$type=ticker$snippet=hide$cate=0

करुणा शर्मासोबत सहमतीने शरीरसंबंध : धनंजय मुंडे यांचे स्पष्टीकरण

मुंबई / प्रतिनिधीः करुणा शर्मा नावाच्या एका महिलेसोबत मी 2003 पासून परस्पर सहमतीने संबंधांत होतो. ही बाब माझे कुटुंबीय, पत्नी आणि मित्र परिव...

मुंबई / प्रतिनिधीः करुणा शर्मा नावाच्या एका महिलेसोबत मी 2003 पासून परस्पर सहमतीने संबंधांत होतो. ही बाब माझे कुटुंबीय, पत्नी आणि मित्र परिवार यांना अवगत होती. या परस्पर सहमतीच्या संबंधामधून आम्हाला एक मुलगा आणि एक मुलगी अशी दोन मुले झाली. या दोन्ही मुलांना मी माझे नाव दिले आहे. शाळेच्या दाखल्यापासून ते सर्व कागदपत्रांमध्ये या मुलांना पालक म्हणून माझेच नाव आहे. ही मुले माझ्यासोबतच राहतात. माझे कुटुंबीय, पत्नी आणि माझी मुले यांनीदेखील या मुलांना कुटुंबीय म्हणून सामावून घेतले असून स्वीकृती दिलेली आहे, असे स्पष्टीकरण राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी दिले आहे. 


कालपासून समाज माध्यमांमधून माझ्याविषयी काही कागदपत्रे प्रसारित होत असल्याचे तसेच मीडिया आणि सोशल मीडियाद्वारे माझ्यावर बलात्काराचे आरोप करण्यात येत आहेत. या प्रकरणी रेणू शर्मा नावाच्या एका महिलेने (या रेणु शर्मा या करुणा शर्मा यांच्या सख्या लहान बहीण आहेत) स्वतः त्यांच्या खात्यावरून टी्वट केले आहे. माझ्याविरुद्ध काही तक्रार दाखल केल्याचा उल्लेख त्या कागदपत्रांमध्ये दिसून येतो. हे सर्व आरोप खोटे, माझी बदनामी करणारे आणि मला ब्लॅकमेल करणारे असल्याते नमूद करून त्यांनी त्याचा तपशील दिला आहे. 

करुणा शर्मा नावाची महिला माझ्या मुलांची माता असल्यामुळे त्यांची मी सर्वोतोपरी पालनपोषणाची जबाबदारी स्वीकारली आहे. मी त्यांना मुंबईत सदनिका घेण्यास मदत केली आहे. मी त्यांना विमा पॉलिसी आणि त्यांच्या भावाला व्यवसाय स्थापित करण्यास मदत केलेली आहे. या सर्व कृती मी सद्भावनेने केलेल्या आहेत, असे सांगून मुंडे म्हणाले, की 2019 पासून करुणा शर्मा त्यांची बहीण रेणू शर्मा यांनी मला ब्लॅकमेल करून पैशाची मागणी करण्यास सुरुवात केली. माझ्या जीविताला गंभीर शारीरिक इजा करण्याच्या, धोका करण्याच्या धमक्यासुद्धा देण्यात आल्या. या सर्व प्रक्रियेत त्यांचा भाऊ ब्रिजेश शर्मादेखील सहभागी होता. या बाबत 12 नोव्हेंबर 2020 रोजी पोलिसांकडे तक्रार देण्यात आलेली आहे. नोव्हेंबर 2020 मध्ये करुणा शर्मा यांनी समाज माध्यामावर माझी बदनामी करण्याच्या हेतूने, मला ब्लॅकमेल करण्याच्या हेतूने माझ्याशी संबंधित अगदी व्यक्तिगत आणि खासगी साहित्य प्रकाशित केले होते. त्यामुळे या प्रकरणी मी स्वतः उच्च न्यायालयात त्यांच्या विरुद्ध याचिका दाखल केली आहे. मुंडे यांनी म्हटले आहे, की उच्च न्यायालयाने करुणा शर्मा यांच्या विरोधात असे साहित्य प्रकाशित करण्यास प्रतिबंध करणारे आदेश दिले आहेत. ही याचिका पुढील आणखी सुनावण्यासाठी उच्च न्यायालयासमोर प्रलंबित आहे. आणि त्याच दरम्यान दोन्ही बाजूच्या वकिलांमार्फत समझोता घडवून आणण्याची प्रक्रियासुद्धा सुरू आहे. रेणू शर्मा यांनी माझ्या विरुद्ध खोटे आणि बदनामीकारक आणि माझ्यावर लग्नाच्या बहाण्याने बलात्कार केल्याचा आरोप केल्याची पोस्ट प्रसारित करण्यास सुरुवात केली आहे. या सर्व तक्रारी खोट्या आहेत. मला ब्लॅकमेल करून खंडणी वसूल करण्याच्याच योजनेचा एक भाग आहेत. माझ्याकडे श्रीमती रेणू शर्मा यांनी त्यांच्या मोबाईलवरून मला ब्लॅकमेलिंग करून कोट्यवधी रुपये मागितल्याचे पुरावे आहेत. तसेच मी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेमध्ये श्रीमती करुणा शर्मा यांच्या सोयीने प्रकरण सेटल करावे, यासाठीच्या दबाव तंत्रासाठीचासुद्धा भाग असू शकतो, असे त्यांनी म्हटले आहे.



 


Name

] ब्रेकिंग,852,Agralekh,3,desh,2,IPL 2020,19,Latest News,5568,letest News,588,Loksabha-2019,164,Maharashtra,108,Mumbai,41,New Window,210,News,316,sangli,2,satara,13,updates,453,Videsh,2,Vishesh,2,अर्थ,141,अहमदनगर,10024,औरंगाबाद,356,क्रीडा,676,दखल,666,देश,4191,नाशिक,779,पुणे,617,बीड,1425,बुलडाणा,2,बुलढाणा,864,ब्रेकिंग,15504,ब्रेकिंग न्युज,113,मनोरंजन,158,महाराष्ट्र,12610,महाराष्ट्र सातारा,33,मुंबई,3471,विदेश,637,संपादकीय,1475,सातारा,3167,
ltr
item
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: करुणा शर्मासोबत सहमतीने शरीरसंबंध : धनंजय मुंडे यांचे स्पष्टीकरण
करुणा शर्मासोबत सहमतीने शरीरसंबंध : धनंजय मुंडे यांचे स्पष्टीकरण
https://static.langimg.com/thumb/msid-80234390,imgsize-84584,width-540,height-405,resizemode-75/maharashtra-times.jpg
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates
https://www.lokmanthan.com/2021/01/blog-post_849.html
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/2021/01/blog-post_849.html
true
1708963956808886337
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content