राहुरी प्रतिनिधी : राहुरी तालुकयातील सडे येथील श्लोक पोल्ट्री फार्म वर चार दिवसांपूर्वी अचानक कोंबड्या मृत आढळलया होत्या मृत पक...
राहुरी प्रतिनिधी : राहुरी तालुकयातील सडे येथील श्लोक पोल्ट्री फार्म वर चार दिवसांपूर्वी अचानक कोंबड्या मृत आढळलया होत्या मृत पक्षाचे नमुने भोपळ येथे तपासणी साठी पाठविले होते त्याचा अहवाल २५ जानेवारी रोजी पॉजिटीव्ह आल्याने अहमदनगरचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी त्या पोल्ट्री फार्म वरील सुमारे ४००० पक्षी व त्या पोल्ट्री फार्म पासून सुमारे १ किलोमीटर परीसरातील पक्षाना मारण्याचे आदेश दिले आहेत अशी माहिती सहाय्यक आयुक्त पशु संवर्धन अधिकारी संतोष पालवे यांनी दिली
तर १० किलो मीटर परिसरातील पक्षाच्या निर्यातीवर व विक्रीवर ९० दिवसासाठी बंदी घालण्यात आली आहे .
जिल्हहाधिकारी यांच्या आदेशाने या पक्षांना मारण्यासाठी पशु विभागाकडून ४ लोकांच्या ८ टीम कार्य करत होत्या या मध्ये जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉक्टर एस के तुभांरे, सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन अधिकारी संतोष पालवे ,अमर माने ,डॉक्टर अशोक ठवाळ ,प्रदीप सातपुते डॉक्टर प्रकाश लहारे ,शशिकांत खामकर, नवनाथ मेहेत्रे ,वैभव वाकडे, डॉक्टर दत्ताजी जठार, डॉक्टर राजेंद्र शेटे ,डॉक्टर त्रिंबक लांबे होते तर महसुल चे मंडलाधिकारी दत्तात्रय गोसावी , तलाठी अमोल कदम, कोतवाल बाप्पू जाधव पोलीस पथकातील हे.काँ.बः-हाटे,पोलीस कॉन्स्टेबल आजिनाथ पालवे, पोलीस नाईक अमित राठोड, पोलीस कॉन्स्टेबल रमेश शिंदे, वाहनचालक उत्तरेश्वर मोराळे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता
तर सरपंच चंद्रकांत प्रभाकर पानसंबळ ,उपसरपंच अमोल ज्ञानदेव धोंडे, गणेश भिमराज घोरपडे ,विनय गरुड ,अल्ताफ पठाण ,किशोर म्हसे. आदींनी प्रशासनाला सहकार्य केले व परिसरातील पक्षी सर्वे मध्ये मोलाचे काम करत जनतेमध्ये प्रबोधन केले.