मुंबई,: "देशाचे माजी पंतप्रधान, भारतरत्न स्वर्गीय लाल बहादूर शास्त्रीजींना सरहद्दीवर रक्त सांडणाऱ्या सैनिकांची, शेतात घाम गाळणाऱ्या शेत...
मुंबई,: "देशाचे माजी पंतप्रधान, भारतरत्न स्वर्गीय लाल बहादूर शास्त्रीजींना सरहद्दीवर रक्त सांडणाऱ्या सैनिकांची, शेतात घाम गाळणाऱ्या शेतकऱ्यांची ताकद कळली होती. संरक्षणसिद्धता आणि अन्नधान्य उत्पादनाद्वारेच भारत आत्मनिर्भर बनू शकतो हा त्यांचा विश्वास होता. या विश्वासामुळे 'जय जवान, जय किसान'सारखा क्रांतिकारी नारा त्यांनी दिला.
देशवासीयांच्या कर्तृत्वावर विश्वास असले
लं, लोकभावनांचा आदर करणारं त्याचं नेतृत्वं होतं. त्यांच्या विचारांतच देशाला पुढे नेण्याची ताकद आहे", अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माजी पंतप्रधान स्वर्गीय लाल बहादूर शास्त्री यांना अभिवादन करुन आदरांजली वाहिली. स्वर्गीय लाल बहादूर शास्त्रीजींच्या स्मृतीदिनानिमित्त अभिवादन करताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, अत्यंत साधी राहणी, उच्च नैतिक मुल्ये, देशकल्याणासाठी दृढसंकल्प असलेलं त्यांचं नेतृत्व होतं. ते स्वाभिमानी, आदर्शवादी होते. देशात अन्नधान्याची टंचाई असेल तर देशवासीय उपवास करतील, परंतु परराष्ट्रासमोर झुकणार नाहीत, अशी स्प्ष्ट भूमिका त्यांनी घेतली होती. पाकिस्तानविरुद्ध १९६५ च्या युद्धात त्यांनी देशाला अभूतपूर्व विजय मिळवून दिला. देशाचा सन्मान, देशवासियांचा आत्मविश्वास कायम उंच ठेवणाऱ्या स्वर्गीय शास्त्रीजींबद्दल देशवासिय नेहमीच कृतज्ञ राहतील, असा विश्वासही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला.