सिंदखेड राजा/शहर प्रतिनिधी : सिंदखेड राजा मतदार संघातील शेतकऱ्यांसाठी बायोगॅस प्रकल्प हा आर्थिक क्रांती घडून आणणार असून शेतकऱ्यांसाठी आश...
सिंदखेड राजा/शहर प्रतिनिधी : सिंदखेड राजा मतदार संघातील शेतकऱ्यांसाठी बायोगॅस प्रकल्प हा आर्थिक क्रांती घडून आणणार असून शेतकऱ्यांसाठी आशेचा किरण निर्माण झाले शेतकऱ्यांसाठी हा प्रकल्प वरदान ठरणार असल्याचे प्रतिपादन मीरा क्लिनफ्युल्स लिमिटेड अंतर्गत प्रोजेनिटर बायोसोलुशन्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या भूमिपूजन सिंदखेड राजा तालुक्यातील हिवरा फाटा पिंपळगाव कुडा याठिकाणी बायोग्यास प्रकल्पाचे भूमिपूजन आमदार डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते
सिंदखेड राजा तालुक्यातील हिवरा फाटा पिंपळगाव कुडा तालुका सिंदखेड राजा याठिकाणी मीरा क्लिनफ्युल्स लिमिटेड अंतर्गत प्रोजेनिटर बायोसोलुशन्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या भूमिपूजन भूमिपूजन सोहळा दिनांक 23 जानेवारी रोजी दुपारी चार वाजता पार पडला या कार्यक्रमाचे भूमिपूजन नामदार डॉक्टर राजेंद्र शिंगणे पालकमंत्री बुलढाणा यांच्या हस्ते पार पडले यावेळी कंपनीचे प्रमुख माननीय श्री कार्तिक रावल माननीय श्री संजय वायाळ ईश्वर बायोटेक कंपनी कंपनीच्या संचालिका डॉक्टर सौ अर्चना गजानन झोरे संचालिका दमयंती शेवाळे माजी उपनगराध्यक्ष जगन राव ठाकरे पिंपळगाव कुडा चे सरपंच श्री वैजनाथ कुडे तालुका कृषी अधिकारी वसंतराव राठोड प्राचार्य विजय नागरे खुशाल राव जाधव प्रशांत ठमके प्राध्यापक डॉक्टर मारोतराव गव्हाणे कंपनीचे शहाजी चौधरी अतिश झोरे यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये हे भूमिपूजन सोहळा पार पडला यावेळी ईश्वर बाय चे संचालक संजय वायाळ यांनी शेतकऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले तसेच नॅशनल प्राईम बी डी एम सी एल कार्तिक रावल यांनी बायोगॅस प्रकल्पाबद्दल शेतकऱ्यांना सविस्तर माहिती सांगितली तसेच अध्यक्षीय भाषणात बोलतांनी आमदार डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांनी सांगितले की की विदर्भात सर्वाधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत व त्यात बुलढाणा जिल्हा दुसऱ्या क्रमांकावर आहेत हा प्रकल्प सुरू झाल्याने शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार असून हा प्रकल्प माझ्या मतदारसंघात सुरू होत आहेत याचा मला अभिमान आहेत सरकार चे काम करते त्याला हातभार लावण्याचे काम या कंपनीकडून होत आहेत या कंपनीमुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार असून बायोगॅस ही आत्ताची महत्त्वपूर्ण गरज आहेत भारतातील मोठ्या प्रमाणात पैसा इंधनावर खर्च होत आहेत आणि त्या इंधन निर्मिती आता आपल्या मतदारसंघात होत असून ही गौरवाची बाब आहेत या कंपनीचा शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त फायदा घेण्याचे आव्हान देखील पालकमंत्री नामदार डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांनी केला आहेत या कार्यक्रमाचे प्रास्ताविक गजानन झोरे यांनी केले तर या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्राध्यापक लक्ष्मण म्हस्के यांनी केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रख्यात निवेदक अजीम नवाज राही यांनी केले