$type=ticker$snippet=hide$cate=0

तोंड लपवणारा नाही, तर स्टँडवर समस्या सोडवणारा लोकप्रतिनिधी ; शंकरराव गडाख

सोनई/प्रतिनिधी ः मध्यंतरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून झालेल्या निवडणुकीत माझ्यावर आरोप करण्यात आले. मंत्री शंकरराव गडाख हे जनतेच...

सोनई/प्रतिनिधी ः मध्यंतरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून झालेल्या निवडणुकीत माझ्यावर आरोप करण्यात आले. मंत्री शंकरराव गडाख हे जनतेचे समस्या सोडवणूक करण्यापेक्षा तोंड लपवत आहे. मात्र मी तोंड लवणारा मंत्री नसून, बस स्टॅडवर समस्या सोडविणारा लोकप्रतिनिधी असल्याचा टोला जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी विरोधकांना लगावला. 


       मंत्री गडाख हे, मुळा कारखान्यावर आयोजित करण्यात आलेल्या बिनविरोध निवड झालेल्या पदाधिकारी यांचा सत्कार समारंभ व आभार प्रदर्शन करताना बोलत होते. अध्यक्ष स्थानी जेष्ठ साहित्यीक मुळा कारखान्याचे संस्थापक यशवंतराव गडाख हे होते. ना. गडाख म्हणाले,ऊस कारखान्याच्या माध्यमातून पूरक व्यवसाय म्हणून डिस्टलरी, सूतगिरणी, इथेनॉल, आदी प्रकल्प हाती घेतली असून त्यासाठी जोरदार तयारी सुरू आहे, त्या माध्यमातून बेरोजगारी कमी होऊन तरुणांना रोजगार निर्माण होणार आहे. यंदा प्रथमच साडे आठ हजारटन रोज ऊस गळीत होत आहे. गावागावात संघर्ष टाळण्यासाठी निवडणूक बिनविरोध झाल्या पाहिजेत. शनैश्‍वर देवस्थानच्या विश्‍वस्त पदाच्या निवडीसाठी विरोधकांनी शासन स्तरावर वेगळाच निर्णय घेतला गेला, त्यात पूर्णपणे स्थानिक लोकांना या निर्णय मूळे वंचित राहावे लागले असते,पण मी लोकप्रतिनिधी म्हणून मला त्या ठिकाणी काम करावे लागले असते,पण मी तो शासकीय आदेश मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या निदर्शनास आणून देऊन तात्काळ विश्‍वस्त निवड प्रक्रिया ही गावातील लोक मधूनच व्हावी यासाठी प्रयत्न केला, त्यात यश आले. आणि विरोधकांचा भ्रमनिरास झाला.आदी गावागावातील निवडणूक दरम्यान चौफेर विरोधकांचा खरपूस समाचार घेतला.

     यावेळी बोलतांना यशवंतराव गडाख म्हणाले की, मार्केट कमिटी विकसित करण्यासाठी शेवगाव, आदी ठिकाणी शेकडो गाळे बांधण्यासाठी व रोजगार निर्मिती साठी लढाई सुरू आहे. ती लवकरच पूर्णत्वास येईल.अनावश्यक खर्च टाळून नवीन संचालकांनी सहकार जपण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन केले.

       या प्रसंगी ज्येष्ठ संचालक जबाजी फाटके, ज्ञानेश्‍वर कारखान्याचे संचालक भैय्यासाहेब देशमुख, मच्छीन्द्र म्हस्के, नारायण म्हस्के, भाऊसाहेब कांगुणे, कोलते, अशोक कारखान्याचे माजी अध्यक्ष दिगंबर शिंदे, भगवान गंगावणे, उपनगराध्यक्ष नंदकुमार पाटील, लक्ष्मणराव जगताप, रामभाऊ जगताप, मुळाचे संचालक बापूसाहेब शेटे, बाळासाहेब बोरुडे, अ‍ॅड. एम.आय.पठाण, अ‍ॅड. आंबडे, रावसाहेब कांगुणे, कारभारी जावळे, नाना पाटील तुवर, आदी नवनिर्वाचित संचालक, ग्रामपंचायत सदस्य, देवस्थान ट्रस्टचे विश्‍वस्त, आदी कार्यकर्ते उपस्थित होते. प्रास्ताविक कारभारी जावळे, तर आभार, सूत्रसंचालन भोर यांनी मानले.



नवीन संचालकांनी विकासासाठी सहकार्य करावे :यशवंतराव गडाख 

ज्येष्ठ साहित्यीक यशवंतराव गडाख म्हणाले, 40 वर्ष सभासद व जनतेने विश्‍वास टाकला त्या वाटेने जाऊन कारखान्याचा कारभार पारदर्शक करत आहेत. नवीन संचालकांनी कारखान्याच्या विकासासाठी सहकार्य करावे, कारखाना बिनविरोध झाला. ही सोपी गोष्ट नसल्याचे स्पष्ट सांगून ऐतिहासिक घटना घडली आहे. कारखान्याच्या शेअर्स ची किंमत 10 हजाराहून 12 हजार झाल्याचे सांगितले. कोट्यवधी रुपयांची प्रॉपर्टी शेतकरी मालकीची झाली आहे.13/14 लाख टन उसाचे गाळप होईल असा अंदाज व्यक्त केला. 


Name

] ब्रेकिंग,1,] ब्रेकिंग,876,Agralekh,3,baramati,2,desh,2,IPL 2020,19,kolhapur,8,Latest News,5971,letest News,603,Loksabha delhi,1,Loksabha-2019,164,Maharashtra,401,Maharashtra.,5,Mumbai,42,New Window,210,News,321,sangli,82,satara,295,satara.,7,solapur,2,solapur pandharpur,1,updates,453,Videsh,2,Vishesh,2,अर्थ,206,अहमदनगर,10849,औरंगाबाद,379,क्रीडा,680,दखल,745,देश,4598,नाशिक,827,पुणे,857,बीड,1448,बुलडाणा,41,बुलढाणा,878,ब्रेकिंग,17469,ब्रेकिंग न्युज,120,ब्रेकिंग महाराष्ट्र,1,मनोरंजन,174,महाराष्ट्र,14777,महाराष्ट्र सातारा,44,मुंबई,4157,विदेश,665,संपादकी,2,संपादकीय,1634,सातारा,3217,
ltr
item
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: तोंड लपवणारा नाही, तर स्टँडवर समस्या सोडवणारा लोकप्रतिनिधी ; शंकरराव गडाख
तोंड लपवणारा नाही, तर स्टँडवर समस्या सोडवणारा लोकप्रतिनिधी ; शंकरराव गडाख
https://1.bp.blogspot.com/-a1x6M83wHUQ/YA1kUsM7AxI/AAAAAAABnjA/gShbIz5yGzswS1aQXneFxybeS5cUCoQlgCLcBGAsYHQ/s320/Sonai%2BNews.jpg
https://1.bp.blogspot.com/-a1x6M83wHUQ/YA1kUsM7AxI/AAAAAAABnjA/gShbIz5yGzswS1aQXneFxybeS5cUCoQlgCLcBGAsYHQ/s72-c/Sonai%2BNews.jpg
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates
https://www.lokmanthan.com/2021/01/blog-post_872.html
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/2021/01/blog-post_872.html
true
1708963956808886337
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content