औरंगाबाद : प्रेमविवाहाला कुटुंबीयांनी विरोध केल्यानंतर तरुणीने थेट पोलिस ठाण्यात धाव घेतली. औरंगाबादच्या पुंडलिकनगर पोलिस ठाण्यातील कर्मचार...
औरंगाबाद : प्रेमविवाहाला कुटुंबीयांनी विरोध केल्यानंतर तरुणीने थेट पोलिस ठाण्यात धाव घेतली. औरंगाबादच्या पुंडलिकनगर पोलिस ठाण्यातील कर्मचार्यांनी समुपदेशन करून पोलिस ठाण्यातच तरुण आणि तरुणीचा प्रेमविवाह घडवून आणला. पोलिस ठाण्यातच लग्न लावण्याची बहुदा ही पहिलीच घटना असावी. विशेष म्हणजे लग्न लावल्यानंतर नवरी मुलीला पोलिसांनी नवर्या मुलासोबत पाठवून दिले. त्यामुळे एकमेकांवर प्रेम करणार्या दोन जीवांचे एक अनोखे मनोमिलन पोलिसांनी करून दिले. पोलिसांच्या या आगळ्या वेगळ्या कामगिरीची सर्वत्र चर्चा सुरू आहे.