कराड / प्रतिनिधी : कराड तालुक्यातील शहापूर येथील जवान नाईक कृष्णत दिलीप कांबळे (34 वर्षे) यांचे कर्तव्य बजावत असताना आकस्मित निधन झाले. ते भ...
कराड / प्रतिनिधी : कराड तालुक्यातील शहापूर येथील जवान नाईक कृष्णत दिलीप कांबळे (34 वर्षे) यांचे कर्तव्य बजावत असताना आकस्मित निधन झाले. ते भारतीय सेनेत आर्मी सर्व्हिस कोअर ग्वाल्हेर (मध्य प्रदेश) येथे कार्यरत होते. जवान कांबळे यांच्या निधनाची बातमी समजताच गावावर शोककळा पसरली. त्यांच्या कुटुंबियांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता.
जवान कृष्णत कांबळे यांनी आपला सेवकाळ पूर्ण केला. मात्र त्यांना सैन्य दलाकडून दोन वर्षांचा कालावधी वाढवून देण्यात आला होता. त्यांच्या पश्चात आई, वडील, बहीण, पत्नी व आठ वर्षीय कन्या असा परिवार आहे. त्यांच्या निधनाच्या वृत्ताने परिसरातील नागरिकांनी हळहळ व्यक्त केला. त्यांचे पार्थिव कधी येणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.