राहाता/प्रतिनिधी: राहाता तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूक कामातून महिला, दिव्यांग तसेच बीएलओ असलेल्या शिक्षकांना सुट मिळावी. यासाठी राहाता ...
राहाता/प्रतिनिधी: राहाता तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूक कामातून महिला, दिव्यांग तसेच बीएलओ असलेल्या शिक्षकांना सुट मिळावी. यासाठी राहाता तालुका प्राथमिक शिक्षक परिषदेने राहात्याचे तहसीलदार कुंदन हिरे यांची समक्ष भेट घेऊन चर्चा केली व निवेदन दिले. महिला शिक्षिका यांना केंद्राध्यक्ष म्हणून नियुक्ती रद्द कराव्यात.तसेच मकरसंक्रांतीच्या सणाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक कामातून सूट मिळावी.
महिला शिक्षिका यांना फक्त मतदान अधिकारी क्र.3 म्हणून नियुक्ती द्यावी. महिला शिक्षिका यांना स्वतःच्या राहात्या गावात किंवा गावाजवळ निवडणूक ड्यूटी द्यावी. दिव्यांग बांधवांना व बीएलओ म्हणून कार्यरत असणार्या तसेच आजारी, दिर्घ रजेवर प्राथमिक शिक्षकांना व स्तनदा माता शिक्षिका यांना आलेले नियुक्ती आदेश रद्द करावेत. मतदान कर्मचारी अधिकारी असणार्या कर्मचार्यांना मतदान करण्यासाठी वेळ द्यावा आदी प्रमुख मागण्यांचे निवेदन दिले. या प्रसंगी शिक्षक परिषद जिल्हा सरचिटणीस दत्ता गमे, शिक्षक परिषद तालुकाध्यक्ष दत्ता गायकवाड, गुरुमाऊली मंडळ तालुकाध्यक्ष सुधाकर अंत्रे, कार्याध्यक्ष विनोद तोरणे, जिल्हा उपाध्यक्ष संजय वाघमारे, उच्चाधिकार समिती तालुकाध्यक्ष चंद्रकांत महानडुळे, बाजीराव बनसोडे पंकज दर्शने, रामकीसन असावा, राजू बनसोडे, शांताराम शेळके आदी उपस्थित होते. मागण्यांना हिरे यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन त्यांनी प्रशासनाला योग्य निर्देश दिले.