पुणे : राज्यात कोरोना काळात लागू केलेल्या लॉकडाऊनपासून एमपीएससीच्या विद्यार्थाना मोठी आर्थिक असचं सहन करावी लागत आहे. त्यातच परीक्षा पूढे ...
पुणे : राज्यात कोरोना काळात लागू केलेल्या लॉकडाऊनपासून एमपीएससीच्या विद्यार्थाना मोठी आर्थिक असचं सहन करावी लागत आहे. त्यातच परीक्षा पूढे ढकलल्यामुळे विद्यार्थी हवालदिल झाला आहे. यातच एमपीएससीच्याच्या मुलांना गेल्या 6 महिन्यांपासून विद्यावेतन न मिळाल्याने त्यांनी बार्टी या संस्थेसमोर 6 जानेवारीपासून आंदोलन सुरू केलं आहे. बार्टी संस्थेने गेल्या 6 महिन्यापासून राज्यातील 400 विद्यार्थ्यांचे मानधनच दिलेले नाही. त्यामुळे या विदयार्थ्यांनी कालपासून पुण्यातील बार्टी कार्यालयासमोर आंदोलन सुरू केलं आहे. बार्टी या संस्थेमार्फत एमपीएससी करणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना दर महिना 9 हजार रूपये विद्यावेतन दिलं जातं. विद्यार्थ्यांनी याबाबत संस्थेच्या वरिष्ठांना अर्जही दिला आहे.