कोपरगाव शहर प्रतिनिधी- कोपरगाव नायब तहसीलदार मनिषा प्रभाकर कुलकर्णी वय वर्ष ४४ या आपल्या मुलाला नोकरीच्या शोधात असतांना नोकरीच...
कोपरगाव शहर प्रतिनिधी- कोपरगाव नायब तहसीलदार मनिषा प्रभाकर कुलकर्णी वय वर्ष ४४ या आपल्या मुलाला नोकरीच्या शोधात असतांना नोकरीची जाहिरात वाचून नगर येथिल एम. एस. ई. बी. कार्यालयात गेले असता तिथे त्यांना तुमचा मुलाला क्लार्क या पदावर नोकरी मिळुन देतो असे आमिष दाखवणारा आरोपी नितीन शहाजी धुमाळ रा. मुसळवाडी, ता.राहुरी जि. अहमदनगर भेटला व त्याने या नोकरी पोटी कुलकर्णी यांच्या कडे तीन लाख रुपयांची मागणी करत आता दीड लाख रुपये द्या व बाकी काम झाल्यानंतर द्या नंतर अशी मागणी करत. त्या नंतर कुलकर्णी यांच्या सोबत आरोपीने गोड बोलून विश्वास संपादन करत मुलास नोकरीचे अमिष दाखवून एप्रिल २०१८ ते जुन २०१८ पर्यंत
१,३२०००/- रुपये एम.एस.ई.बी.
ऑफीस अ.नगर येथे तसेच अक्सिस बॅक शाखा अहमदनगर
खात्यात जमा करायला लावले. यातून माझी फसवणुक झाली असल्याची तक्रार पीडित मुलाची आई कोपरगावच्या नायब तहसीलदार मनीषा कुलकर्णी यांनी गुरुवार दि २१ जानेवारी रोजी सायंकाळी कोपरगाव शहर
पोलिसात नोंदवली आहे. या घटनेचा पुढील तपास कोपरगाव शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांच्या
मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ. ३९१ आर. पी. पुंड हे करीत आहेत.