दिल्ली : येत्या मकर संक्रांतीपासून म्हणजेच १५ जानेवारीला अयोध्येतील राम मंदिराचे बांधकाम सुरू होणार आहे. तीन वर्षात राम मंदिराचे बांधकाम...
नवी दिल्ली : येत्या मकर संक्रांतीपासून म्हणजेच १५ जानेवारीला अयोध्येतील राम मंदिराचे बांधकाम सुरू होणार आहे. तीन वर्षात राम मंदिराचे बांधकाम पूर्ण होईल, अशी माहिती श्रीराम जन्मभूमी ट्रस्टने शनिवारी दिली. ५ एकर जागेमध्ये बांधले जाणारे हे राम मंदिर तीन मजली असणार आहे. मंदिराची लांबी ३६० फूट, रुंदी २३५ फूट आणि उंची १६१ फूट असणार आहे. या बांधकामासाठी साधारण ४०० वर्षांपर्यंत तग धरेल अशा सिमेंटचा वापर केला जाणार आहे. मंदिराच्या दर्शनीभागात २२ पायऱ्या असतील तर, ज्येष्ठ आणि दिव्यांग नागरिकांसाठी लिफ्ट आणि एस्कलेटरचीही सुविधा असणार आहे. मुख्य मंदिराच्या आजूबाजूला ६५ एकर क्षेत्रामध्ये विविध बांधकामे केली जाणार आहेत, अशी माहिती ट्रस्टच्या अधिकाऱ्यांनी दिली.
बांधकामचे कंत्राट दिलेल्या कंपन्यांना मंदिर पूर्ण करण्यास साधारण तीन वर्षांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे डिसेंबर २०२३पर्यंत मंदिराचे बांधकाम पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. दिवसाला ५० हजार भाविक मंदिरात येतील, असा अंदाज ट्रस्टला आहे. बांधकामासाठी देणगी जमा केली जाणार आहे. जानेवारी महिन्यापासून ते मेघ पौर्णिमेपर्यंत हे काम चालणार आहे. यासाठी ४ लाख स्वयंसेवक ११ कोटी घरांना भेटी देणार आहेत. राम जन्मभूमी मंदिर बांधकामाच्या ठिकाणी एकूण 12 खांबांसाठी खोदकाम करून त्यात बसवलेल्या खांबांची चाचणी करण्यात आली. या खांबांच्या तपासणीचे काम आयआयटी चेन्नईचे अभियंते आणि मंदिर बांधकामासाठी अधिकृत नियुक्ती केलेल्या लार्सन अँड टुब्रोच्या युनिटने केली.
----------------------------------