शिबिराचे पत्रकाराने कुटूंबियासोबत लाभ घ्यावा-मराठी पत्रकार परिषद अंबाजोगाई । प्रतिनिधीः रोटरी क्लब ऑफ अंबाजोगाई सिटीच्या वतीने पत्रकारितेच्य...
शिबिराचे पत्रकाराने कुटूंबियासोबत लाभ घ्यावा-मराठी पत्रकार परिषद
अंबाजोगाई । प्रतिनिधीः रोटरी क्लब ऑफ अंबाजोगाई सिटीच्या वतीने पत्रकारितेच्या माध्यमातून सामाजिक योगदानाची कृतज्ञता व्यक्त करण्याकरिता,दर्पण दिनानिमित्त अंबाजोगाई तालुक्यातील सर्व पत्रकार बांधव व त्यांच्या कुटुंबियांसाठी 10 जानेवारी रोजी सर्वंकष मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले असुन या शिबिराचा सर्व पत्रकार बांधवांनी लाभ घ्यावा असे आवाहन मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने करण्यात आले आहे.
रविवार 10 जानेवारी 20
21 रोजी सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंतडॉ.एन.बी.घुगे चइइड चऊ मेडिसिन,मधुमेह व हृदयरोग तज्ञ.,डॉ.संदीप चव्हाण चइइड,ऊजचड नेत्ररोग तज्ञ., डॉ.संजय शेटे चइइड,चऊ पॅथॉलॉजि पॅथॉलॉजिस्ट आदी तज्ञ डॉक्टरांच्या वतीने या तपासण्या होणार असुनशिबिरामध्ये वजन, उंची, बीएमआय इसिजी, ब्लड प्रेशर, ब्लड शुगर फास्टिंग (मधुमेहासाठी तपासणी), लिपिड प्रोफाइल :-(रक्तातील चरबीच्या ट्रायग्लिसराईड, टोटल कोलेस्टेरॉल, कऊङ, ङऊङ, तङऊङ तपासण्या), डी उीशरींळपळपश,(किडणीची तपासणी), डोळ्यांची संपूर्ण तपासणी, फिजिशियन मार्फत सर्वंकष तपासणी होणार असुन शिबिरासाठी पूर्व नोंदणी आवश्यक आसल्याने कोवीड 19 च्या पार्श्वभूमीवर 10 जानेवारी 2021 रोजी होणा-या शिबिरा दिवशी गर्दी टाळण्याकरिता व सर्वांच्या संपूर्ण तपासण्या व्यवस्थित होण्या करीता सकाळी 10 पासून दुपारी 2 वाजेपर्यंत टप्याटप्याने सर्वांना वेळ देण्यात येईल. त्या साठी दिनांक 3 जानेवारी 2021 ते 9 जानेवारी 2021 या सात दिवसांत सकाळी 8 ते 11 या वेळेमध्ये डॉ.घुगे यांचे घुगे हॉस्पिटल येथे येऊन सर्वांनी नोंदणी करून ईसीजी,रक्ताच्या सर्व प्रकाच्या तपासण्या उपाशी पोटी करून घ्यावयाच्या असुन याच सात दिवसात डॉ.संदीप चव्हाण यांचे दीप नेत्रालाय, पोखरी रोड येथे सकाळी-11 ते 12 या वेळेत डोळ्यांची तपासणी करून घ्यावयाची आहे. 10 जानेवारी रोजी तपासणी अहवाला नुसार सर्व पत्रकारांना डॉ नवनाथ घुगे हे वैद्यकीय सल्ला देतील आशी माहिती रो.डॉ.निशिकांत पाचेगावकर (9422489844) अध्यक्ष,रो.क्लब ऑफ अंबाजोगाई रो.कल्याण काळे सचिव,रो.क्लब ऑफ अंबाजोगाई, रो.डॉ.नवनाथ घुगे. (9859784001) प्रोजेक्ट चेअरमन, रो.डॉ संजय शेटेप्रोजेक्ट डायरेक्टर, रो.अविनाश मुडेगावकर, प्रकल्प समन्वयकङ्गरो.शिवकुमार निर्मळे प्रकल्प समन्वयक रो.क्लब ऑफ अंबाजोगाई, रो.संतोष मोहितेक्लब ट्रेनर रो.क्लब ऑफ अंबाजोगाई यांनी दिली असुन या शिबिराचा अंबाजोगाई तालुक्यातील अधिकाधिक पत्रकार बांधवांनी लाभ घ्यावा असे आवाहन मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने दत्तात्रय अंबेकर बीड जिल्हा कार्याध्यक्ष परमेश्वर गित्ते, बीड जिल्हा सहसचिव, गजानन मुडेगावकर, समन्वयक, तालुका हल्ला विरोधी कृती समिती, विरेंद्र गुप्ता समन्वयक, अंबाजोगाई तालुका मराठी पत्रकार परिषद, मुबंई यांनी केले आहे.