बुलढाणा/ प्रतिनिधी : जागदरी तालुका सिंदखेड राजा येथील जातीय वादी गजानन अर्जुनराव डोईफोडे, रामभाऊ अर्जुनराव डोईफोडे, राजू अर्जुनराव डोईफोडे ...
बुलढाणा/ प्रतिनिधी : जागदरी तालुका सिंदखेड राजा येथील जातीय वादी गजानन अर्जुनराव डोईफोडे, रामभाऊ अर्जुनराव डोईफोडे, राजू अर्जुनराव डोईफोडे सर्व राहणार जागदरी यांनी गावातील मागासवर्गीय महिलेचा शारीरिक व मानसिक छळ केला असून त्यांच्यावर साखरखेर्डा पोलीस स्टेशन मध्ये भारतीय दंड संहिता 1860 नुसार कलम 354, 354 अ, 323, 504, 506 व अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम 1989 नुसार 3(2)(va)3(i)(w)(i) 3(i)(w)(ii) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र सदर आरोपींना साखरखेर्डा पोलिसांनी अद्यापही अटक केली नसल्याने पीडित महिलेने
दिनांक 4 जानेवारी 2019 रोजी जिल्हा पोलीस अधीक्षक व जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर केले आहे.
सदर निवेदनात नमुद केले आहे की सदर महिला ही सकाळी शौचालयाला गेली असता गावातील गजानन अर्जुनराव डोईफोडे यांनी मागून येऊन अचानक तोंड दाबले व तू मला खुप आवडतेस,मला संबंध करु दे असे म्हणत छातीला हात लावुन ब्लाऊज फाडत जोरात दाबली व खाली पाडून शारीरिक संबंध करण्याच्या उद्देशाने जबरदस्ती करू लागला. मी जीव वाचवण्याच्या आकांताने त्यांच्या तावडीतून सुटून आले सदर घटना पती व मुलांना माहिती होताच त्यांनी विचारपूस करण्यासाठी आरोपीच्या घरासमोर गेले असता रामभाऊ अर्जुना डोईफोडे व राजू अर्जुनराव डोईफोडे यांनी हरामखोरांनो तुम्ही जास्त माजले का तुमच्या बाया आमच्यासाठीच असतात तुमच्या बाया आमच्या खाली झोपायला पाहिजे असे म्हणत बेदम मारहाण केली व जीवे मारण्याची धमकी दिली. सदर घटनेमुळे आम्ही भयभीत अवस्थेत साखरखेडा पोलीस स्टेशन गाठले असता पोलिसांनी आमची तक्रार घेतली नाही नंतर दुसऱ्या दिवशी आम्ही पुन्हा विनंती केली असता संध्याकाळी तक्रार दाखल करून घेतली मात्र दहा दिवस उलटून गेले तरी सुद्धा आरोपींना अद्याप पर्यंत अटक केले नाही. त्यामुळे संबंधित पोलिस अधिकारी यांच्यावर तात्काळ कायदेशीर कार्यवाही करावी अशा मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांना पीडित महिलेच्या नातेवाईकांनी दिले.