कराड / प्रतिनिधी : पर्यावरण व वातावरणातील बदल विभाग मंत्रालयाच्या वतीने दोन ऑक्टोबर ते 31 मार्च 2021 या कालावधीमध्ये माझी वसुंधरा अभियान र...
कराड / प्रतिनिधी : पर्यावरण व वातावरणातील बदल विभाग मंत्रालयाच्या वतीने दोन ऑक्टोबर ते 31 मार्च 2021 या कालावधीमध्ये माझी वसुंधरा अभियान राबविले जात आहेत. त्या अनुषंगाने येथील पालिकेच्या वतीने काढलेल्या सायकल महारॅलीचे नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
ढेबेवाडी फाटा येथे पोलीस उपअधीक्षक डॉ. रणजित पाटील यांनी हिरवा झेंडा दाखवून महारॅलीस प्रारंभ झाला. यावेळी नगराध्यक्ष नीलम येडगे, उपाध्यक्ष मनोहर शिंदे, बांधकाम सभापती राजेंद्र यादव, नियोजन व शिक्षण सभापती प्रशांत चांदे, महिला व बालकल्याण सभापती शकुंतला शिंगण, उपसभापती स्वाती तुपे, इंद्रजित चव्हाण, आनंदी शिंदे, गीतांजली पाटील, नंदा भोसले, कमल कुराडे, पूजा चव्हाण, नगरसेवक सागर जाधव, आनंदराव सुतार, मुख्याधिकारी राहुल मर्ढेकर, हॉटेल असोसिएशनचे कुलकर्णी, रोटरी क्लबचे अध्यक्ष सलीम मुजावर व सदस्य, लायन्स क्लबचे अध्यक्ष सुशांत व्हावळ, डॉ. संजय पवार, नूतन मराठी विद्यालयाचे शिक्षक व विद्यार्थी, तसेच माझी वसुंधरा अभियानाचे नोडल अधिकारी मनीषा फडतरे, पुंडलिक ढगे, विभाग प्रमुख राजेश काळे, शशिकांत पवार, आत्माराम मोहिते, ज्ञानदेव साळुंखे, पटेल, धन्वंतरी साळुंखे, प्रिया तारळेकर, रमेश बागल, हेमंत पलंगे, अमर तडाखे अशा एकूण 200 सायकलस्वारांनी प्रत्यक्ष सहभाग नोंदवला. प्रदूषणमुक्त मलकापूर शहरासाठी हा संदेश देण्यासाठी सर्वांनी सायकलचा वापर करण्याचा संकल्प केला.
ही महारॅली ढेबेवाडी फाटा, गणेश कॉलनी, ढेबेवाडी फाटा, संगम हॉटेल, मलकापूर फाटा, लक्ष्मीनगर असा होता. प्रत्येक महिन्याच्या 9 तारखेस सायकल रॅली आयोजित करून प्रदूषणमुक्त मलकापूर करण्याचा संकल्प उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे यांनी व्यक्त केला. रॅलीमध्ये सहभागी झालेल्या सायकलस्वारांना सहभाग प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. राजेंद्र यादव यांनी आभार मानले.