मुंबई / प्रतिनिधी : तेजीत वधारलेल्या शेअरची जोरदार विक्री करून नफावसुली झाल्याने आज शुक्रवारी सेन्सेक्समध्ये 700 अंकांची घसरण झाली. राष्ट्...
मुंबई / प्रतिनिधी : तेजीत वधारलेल्या शेअरची जोरदार विक्री करून नफावसुली झाल्याने आज शुक्रवारी सेन्सेक्समध्ये 700 अंकांची घसरण झाली. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 200 अंकांनी कोसळला आहे. बँका, धातू, ऑटो या शेअरमध्ये विक्रीचा सपाटा सुरू आहे. या पडझडीत गुंतवणूकदारांचे किमान दोन लाख कोटी बुडाले आहेत.
भांडवली बाजारात मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या तेजीच्या घोडदौडीला आज ब्रेक लागला आहे. नफेखोरांनी नफावसुलीला प्राधान्य दिले आहे. आज सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये घसरण झाली. गुरुवारी सेन्सेक्स 50 हजारांवर गेला होता. शेवटच्या तासात त्यात घसरण झाली होती. त्यामुळे तो गुरुवारी 150 अंकांनी घसरला होता. सध्या सेन्सेक्स 725 अंकांनी कोसळला असून 48 हजार 499 अंकावर आहे. निफ्टी 214 अंकांनी घसरला असून 14 हजार 379 अंकावर आहे. आज सकाळपासून बाजारात विक्रीचा दबाव दिसून आला. आजच्या सत्रा रिलायन्स इंडस्ट्रीज, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक, एचडीएफसी, अॅक्सिस बँक, एसबीआय, एशियन पेंट्स, आयसीटी बजाज फायनान्स, कोटक महिंद्रा बँक या शेअरमध्ये घसरण झाली आहे. तर मारुती सुझुकी, इन्फोसिस, एचयूएल, टीसीएस, बजाज ऑटो हे शेअर वधारले आहेत. बँक आणि वित्त सेवा पुरवठादार कंपन्यांना आज मोठी झळ बसली आहे. गुंतवणूकदारांचे लक्ष आता अर्थसंकल्पाकडे लागले आहे.