मुंबई : कोरोनाचे संकट अजुनही संपलेले नाही. त्यातच आता देशावर बर्ड फ्लूचे संकटही वाढताना दिसते आहे. देशातील आठ राज्यांत बर्ड फ्लूचा मोठा फैला...
मुंबई : कोरोनाचे संकट अजुनही संपलेले नाही. त्यातच आता देशावर बर्ड फ्लूचे संकटही वाढताना दिसते आहे. देशातील आठ राज्यांत बर्ड फ्लूचा मोठा फैलाव झाला आहे. याबाबत आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी यावर तात्काळ लगाम लावण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले आहे.
संसर्ग झालेले अथवा मरण पावलेले पक्षी आढळल्यास तात्काळ डॉक्टरांशी संपर्क साधून योग्य ती काळजी घ्यावी असे ते म्हणाले. तर 16 तारखेपासून कोरोनाच्या लसीकरणाला सुरुवात होणार आहे. यात 8 लाख आरोग्य कर्मचाऱ्यांची नावे अपलोड केलेली आहेत. राज्यात 8 शहरात 511 ठिकाणी लसीकरण केले जाणार आहे. यापैकी मुंबई महापालिकेच्या कूपर आणि जालना येथील रुग्णालयात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पंतप्रधान स्वत: आढावा घेणार आहेत, असे राजेश टोपे यांनी सांगितले आहे.