$type=ticker$snippet=hide$cate=0

मका खरेदी केंद्र पुन्हा सुरु करा ;आमदार आशुतोष काळेंचे ना. भुजबळांना साकडे

कोपरगाव प्रतिनिधी :शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या मालाला योग्य दर मिळावा या उद्देशातून महाविकास आघाडी सरकारने शासकीय दराने शासनाने मका खरेदी ...



कोपरगाव प्रतिनिधी :शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या मालाला योग्य दर मिळावा या उद्देशातून महाविकास आघाडी सरकारने शासकीय दराने शासनाने मका खरेदी करण्याचा निर्णय घेवून कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून मका खरेदी केंद्र सुरु केले होते, मात्र सर्व मका उत्पादक शेतकऱ्यांची मका खरेदी करण्यापूर्वीच हि मका खरेदी केंद्र बंद करण्यात आल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होणार असून हि मका खरेदी केंद्र पुन्हा सुरु करावे असे साकडे आमदार आशुतोष काळे यांनी अन्न नागरी पुरवठा मंत्री ना.छगनरावजी भुजबळ यांना घातले आहे.

                 आमदार आशुतोष काळे यांनी बुधवार (दि.६) रोजी अन्न व नागरी पुरवठा मंत्री ना. छगनराव भुजबळ यांची भेट घेऊन कोपरगाव मतदारसंघात सुरु करण्यात आलेले शासकीय मका खरेदी केंद्र पुन्हा सुरू करावे याबाबत निवेदन दिले. चालू हंगामात समाधानकारक पर्जन्यमानामुळे सर्वच पिकांबरोबरच मका पिकाचे उत्पादन वाढले आहे. त्याचबरोबर मका पिकाचे उत्पन्न वाढल्यामुळे दुसरीकडे मकाचे बाजारभाव पडले होते. अशा वेळी चिंतेत सापडलेल्या मका उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी  महाविकास आघाडी सरकारने  शासकीय दराने मका खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता.त्यामुळे शेतकऱ्यांना मकाचे योग्य दर मिळत होते. मात्र शासनाकडून १६ डिसेंबर रोजी अचानक हि मका खरेदी केंद्र बंद करण्यात आली आहेत. मात्र आजही अनेक शेतकऱ्यांची मका विक्री करणे अद्याप बाकी असून मका खरेदी केंद्र बंद केल्यामुळे मका उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होणार आहे. त्यासाठी बंद करण्यात आलेली मका खरेदी केंद्र पुन्हा सुरु करावे. तसेच दिनांक १६ डिसेंबर २०२० रोजी कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत खरेदी केलेल्या मकाची लॉट एन्ट्री व्हावी. मका खरेदीचे शासन पोर्टल बंद झाल्याने ७ शेतकऱ्यांची ३ लाख ३५ हजार ७७५ रुपये खरेदीची लॉट एन्ट्री झालेली नसून सदर एन्ट्री करण्यात यावी अशी मागणी ना. छगनराव भुजबळ यांना दिलेल्या निवेदनात आमदार आशुतोष काळे यांनी केली आहे.


Name

] ब्रेकिंग,844,Agralekh,3,desh,2,IPL 2020,19,Latest News,5534,letest News,582,Loksabha-2019,164,Maharashtra,103,Mumbai,41,New Window,210,News,314,satara,1,updates,452,Videsh,2,Vishesh,2,अर्थ,137,अहमदनगर,9939,औरंगाबाद,354,क्रीडा,675,दखल,657,देश,4142,नाशिक,773,पुणे,583,बीड,1423,बुलढाणा,858,ब्रेकिंग,15308,ब्रेकिंग न्युज,110,मनोरंजन,155,महाराष्ट्र,12389,महाराष्ट्र सातारा,6,मुंबई,3428,विदेश,635,संपादकीय,1458,सातारा,3146,
ltr
item
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: मका खरेदी केंद्र पुन्हा सुरु करा ;आमदार आशुतोष काळेंचे ना. भुजबळांना साकडे
मका खरेदी केंद्र पुन्हा सुरु करा ;आमदार आशुतोष काळेंचे ना. भुजबळांना साकडे
https://1.bp.blogspot.com/-ObT--U7YocI/X_WYpviBzuI/AAAAAAABmvs/foFy8w3VZRU78xcVNw0Nu6oRxn8wWhAhgCLcBGAsYHQ/s320/Aamdar%2BKale.jpg
https://1.bp.blogspot.com/-ObT--U7YocI/X_WYpviBzuI/AAAAAAABmvs/foFy8w3VZRU78xcVNw0Nu6oRxn8wWhAhgCLcBGAsYHQ/s72-c/Aamdar%2BKale.jpg
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates
https://www.lokmanthan.com/2021/01/blog-post_840.html
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/2021/01/blog-post_840.html
true
1708963956808886337
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content