$type=ticker$snippet=hide$cate=0

थोरातांचे सहकाराचे मॉडेल देशासाठी उपयुक्त ः मुख्यमंत्री बघेल

 संजय आवटे, रणजितसिंह डिसले, अ‍ॅड. माधव कानवडेे यांना पुरस्कार प्रदान संगमनेर/प्रतिनिधी : केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्याने शेतीमालाचे भ...

 संजय आवटे, रणजितसिंह डिसले, अ‍ॅड. माधव कानवडेे यांना पुरस्कार प्रदान

संगमनेर/प्रतिनिधी :


केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्याने शेतीमालाचे भाव वाढून शेतकर्‍यांना फायदा न होता भांडवलदार व व्यापारी यांना फायदा झाला. कृषीप्रधान भारतात केंद्र सरकार शेतकर्यांचे हाल करत असून हे दुर्देवी आहे. महाराष्ट्रात सहकारात चळवळीतून ग्रामीण विकास झाला असून सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात व महसूलमंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांनी उभे केलेले सहकाराचे मॉडेल हे छत्तीसगड सह देशातील सर्व राज्यांसाठी उपयुक्त ठरेल असे गौरवोद्गार छत्तीसगडचे मुख्यमंत्री नामदार भूपेश बघेल यांनी काढले आहे.

    मालपाणी लॉन्स येथे सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात व हरितक्रांतीचे प्रणेते डॉ. अण्णासाहेब शिंदे यांच्या जयंती महोत्सवानिमित्त आयोजित पुरस्कार वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी जलसंपदामंत्री नामदार जयंत पाटील हे होते तर व्यासपीठावर राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, आ. डॉ. सुधीर तांबे, आ. लहू कानडे, आ.डॉ. किरण लहामटे, माजी आमदार नरेंद्र घुले, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे , रणजितसिंह देशमुख, बाजीराव पा.खेमनर, दुर्गाताई तांबे आदी उपस्थित होते.  याप्रसंगी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात स्मृती पुरस्काराने ज्येष्ठ संपादक संजय आवटे यांना तर हरितक्रांतीचे प्रणेते डॉ.आण्णासाहेब शिंदे पुरस्काराने ग्लोबल टीचर पुरस्कार विजेते रणजित डिसले यांना आणि सहकारातील कार्यकर्ता या पुरस्काराने अ‍ॅड माधवराव कानवडे यांना गौरवण्यात आले. 1 लाख रुपये व सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. तर महसूल मंत्री नामदार थोरात म्हणाले की, नामदार बघेल यांनी भाजपला धडा शिकवत मोठा दैदिप्यमान विजय मिळवून छत्तीसगडमध्ये काँग्रेस सत्तेवर आणले. त्याच्या पाठोपाठ महाराष्ट्रात राष्ट्रवादी शिवसेना आणि काँग्रेसचे महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले. यामध्ये जयंत पाटील यांचाही मोठा वाटा राहिला खरे तर महाराष्ट्रात स्वर्गीय यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, डॉ. अण्णासाहेब शिंदे, तीर्थरुप भाऊसाहेब थोरात यांनी घेतलेल्या पायामुळे व केलेल्या कामामुळे आज आपण आनंदी जीवन जगत आहोत. हाच वारसा आपल्याला पुढे चालवायचा आहे.  यावेळी बोलतांना संजय आवटे म्हणाले की, संगमनेरचा सहकारात शिस्तबद्ध गुणवत्तेचा आहे. येथील नेतृत्वाने ग्रामीण विकासाच्या हे सर्वसामान्यांच्या सामर्थ्याची कहानी येथे निर्माण झाली आहे. देशात विखारी वातावरण असताना संगमनेर अमृतवाहिनी आहे तर चंपरण्या चळवळीचा वारसा दंडकारण्य अभियान घेतला आहे. तर रणजितसिंह डिसले म्हणाले की, आंतरराष्ट्रीय पातळीवर होणार्या सन्मानाबरोबर आपल्या मातीतील होणारा सन्मानही महत्त्वाचा आहे. संगमनेर हे मोठे शैक्षणिक केंद्र असून येथून आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक शिक्षक व विद्यार्थी चमकीला असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला अ‍ॅड. माधवराव कानवडे म्हणाले की, आपण आयुष्यभर भाऊसाहेब थोरात यांचा विचार झाला असून त्यांनी त्यांनी कार्यकर्त्यांना कायम ताकद दिली. पाणीपुरवठा योजनेतून तालुका हिरवा झाला असून सहकारात काम करताना आपण सर्वसामान्यांचा विचार केला. नवीन कारखाना निर्मितीचा निर्णय हा पुढील पन्नास वर्षासाठी धोरणात्मक ठरला असून आपल्या कार्यकाळात यांनी योगदान दिले त्यांचा हा पुरस्कार असल्याचे ते म्हणाले. 



2023 पर्यंत निळवंडेचे कालवे पूर्ण करणार ः जयंत पाटील

 महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी निळवंडे धरण व कालव्यांसाठी ध्यास घेतला असून येत्या 2023-24 पर्यंत कालव्यांची कामे पूर्ण करून पाणी देणारच आहोत. पाण्याचे दुर्मिक्ष कमी करणे हेच महाविकास आघाडी सरकारचे मुख्य उद्देश असल्याचे प्रतिपादन जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी केले. ते पुढे बोलतांना म्हणाले की, नामदार बाळासाहेब थोरात सर्वांना बरोबर घेऊन चालणारे नेते आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली या विभागाचा विकास झाला असून सहकार बरोबर शैक्षणिक व प्रगतीमध्ये हा संगमनेर तालुका अग्रेसर ठरला आहे. शेततळ्यातून झालेली जलक्रांती किंवा कोणत्याही योजना कशा प्रभावीपणे राबवून हे नामदार बाळासाहेब थोरात यांच्याकडून शिकावे असेही ते म्हणाले


Name

] ब्रेकिंग,852,Agralekh,3,desh,2,IPL 2020,19,Latest News,5572,letest News,588,Loksabha-2019,164,Maharashtra,108,Mumbai,41,New Window,210,News,316,sangli,3,satara,14,updates,453,Videsh,2,Vishesh,2,अर्थ,141,अहमदनगर,10029,औरंगाबाद,356,क्रीडा,676,दखल,666,देश,4191,नाशिक,779,पुणे,619,बीड,1425,बुलडाणा,3,बुलढाणा,864,ब्रेकिंग,15511,ब्रेकिंग न्युज,113,मनोरंजन,158,महाराष्ट्र,12620,महाराष्ट्र सातारा,34,मुंबई,3472,विदेश,637,संपादकीय,1475,सातारा,3168,
ltr
item
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: थोरातांचे सहकाराचे मॉडेल देशासाठी उपयुक्त ः मुख्यमंत्री बघेल
थोरातांचे सहकाराचे मॉडेल देशासाठी उपयुक्त ः मुख्यमंत्री बघेल
https://1.bp.blogspot.com/-PSWdOTjMWWM/X_8Huzjm2UI/AAAAAAABnEY/SRl9UCQA-sUmqJBb5ouWH7bf3hx3S_ZsQCLcBGAsYHQ/s320/Sangamner%2BNews.JPG
https://1.bp.blogspot.com/-PSWdOTjMWWM/X_8Huzjm2UI/AAAAAAABnEY/SRl9UCQA-sUmqJBb5ouWH7bf3hx3S_ZsQCLcBGAsYHQ/s72-c/Sangamner%2BNews.JPG
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates
https://www.lokmanthan.com/2021/01/blog-post_889.html
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/2021/01/blog-post_889.html
true
1708963956808886337
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content