$type=ticker$snippet=hide$cate=0

सुंठ जळाला, तरी पीळ कायम

 काही लोकांचा स्वभाव असा असतो, तरी तो कधीही बदलत नाही. संत ज्ञानेश्‍वरांनी निंबाचिया झाडा साखरेचे आळे...असं म्हटलं आहे. याचा अर्थ लिंबाच्या ...

 काही लोकांचा स्वभाव असा असतो, तरी तो कधीही बदलत नाही. संत ज्ञानेश्‍वरांनी निंबाचिया झाडा साखरेचे आळे...असं म्हटलं आहे. याचा अर्थ लिंबाच्या झाडाला साखरेचं पाणी घातलं, तर लिंबोळीचा कडवटपणा कधी जात नाही. याचा अर्थ माणसाचा मूळ स्वभाव कधी जात नाही, असा होतो. अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचंही तसंच आहे. पडलो, तरी नाक वरच अशी त्यांची भूमिका असते. विषारी वृक्षाची फळं विषारीच असतात. त्यांना कितीही साखर घातली, तरी काहीही फरक पडत नाही. 


अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चार वर्षे विभाजनवादाला खतपाणी घातलं. वंशवादाला प्रोत्साहन दिलं. अमेरिकेच्या संसदेत झालेल्या हिंसाचाराला समर्थन दिलं. अमेरिकेच्या अध्यक्षांवर एकाच टर्ममध्ये दोनदा महाभियोग प्रस्ताव येण्याची नामुष्की त्यांच्यावर आली. सर्व आयुधं वापरूनही ट्रम्प यांचं काहीच चाललं नाही. दंगल घडवून जो बायडेन यांच्या विजयावर शिक्कामोर्तब होणार नाही, याची त्यांनी केलेली व्यवस्था फोल ठरली. लोकशाही वाचविण्यासाठी अनेक हात कामाला लागले. सिनेटर, निवडणूक निर्णय अधिकारी यांच्यासह सर्वांना मॅनेज करू, असं ट्रम्प यांना वाटलं; परंतु पैसा, दडपशाही आदींपुढं नमतं न घेणारी आणि लोकशाहीला दैवत मानणारी माणसं असतात. ती बधली नाही. त्यामुळं ट्रम्प यांची डाळ शिजली नाही. त्यांना व्हाईट हाऊस खाली करावं लागलं. झालं गेलं विसरून गंगेला मिळाल्याप्रमाणं त्यांनी बायडेन यांच्या शपथविधीला हजर राहायला हवं होतं. राजशिष्टाचाराचा तो भाग आहे; परंतु कोणतेही संकेत पाळायचेच नाहीत, हे जणू ट्रम्प यांनी ठरवून टाकलेलं असावं. निरोपाच्या भाषणात त्यांनी गेल्या चार वर्षांत केलेल्या कामाचा आढावा घेण्यात गैर काहीच नाही; परंतु त्यात अहंपणाच जास्त होता. ट्रम्प यांनी आपल्या कार्यकाळातील शेवटच्या काही दिवसांमध्ये झालेल्या राजकीय हिंसेवर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला; परंतु त्याचबरोबर अमेरिकच्या संसदेत झालेला हल्ला ही राजकीय सुरुवात असल्याचा इशारा दिला. मोजके पाठीराखे वगळता संपूर्ण अमेरिका विरोधात जाऊनही त्यांना शहाणपण आलं नाही, हेच त्यांच्या इशार्‍यावरून दिसतं. एका फेअरवेल व्हिडीओमध्ये ट्रम्प यांनी अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष जो बायडेन यांना शुभेच्छा दिल्या. ही औपचारिकता पूर्ण करतानाही त्यांनी कुठंही बायडेन यांचा नामोल्लेख केला नाही. याचा अर्थ त्यांच्या मनात विष किती खोलवर रुजलं आहे, हे लक्षात येतं. या आठवड्यात आपल्याला नवीन सरकार मिळणार आहे. आम्ही सर्व प्रार्थना करतो, की नवीन सरकारला अमेरिकेला सुरक्षित आणि समृद्ध ठेवण्यात यश मिळो, असं ट्रम्प म्हणाले. आम्ही त्यांना शुभेच्छा देत आहोत; पण त्याच वेळी नशीबही त्यांना साथ देवो हीच प्रार्थना करतो, असं सांगताना बायडेन यांना त्यांनी अप्रत्यक्ष इशारा दिला आहे. अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या मतदानाच्या वेळी आणि मतमोजणीमध्ये घोळ झाल्याचे आरोप ट्रम्प यांनी केले होते; मात्र त्यांना यासंदर्भातील कोणतेही पुरावे सादर करता आले नाही. ट्रम्प यांनी आपल्या या शेवटच्या भाषणामध्ये बायडेन यांचा थेट उल्लेख एकदाही केला नाही. त्यांनी नवीन सरकारचा उल्लेख करताना, पुढील सरकार असा केला. ट्रम्प यांच्या अनेक समर्थकांना अध्यक्ष निवडणुकीमध्ये घोळ झाल्याचं वाटतं. ट्रम्प यांनी मागील चार वर्षांचा कार्यकाळ म्हणजे अमेरिकेतील लोकांसाठी एखाद्या विजयासारखा असल्याचा दावा केला. आपल्या भाषणात ट्रम्प यांनी आपल्या प्रमुख कामगिरीमध्ये मध्य-पूर्वेतील देशांमध्ये शांतता प्रस्थापित करणं, कोरोना विषाणूसंदर्भातील लसीकरणाबरोबरच इतर काही गोष्टींचा उल्लेख केला. कोरोनाच्या हाताळणीत त्यांना आलेल्या अपयशाचा, कोरोनाविषयक नियमांच्या पायमल्लीचा आणि कोरोना झाला असताना सभा घेतल्याचं पाप त्यांच्याच माथी आहे, हे ते विसरले. आत्यंतिक राष्ट्रवादाचा पुरस्कार करून अमेरिकेच्या पदरी काय पडलं, याचा ताळमेळ त्यांनी मांडला असता, तर अधिक चांगलं झालं असतं; परंतु त्याऐवजी आपल्याला एकट्यालाच अमेरिकेची चिंता असल्याचं ते दाखवित राहिले. अध्यक्ष म्हणून माझी सर्वांत पहिली प्राथमिकता ही अमेरिकेबद्दल सतत वाटणारी चिंता, येथील श्रमिक आणि अमेरिकन कुटुंबांचं सर्वोत्तम हीत हीच होती. कमीत कमी टीका होईल असा मार्ग निवडावा असा प्रयत्न मी कधीही केला नाही. मी अनेक कठीण विषयांवर कठोर निर्णय घेतले. कारण तुम्ही असे निर्णय घेण्यासाठीच माझी निवड केली होती, असं त्यांनी सांगितलं. ट्रम्प यांनी आपल्या समर्थकांना चिथावणी दिली. मी तुम्हाला सांगू इच्छितो, की आपल्याकडून सुरू करण्यात आलेल्या आंदोलनाची ही केवळ सुरुवात आहे. असं या पूर्वी कधीही काही घडलेलं नव्हते, असंही ट्रम्प म्हणाले. हा आगामी सरकारसाठी सूचक इशारा आहे. ट्रम्प यांनी सुरुवातीच्या काळात चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्यांशी जुळवून घेतलं. नंतर मात्र त्यांनी चीनशी शीतयुद्ध सुरू केलं. कोरोनाच्या विषाणूचं जन्मस्थळ चीन असल्यानंतर त्यांनी चीनच्याविरोधात जगाला उभं केलं. शीतयुद्धाचा परिणाम चीनवर फारसा झाला नाही. ट्रम्प यांच्या प्रशासनानं जाता जाता चीनला पुन्हा एक दणका दिला. ट्रम्प यांच्या प्रशासनानं चीननं उइगर मुस्लिमांचा नरसंहार केला आणि हा मानवतेविरुद्ध केलेला गुन्हा असल्याच्या भूमिकेवर आम्ही ठाम आहोत असं म्हटलं आहे. अमेरिकेचे सेक्रेट्री ऑफ स्टेट असणार्‍या माईक पॅम्पो यांनी चीनमधील शिनजियांगच्या पश्‍चिमेला राहणार्‍या उझगर मुस्लिमांवर होणार्‍या अन्यायाविरोधात ट्रम्प प्रश्‍नासनाची भूमिका शेवटपर्यंत ‘जैसे थे’च आहे असं स्पष्ट केलं. अमेरिकेच्या या वक्तव्यामुळं बीजिंगला ट्रम्प यांच्या अध्यक्षपदाच्या शेवटच्या दिवशीही मोठा झटका सहन करावा लागल्याचं आंतरराष्ट्रीय राजकारणाचे जणकार सांगतात. शिनजियांगमधील स्वतःचं (चीनचे) धोरण, पद्धती आणि गैरवर्तवणुकीसंदर्भाती विस्तृत माहिती देणार्‍या कागदपत्रांच्या आधारे पोम्पिओ यांनी चीनमध्ये उइगर मुस्लिमांवर होत असणारा हिंसाचार हा किमान मार्च 2017 पासून सुरू असल्याचं म्हटलं आहे. चीननं कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वाखाली शिनजियांगच्या पश्‍चिमेला राहणार्‍या उझगर मुस्लिमांबरोबरच अल्पसंख्यांकांचा नरसंहार केला आहे, असं पोम्पिओ यांनी म्हटलं आहे. हा नरसंहार सुरू असून या माध्यमातून उइगर मुस्लिमांना चीनमधून कायमचं संपवण्याचा चीनचा विचार आहे, असंही पोम्पिओ यांनी नमूद केलं आहे. ट्रम्प प्रशासनाच्या या भूमिकेमुळं जगातील दोन आर्थिक महासत्ता असणार्‍या देशांमधील संबंध आणखी ताणले जाण्याची शक्यता आहे. मागील वर्षी करोनाचा फैलाव झाल्यानंतर ट्रम्प यांनी चीनवर अनेक आरोप केले होते. त्यानंतर 2020 च्या उत्तरार्धामध्ये चीन आणि अमेरिकेचे संबंध मागील काही दशकांमधील सर्वाधिक बिघडलेले होते.

शिनजियांगमध्ये सुरू असणार्‍या सरकार पुरस्कृत हिंसेवरुन अनेकदा चीनवर जागतिक स्तरावर टीका झाली आहे; मात्र चीननं कायमच इथं चालवण्यात येणारे कार्यक्रम हे ‘व्होकेशन ट्रेनिंग सेंटर्स’ म्हणजेच प्रशिक्षण शिबिरं असल्याचा दावा केला आहे. स्थानिकांना नवीन कला आणि कौशल्य शिकवलं जात असल्याचा दावा चीननं केला आहे; मात्र अनेक देशांनी या छावण्यांमध्ये उइगर मुस्लिमांवर अत्याचार केले जात असल्याचा आरोप केला आहे. अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष जो बायडेन यांनीही आपल्या निवडणूक प्रचारामध्ये चीनमधील शिनजियांगमध्ये नरसंहार होत असल्याचा उल्लेख केला आहे. ट्रम्प प्रशासनानं शेवटच्या दिवशी केलेल्या या घोषणेमुळं चीनला थेट काही आर्थिक फटका बसणार नाही; मात्र यामुळे इतर देशांनी शिनजियांगमध्ये उद्योग स्थापन करताना विचार करण्याची गरज असल्याचे संकेत यामधून अमेरिकेने दिले आहेत. या प्रांतामध्ये कापसाची मोठ्या प्रमाणात शेती होत असल्यानं जागतिक स्तरावरील अनेक कंपन्या खास करुन कापड निर्मिती क्षेत्रातील कंपन्यांचे या प्रांताशी आर्थिक हितसंबंध जोडलेले आहेत. मागील आठवड्यातच अमेरिकेनं शिनजियांगमध्ये उत्पादन घेतल्या जाणार्‍या कापसाच्या आणि टोमॅटोच्या आयातीवर निर्बंध आणले. त्याचा परिणाम चीनच्या अर्थव्यवस्थेवर होणार आहे. अन्य देशही चीनमधील गुंतवणुकीत हात आखडता घेऊ शकतात.


Name

] ब्रेकिंग,859,Agralekh,3,desh,2,IPL 2020,19,kolhapur,3,Latest News,5746,letest News,598,Loksabha-2019,164,Maharashtra,193,Maharashtra.,2,Mumbai,42,New Window,210,News,319,sangli,33,satara,132,satara.,2,updates,453,Videsh,2,Vishesh,2,अर्थ,173,अहमदनगर,10294,औरंगाबाद,363,क्रीडा,678,दखल,702,देश,4424,नाशिक,803,पुणे,732,बीड,1435,बुलडाणा,25,बुलढाणा,877,ब्रेकिंग,16349,ब्रेकिंग न्युज,116,मनोरंजन,166,महाराष्ट्र,13576,महाराष्ट्र सातारा,41,मुंबई,3682,विदेश,650,संपादकीय,1545,सातारा,3198,
ltr
item
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: सुंठ जळाला, तरी पीळ कायम
सुंठ जळाला, तरी पीळ कायम
https://1.bp.blogspot.com/-CaHGPFwPRdk/YAggW-7IzXI/AAAAAAABnWg/aIzXGdQ6IfkMDY4ETpz_E532KwnjctdWQCLcBGAsYHQ/s0/image.png
https://1.bp.blogspot.com/-CaHGPFwPRdk/YAggW-7IzXI/AAAAAAABnWg/aIzXGdQ6IfkMDY4ETpz_E532KwnjctdWQCLcBGAsYHQ/s72-c/image.png
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates
https://www.lokmanthan.com/2021/01/blog-post_914.html
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/2021/01/blog-post_914.html
true
1708963956808886337
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content