सातारा / प्रतिनिधी : जावळी तालुक्यात 17 ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या विचारांची सत्ता आल्याची माहिती देण्यासाठी राष्ट्रवादीचे नेत...
सातारा / प्रतिनिधी : जावळी तालुक्यात 17 ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या विचारांची सत्ता आल्याची माहिती देण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते व जिल्हा परिषद सदस्य दीपक पवार यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती. त्यावेळी त्यांनी सातारा पालिका निवडणुकीचे रणशिंग लवकरच महाविकास आघाडीच्या माध्यमातून फुकंले जाणार असल्याचे स्पष्ट केले. दरम्यान, याबाबत राष्ट्रवादीचे नेते खा. शरद पवार यांनी आम्हाला पुर्ण ताकदीने उतरण्याचा सल्ला दिला आहे.
पवार म्हणाले, आगामी काळात आमचे लक्ष सातारा पालिका निवडणुकीकडे आहे. त्याबाबत पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्याशी बोलणे झाले आहे. त्यांनी महाविकास आघाडीतील व समविचारी पक्षांशी चर्चा करण्यास सांगितले आहे. ताकदीने निवडणुकीत उतरण्यास त्यांची संमती आहे. त्या दृष्टीने आम्ही पालिका क्षेत्रात बैठका सुरू केल्या आहेत. काही विद्यमान नगरसेवक तसेच शहरातील कार्यकर्ते आमच्या संपर्कात येत आहेत. सातारा शहराचा पाहिजे असा विकास अद्याप झाला नाही. त्यामुळे राज्याच्या सत्तेचा लाभ सातार्याच्या विकासासाठी करून घेता यावा. यासाठी सातारकरांनी महाविकास आघाडीच्या मागे खंबीर उभे राहावे, असे आवाहन पवार यांनी केले.
सातारा पालिका निवडणुक लढण्यासंदर्भात
खा. शरद पवार यांचा कार्यकर्त्यांना सल्ला