उपजिल्हाधिकारी उर्मिला पाटील व तहसीलदार ज्योती देवरे यांनी केले मार्गदर्शन पारनेर/प्रतिनिधी ः पारनेर तालुक्यातील 88 गावातील ग्रामपंचायतीची...
उपजिल्हाधिकारी उर्मिला पाटील व तहसीलदार ज्योती देवरे यांनी केले मार्गदर्शन
पारनेर/प्रतिनिधी ः पारनेर तालुक्यातील 88 गावातील ग्रामपंचायतीची निवडणूक पार्श्वभूमीवर मतदान अधिकारी व कर्मचारी यांच्या नियुक्त्या करण्यात आलेल्या आहेत. जवळपास दोन हजार अधिकारी-कर्मचार्यांची या कामासाठी नियुक्ती करण्यात आल्या आहेत. त्यांचे प्रशिक्षण पारनेर तहसिल कार्यालयामध्ये शनिवारी पार पडले.
तालुक्यातील 88 ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत आहेत. त्यासाठी 287 प्रभाग आहे. त्या प्रभाग निहाय पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. जवळपास 330 पथके या कामासाठी नियुक्त करण्यात आले आहेत. त्यांचे प्रशिक्षण उपजिल्हाधिकारी उर्मिला पाटील यांच्या अध्यक्षतेखाली तहसिलदार ज्योती देवरे यांनी दिले. 15 जानेवारी रोजी होणार्या मतदानासाठी या कर्मचार्यांना ईव्हीएम मशीन, तसेच प्रत्यक्ष मतदान घेण्यासाठी लागणार्या मार्गदर्शक सूचना तहसीलदार देवरे यांनी दिल्या. यामध्ये निवडणुकीच्या दिवशी मतदान केंद्रावर करावे लागणारे कामकाज या कामकाजासंदर्भात येणार्या अडचणींबाबत सूचना मार्गदर्शन केंद्राध्यक्षांनी मतदान दिवशी करावयाची कामे यासंदर्भात प्रशिक्षण देण्यात आले. तसेच इतर मतदान अधिकारी यांना देखील यावेळी मार्गदर्शन व प्रशिक्षण देण्यात आले. या कामासाठी तालुक्यातील शाळांमधील शिक्षक व कर्मचारी यांच्या नियुक्त्या करण्यात आले आहेत. यांना हे प्रशिक्षण देण्यात आले यावेळी उपजिल्हाधिकारी उर्मिला पाटील यांनी तहसीलदार ज्योती देवरे यांचे नियोजन अतिशय चांगल्या पद्धतीने केल्याबाबत व पथकांना दिलेल्या नावाबाबत व इतर बाबीं बाबत कौतुक केले. तालुक्यातील विविध भागातून प्रशिक्षणासाठी शिक्षक कर्मचारी या ठिकाणी उपस्थित झाले होते त्यांचे चांगले नियोजन तहसिल प्रशासनाने केले होते. नियुक्त केलेल्या अधिकारी कर्मचार्यांसाठी दोन प्रशिक्षण शिबिर घेण्यात येणार आहे त्यापैकी पहिले शिबीर पार पडले यामध्ये जवळपास दोन हजारांहून अधिक अधिकारी-कर्मचार्यांनी प्रशिक्षण घेतले आहे.