$type=ticker$snippet=hide$cate=0

हनीट्रॅपमध्ये अडकलेल्या मुंडेच्या मदतीला भाजप!

कोणी कोणत्या मार्गानं पैसा कमवावा, याचा घरंबंध राहिलेला नाही. वैध मार्गानं मिळवलेल्या आणि घामातून मिळवलेल्या पैशांना एक प्रकारचा सुगंध असतो....

कोणी कोणत्या मार्गानं पैसा कमवावा, याचा घरंबंध राहिलेला नाही. वैध मार्गानं मिळवलेल्या आणि घामातून मिळवलेल्या पैशांना एक प्रकारचा सुगंध असतो. बेईमानानं आणि अवैध मार्गानं मिळवलेल्या पैशाला दुगर्ंधी असते. हा पैसा फार काळ टिकत नाही. असं असलं, तरी कमी श्रमात जादा पैसे मिळवण्याची हाव स्वस्थ बसू देत नाही. लेदर करन्सी हा अलिकडं वाढलेला मोठा धंदा असून हनीट्रॅपच्या गोंडस नावाखाली कोट्यवधी रुपयांना गंडविलं जातं. राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या मदतीला आता भाजप आणि मनसे धावून आली! 


सौंदर्याला व्यापक अर्थ असतो. ती दैवी देणगी असते. सौंदर्य हे पैसे कमविण्याचं साधन बनता कामा नये; परंतु अलिकडच्या काळात सौंदर्याचा वापर पैसे कमविण्यासाठी केला जात आहे. त्यातही सौंदर्याचा वापर करून वैध मार्गानं पैसा कमविला, तर त्याला कुणाचाही विरोध असण्याचं काहीच कारण नाही; परंतु सौंदर्याचा वापर कृष्णकृत्यांसाठी केला जाऊ नये, ही माफक अपेक्षा बाळगणं चुकीचं नाही. सौंदर्याचा वापर करून चांगल्या मार्गानं पैसा कमविता येतो. दुसरा मार्ग चुकीचा असला, तरी त्या मार्गाने जाणार्‍यांची संख्या दुर्दैवानं वाढत आहे. सौंदर्य आणि घायाळ करणार्‍या नजरांचा वापर करून आपल्या जाळ्यात ओढायचं. ब्लॅकमेलिंग करायचं आणि त्या माध्यमातून त्यांच्याकडून कोट्यवधी रुपये मिळवायचे. त्यासाठी शिकारही राजकारणी किंवा पैसेवाल्यांची करायची, अशी जी पद्धत असते, तिला हनीट्रॅप म्हणतात. लष्कराची गुपितं मिळवण्यासाठी पाकिस्तान भारताच्या जवान आणि लष्करी अधिकार्‍यांना या जाळ्यात ओढत असल्याची कितीतरी प्रकरणं उघडकीस आली आहे. आता हनीट्रॅपचा विळखा राजकीय नेत्यांभोवती ही पडायला लागला आहे. सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे प्रकरणाच्या अगोदर अहमदनगर जिल्ह्यात झालेल्या हनीट्रॅपमध्ये राजकीय नेत्यांना आणि पोलिस अधिकार्‍यांनाही कसं अडकवलं गेलं याच्या सुरस कथा बाहेर आल्याच होत्या. हनीट्रॅप करणार्‍या महिलांकडं कोटयवधीची संपत्ती येते कशी, त्या बीएमडबल्यूसारख्या महागड्या वाहनांतून फिरतात कशा, असा प्रश्‍न सामान्यांना पडायचा; परंतु ज्यांना या हनीट्रॅपची माहिती होती, त्यांना त्यातील अर्थकारण किती मोठं आहे, याची कल्पना होती. अशा मार्गानं पैसे मिळवण्याच्या प्रकाराला इंग्रजीत लेदर करन्सी म्हणतात. तिचं प्रमाण गेल्या काही वर्षांत वाढलं आहे. अशा प्रकारणाचा समाज विघातक अवैध व्यवसाय करणार्‍या महिलांपेक्षा शरीरविक्रय करून पोटाची खळगी भरणार्‍या महिला कितीतरी चांगल्या म्हणायच्या. सहमतीने संबंध ठेवायचे आणि नंतर पैशासाठी ब्लॅकमेलिंग करायचे, अशा वृत्तीच्या महिलांमुळे खर्‍या बलात्कार पीडित महिलांवर अन्याय होतो, त्यांनाही शरमेनं मान खाली घालावी लागते, त्यांनाही कुलंट ठरविलं जातं, हे कुणाच्या लक्षात येत नाही. नेमकी ही बाब मनसेच्या नेत्या रुपाली पाटील यांनी अधोरेखित केली. पैशासाठी कोण कुठल्या थराला जाईल, याचा भरवसा नसतो. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन नेत्यांवर एकामागून एक बलात्काराच्या फिर्यादी दाखल झाल्यानं हा पक्ष बॅकफूटवर गेला होता; परंतु नंतर त्यातील एक एक पडदा जेव्हा उघडत गेला, तेव्हा या पक्षालाही हायसं वाटलं असेल.

धनंजय मुंडे हा पक्षातला महत्त्वाचा आणि प्रभावी ओबीसी चेहरा. त्यांना इतक्या गंभीर प्रकरणात सांभाळून घेतलं, तर पक्षाला त्याचे परिणाम भोगावे लागतील, ही शक्यता असल्यानं पक्षानं त्यांचा राजीनामा घेण्याची तयारी केली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी तसे संकेत दिले होते. एकीकडं पक्षानं पाठराखण करायची आणि त्याचवेळी त्यांना राजीनामा द्यायला भाग पाडून आरोपाची राळ कमी होईल, अशी व्यवस्था करायची, असं ठरलं होतं; परंतु बलात्काराचे आरोप करणार्‍या रेणू शर्मा हिचे अनेक प्रकार जेव्हा बाहेर आले, तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसनंही आपल्या निर्णयाचा पुनर्विचार केला असावा. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, उपमुख्यमंत्री अजित पवार, ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल आदींच्या वारंवार बैठका झाल्या. पोलिस आयुक्त विश्‍वासराव नांगरे पाटील यांना भेटीला बोलवून शरद पवार यांनी या प्रकरणातील वस्तुस्थिती जाणून घेतली. मुंडे यांचा राजीनामा घेतला, तर काय पडसाद उमटतील आणि नाही घेतला, तर त्याच्या काय प्रतिक्रिया येतील, यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर समितीच्या बैठकीत चर्चा झाली. भाजपचे माजी आमदार कृष्णा हेगडे अचानक राष्ट्रवादी काँग्रेसच्या मदतीला धावून आले. त्यामुळे मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी दबाव आणत असलेल्या आणि त्याविरोधात आंदोलनाची भाषा करणार्‍या भाजपचीच अडचण  झाली. रेणू शर्मा हिनं आपल्याला कसं जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केला, ती कसे संदेश पाठवायची याबाबतची फिर्यादच त्यांनी दिली. दुसरीकडं मनसेच्या मनीष धुरी यांनीही रेणू हिच्यावर असेच गंभीर आरोप केले. या दोघांनी तिची पार्श्‍वभूमी माहिती करून घेऊन तिच्यापासून चार हात दूर राहण्याचा निर्णय घेतला. आपण सावरलो नसतो, तर 2008 मध्येच आपला मुंडे झाला असता, असं धुरी यांनी म्हटलं आहे. हेगडे आणि धुरी यांनी केलेले आरोप रेणुकानं फेटाळले असले आणि राजकारणी नेत्यांचे आरोप म्हणून त्यांच्याकडं दुर्लक्ष करायचं ठरविले, तरी मग जेट एअरवेज कंपनीत अधिकारी असलेल्याला प्रेमाच्या कथित जाळ्यात अडकवून नंतर त्याची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. त्याचं काय, हा प्रश्‍न उरतो. रेणूच्या वकिलाविरोधातही त्याच्या सहायक महिला सहकार्‍याच्या विनयभंगाचा गुन्हा दाखल आहे आणि तो भाजपचा कार्यकर्ता आहे. त्यामुळे त्याच्या आरोपावर आता किती विश्‍वास ठेवायचा, असं कुणाला वाटलं, तर असं वाटणार्‍यांचा तो दोष नाही. या पार्श्‍वभूमीवर बलात्काराचे गंभीर आरोप झालेल्या मुंडे यांना तूर्तास दिलासा मिळाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून त्यांचा राजीनामा घेतला जाणार नाही. मुंडे यांच्यावर आरोप झाल्यानंतर पक्षीय पातळीवर निर्णय घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसनं मुंबईत बैठक घेतली. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. रेणू शर्मा या महिलेनं मुंडे यांच्यावर आरोप केले आहेत हे खरं; मात्र ही महिला ब्लॅकमेलिंग करत असल्याची बाब समोर आली असल्याची चर्चा या बैठकीत झाली. त्यामुळं सध्यातरी मुंडे यांचा राजीनामा घेतला जाणार नाही, असा निर्णय पक्षानं घेतला आहे. त्याअगोदर मुंडे यांनी राजीनामा दिल्याची चर्चा होती. पक्षानं त्यांना राजीनामा द्यायला सांगितलं, अशाही बातम्या होत्या; परंतु त्या केवळ अफवा होत्या, हे आता स्पष्ट झालं आहे.

भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी ओबीसी नेत्याचा बळी द्यायला निघाला आहे, अशी टीका करायची आणि भाजपच्या अन्य नेत्यांनी मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करायची, अशा दोन्ही बाजूंनी राष्ट्रवादी काँग्रेसची कोंडी केली जात होती. जयंत पाटील यांच्या निवासस्थानी गुरुवारी रात्री उशिरापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीची बैठक पार पडली. या बैठकीत मुंडे यांच्यावरील आरोपांबाबत सविस्तर चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. या बैठकीनंतर पाटील यांनी पक्षाची भूमिका मांडली आणि पक्ष पूर्णपणे मुंडे यांच्या पाठीशी उभा असल्याचं दिसून आलं. त्याअगोदर मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप केलेल्या रेणू शर्मांवर भाजपचे माजी आमदार कृष्णा हेगडे यांनी पोलिसांकडं हनीट्रॅपमध्ये अडकवल्याची तक्रार दिली. यानंतर या प्रकरणाला वेगळं वळण मिळालं. मनसेचे नेते मनीष धुरी यांनीदेखील शर्मा यांच्यावर असाच प्रयत्न केल्याचा आरोप केला. हे प्रकरण ताजं असतानाच आता रेणू शर्मांचं आणखी एक प्रकरण समोर आलं. रेणू शर्मांनी जेट एअरवेज कंपनीत अधिकारी असलेल्या रिझवान कुरेशी नावाच्या तरुणाला छळल्याचा आरोप आहे. पोलिसांकडं असलेल्या कागदपत्रांपैकी काही कागदपत्रं माध्यमांच्या हाती लागली आहेत. यावरुन रेणू शर्मा यांनी कुरेशी यांच्यासोबत ’सोशल मीडिया’वरून ओळख झाल्यानंतर मैत्री केली. त्यानंतर भेटीगाठी, हॉटेलिंग आणि असं बरंच काही घडलं. हे जवळपास दोन वर्षे चाललं. त्यानंतर मात्र या महिलेनं रिझवान कुरेशी विरोधात याच आंबोली पोलिस ठाण्यात विनयभंगाची आणि बलात्कार करण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार दाखल केली. कुरेशी हे जेट एअरवेज कंपनीमध्ये अधिकारी आहेत. रेणू शर्मा ’सोशल मीडिया’वरील स्टार मेकर या ’चायनीज अ‍ॅप’वर गायनाचं काम करत होत्या. त्या अनेकांच्या संपर्कात असल्याचंही समोर आलं आहे. रिझवान कुरेशी यांनी पोलिसांत तक्रार केली. त्यांच्यावर पैसे मागणी आणि हनीट्रॅपचा आरोप करण्यात आला. त्यामुळं रिझवान यांच्यासोबत जे घडलं, तोच प्रकार हेगडे, धुरी आणि आता  मुंडे यांच्यासोबत घडतोय का, असा प्रश्‍न यानिमित्तानं उपस्थित केला जात आहे.

Name

] ब्रेकिंग,875,Agralekh,3,baramati,2,desh,2,IPL 2020,19,kolhapur,8,Latest News,5955,letest News,602,Loksabha delhi,1,Loksabha-2019,164,Maharashtra,383,Maharashtra.,5,Mumbai,42,New Window,210,News,321,sangli,79,satara,281,satara.,7,solapur,1,solapur pandharpur,1,updates,453,Videsh,2,Vishesh,2,अर्थ,206,अहमदनगर,10821,औरंगाबाद,379,क्रीडा,680,दखल,743,देश,4589,नाशिक,827,पुणे,850,बीड,1448,बुलडाणा,41,बुलढाणा,878,ब्रेकिंग,17411,ब्रेकिंग न्युज,120,ब्रेकिंग महाराष्ट्र,1,मनोरंजन,171,महाराष्ट्र,14719,महाराष्ट्र सातारा,44,मुंबई,4133,विदेश,665,संपादकी,2,संपादकीय,1630,सातारा,3217,
ltr
item
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: हनीट्रॅपमध्ये अडकलेल्या मुंडेच्या मदतीला भाजप!
हनीट्रॅपमध्ये अडकलेल्या मुंडेच्या मदतीला भाजप!
https://1.bp.blogspot.com/-giP99xU3v6s/YAGQNQZ80TI/AAAAAAABnIA/xp6COSvcy6AT1sbZvEgFrm-jMWQ5szEMQCLcBGAsYHQ/s0/image.png
https://1.bp.blogspot.com/-giP99xU3v6s/YAGQNQZ80TI/AAAAAAABnIA/xp6COSvcy6AT1sbZvEgFrm-jMWQ5szEMQCLcBGAsYHQ/s72-c/image.png
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates
https://www.lokmanthan.com/2021/01/blog-post_944.html
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/2021/01/blog-post_944.html
true
1708963956808886337
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content