$type=ticker$snippet=hide$cate=0

शेतकर्‍यांच्या आत्महत्येला केंद्र सरकारच जबाबदार : अण्णा हजारे

पारनेर/प्रतिनिधी : केंद्र सरकार कृषी मूल्य आयोगाच्या आडून शेतकर्‍यांची फसवणूक करत ओ, त्यामुळे मराठवाडा आणि विदर्भातील शेतकर्‍यांच्या आत्महत्...

पारनेर/प्रतिनिधी : केंद्र सरकार कृषी मूल्य आयोगाच्या आडून शेतकर्‍यांची फसवणूक करत ओ, त्यामुळे मराठवाडा आणि विदर्भातील शेतकर्‍यांच्या आत्महत्येत वाढ झाली असल्याचा आरोप ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केला आहे. 


    केंद्र सरकारच्या आडमुठया भुमिकेमुळे, आपण आंदोलनावर ठाम असल्याची भूमिका हजारे यांनी मांडली आहे. गेल्या 40-45 दिवसांपासून शेतकरी आंदोलन करत आहे, मात्र केंद्र सरकार कृषी कायदे रद्द करण्याच्या तयारीत नाही. त्यामुळे केंद्र सरकारच्या या आडमुठेपणाच्या भूमिकेविरोधात आपण जानेवारीमध्ये आंदोलन करणार असल्याचा इशारा हजारे यांनी दिला आहे. केंद्रीय कृषीमूल्य आयोगाला पाठविलेल्या अहवालामध्ये केंद्रीय कृषीमूल्य आयोगाने मोठ्या प्रमाणावर काटछाट केलेली आहे. एका बाजुला आम्ही सी 2+ 50% भाव देण्यास सुरूवात केली असे केंद्र सरकार म्हणते. तर दुसर्‍या बाजुला शेतकर्‍यांनी पिक उत्पन्नावर केलेला खर्च सुद्धा दिला जात नाही. उलट केंद्रसरकार त्यामध्ये काटछाट करते. ही शेतकर्‍यांची फसवणूक आहे. त्यामुळे शेतकरी आत्महत्या करतो असे हजारे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे म्हटले आहे. या पत्रकात हजारे यांनी म्हटले आहे की, विदर्भ, मराठवाड्यामध्ये कापूस, सोयाबीन, तांदूळ (पॅडी) ज्वारी, बाजरी, ही पिके मोठ्या प्रमाणात घेतली जातात. राज्य कृषिमूल्य आयोगाने शेतकर्‍यांना पिक उत्पन्नावर केलेला खर्च आणि केंद्र सरकारने दिलेले भाव आहे. 2019-20 मध्ये पिवळा सोयाबिन राज्याने केंद्राला शिफारस केलेली रक्कम प्रति क्विंटल 5755 रूपये मिळावी अशी शिफारस केली होती. त्यावर 50 टक्के किंमत वाढवून देणे आवश्यक आहे. पण 50 टक्के वाढवून न देता 5755 रुपये ऐवजी 3710 रुपये एवढीच आधारभूत किंमत दिली. म्हणजे प्रति क्विंटल 2045 रुपये कमी केले आहेत. 2020-21 मध्ये राज्याने शिफारस केलेली किंमत 6070 रुपये होती. त्यात 50 टक्के वाढवून देण्याऐवजी 3880 रुपयेच दिले म्हणजे 3190 रुपयांनी कमी दिले आहे. कापूस 7485 रुपये भाव राज्याने शिफारस केली. पण केंद्राने 4160 रुपयेच दिले. तांदुळ 2016-17 मध्ये 3053 रुपये शिफारस केली होती. त्यात 50 टक्के वाढवून देणे आवश्यक होते पण फक्त 1330 रुपयेच दिले. म्हणजे 1723 रुपयांनी कमी दिले. याप्रमाणे राज्य कृषीमूल्य आयोगाकडून केंद्रीय कृषीमूल्य आयोगाला खर्चावर आधारीत जे भाव पाठविले जातात त्यात 50 टक्के वाढवून देण्याऐवजी केंद्रीय कृषीमूल्य आयोगाकडून प्रत्येक पिकामध्ये काटछाट होते. शेतकर्‍यांना झालेला खर्च सुद्धा मिळत नाही म्हणून शेतकरी आत्महत्या करतो. केंद्रीय कृषीमूल्य आयोग हा केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या नियंत्रणात असल्याने ही काटछाट होते. त्यासाठी केंद्रीय कृषीमूल्य आयोगाला निवडणूक आयोगाप्रमाणे स्वायत्तता देणे आवश्यक आहे. संवैधानिक दर्जा मिळाला तरच शेतकर्‍यांच्या शेतीमालाला योग्य भाव मिळू शकेल. केंद्र सरकार जनतेला सांगत आहे की, स्वामीनाथन आयोगाच्या अहवालाप्रमाणे शेतकर्‍यांचा झालेला खर्च आम्ही किमान आधारभूत किंमत (एमएसपी) अधिक 50 टक्के वाढवून शेतकर्‍यांना देतो. पण प्रत्यक्षात ते मिळत नाहीत याउलट काटछाट होते. म्हणून विदर्भ, मराठवाड्यात आत्महत्या जास्त होतात. भाजीपाला, फळे, फुले, दुध यांचा एमएसपी अद्याप ठरविलेलाच नाही. त्यामुळे आज विदर्भातील संत्र्याची काय अवस्था आहे? संत्र्याला शेतकर्‍यांनी उत्पन्नावर केलेल्या खर्चावर 50% वाढवून मिळायला हवा. मात्र आज केलेला खर्च ही मिळत नाही. दुधाला एमएसपी दिला जात नाही. म्हणून शेतकरी दुध रस्त्यावर ओततो आहे. भाजीपाल्याला एमएसपी नसल्यामुळे टोमॅटो, बटाटा, कांदे रस्त्यावर फेकतो आहे. खर्चावर आधारीत 50 टक्के वाढवून तर मिळत नाहीच उलट 40 ते 50 टक्के पर्यंत कपात केली जाते. म्हणून विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये आत्महत्या होतात.असे हजारे यांनी म्हटले आहे.



शेतकर्‍यांच्या वरील मागण्यांसाठी 23 मार्च 2018 मध्ये आम्ही दिल्लीच्या रामलिला मैदानावर उपोषण झाले. 29 मार्च 2018 मध्ये पंतप्रधान कार्यालयाने लेखी आश्‍वासन देऊन ही पाळले नाही. म्हणून 30 जानेवारी 2019 रोजी रालेगणसिद्धी मध्ये उपोषण केले. केंद्रीय कृषी मंत्री राधा मोहन सिंह, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राळेगणसिद्धी मध्ये आले. सहा तास चर्चा होऊन पुन्हा लेखी आश्‍वासन देण्यात आले आणि पाळले नाही म्हणून मी आता पुन्हा दिल्लीच्या रामलिला मैदानावर जानेवारी 2021 मध्ये आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.

अण्णा हजारे, ज्येष्ठ समाजसेवक

Name

] ब्रेकिंग,844,Agralekh,3,desh,2,IPL 2020,19,Latest News,5534,letest News,582,Loksabha-2019,164,Maharashtra,103,Mumbai,41,New Window,210,News,314,satara,1,updates,452,Videsh,2,Vishesh,2,अर्थ,137,अहमदनगर,9945,औरंगाबाद,355,क्रीडा,675,दखल,658,देश,4146,नाशिक,775,पुणे,585,बीड,1423,बुलढाणा,858,ब्रेकिंग,15326,ब्रेकिंग न्युज,110,मनोरंजन,155,महाराष्ट्र,12410,महाराष्ट्र सातारा,6,मुंबई,3433,विदेश,635,संपादकीय,1461,सातारा,3152,
ltr
item
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: शेतकर्‍यांच्या आत्महत्येला केंद्र सरकारच जबाबदार : अण्णा हजारे
शेतकर्‍यांच्या आत्महत्येला केंद्र सरकारच जबाबदार : अण्णा हजारे
https://images2.sakalmediagroup.com/eSakal-Prod/s3fs-public/styles/generic_md_75/public/news-story/cover-images/4Anna_Hazare_38.jpg
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates
https://www.lokmanthan.com/2021/01/blog-post_954.html
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/2021/01/blog-post_954.html
true
1708963956808886337
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content