$type=ticker$snippet=hide$cate=0

गोवंश रक्षणाच्या परीक्षेत अवैज्ञानिकता आणि असत्याचा आधार

आपल्या राज्य घटनेनं विज्ञानाचा स्वीकार केला. विज्ञान आणि असत्याचा आधार घेऊन एखादी गोष्ट काही काळ बिंबवता येत असली, तरी ती सदा सर्वकाळ बिंबवत...


आपल्या राज्य घटनेनं विज्ञानाचा स्वीकार केला. विज्ञान आणि असत्याचा आधार घेऊन एखादी गोष्ट काही काळ बिंबवता येत असली, तरी ती सदा सर्वकाळ बिंबवता येत नाही. धार्मिक असणं म्हणजे अवैज्ञानिक असणं नव्हे. तथ्थ्यांना मूठमाती देणं नव्हे; परंतु सरकारमधील उच्चपदस्थच जिथं अवैज्ञानिकतेऐवजी मिथ्थकाचा वारंवार आधार घेत असतील, तिथं या सरकारनं नेमलेल्या संस्थांनी तसं करणं हे ओघानंच आलं; परंतु त्यातून आपण डोळस पिढी घडविण्यापासून दूर जातो आहे, हे त्यांच्या लक्षात येत नाही

अध्यात्म जरूर अंगी बाळगलं पाहिजे; परंतु याचा अर्थ अंधश्रद्धा, परंपरांना कवटाळलं पाहिजे, असं नाही. महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाइतका सश्रद्ध समाज दुसरा कोणताही नाही; परंतु वारकरी संप्रदायानं विद्रोह केला. रुढी, परंपरांपेक्षा वैज्ञानिकता रुजविली. संत तुकाराम हे तर वैज्ञानिकतेचा पुरस्कार करणारे त्यांचे महामेरू. संत तुकारामांइतकी अध्यात्मकता तर कुणात नसेल. अनेक अवैज्ञानिक गृहितकांवर त्यांनी प्रहार केले. केंद्र सरकार धार्मिकता मानणारे आहे. धार्मिकता आणि अंधश्रद्धा, अवैज्ञानिकता वेगळे विषय आहेत; परंतु त्यांची सरमिसळ केली जातं आहे. प्रखर हिंदुत्ववादी असलेल्या आणि ज्यांचा कायम उदोउदो करणार्‍यांनी बॅ. वीर सावरकर यांची गाईबाबतची मतं मात्र सरकारमधील लोकांना मान्य नाहीत. गोवंश हत्या करण्याचा कायदा करण्यात आला. त्यातून केवळ संशयातून कशा हत्या करण्यात आल्या, याबाबतचा निकाल उच्च न्यायालयांनीच दिला. मृत जनावारंची कातडी बाळगणं गुन्हा नाही. तसंच केवळ गोवंशाचं मांस सापडलं, म्हणजे संबंधितांनी गोवशांची हत्या केली असा निष्कर्ष काढता येणार नाही, असं उच्च न्यायालयानंच म्हटलं आहे. त्यातही भारतीय जनता पक्षाचं याबाबतचं धोरण राज्यनिहाय बदलतं. ईशान्य, दक्षिण भारत आणि गोव्यात गोमांस भक्षणाचं समर्थन करायचं आणि इतर राज्यांत मात्र गोवंशाच्या हत्येप्रकरणी कारवाईचा आग्रह धरायचा, यात राजकारण सोडून अन्य काहीही नाही. गोवंश हत्येचा कायदा करण्यात आल्यानंतर संबंधित राज्यांत गोवंशाचं प्रमाण कसं घटले आणि ज्या राज्यांत गोवंश बंदी कायदा नाही, तिथं मात्र गोवंशाचं प्रमाण कसं वाढलं, याची आकडेवारीच मध्यंतरी प्रसिद्ध झाली. या आकडेवारीनं खरं तर सरकारच्या डोळ्यांत अंजन जायला हवं होतं. गोवंशच काय सर्वंच प्राणीमात्रांची संख्या वाढली पाहिजे, यात दुमत असता कामा नये; परंतु कायदा करून त्यानं काही साध्य होत नाही. मरतुकडी जनावरं पोसण्याचा भार शेतकर्‍यांवर टाकून त्यांचं जगणं सरकारनं आणखी कठीण केलं आहे. गोशाला काढण्यासाठीच्या वारेमाप घोषणा झाल्या; परंतु त्यांची काय स्थिती आहे, याचा संशोधनात्मक अभ्यास व्हायला हवा. राष्ट्रीय कामधेनू आयोग ही गायींच्या कल्याणासाठी स्थापन करण्यात आलेली सरकारी यंत्रणा आहे. ही संस्था 25 फेब्रुवारी रोजी देशभरात गायींवर आधारित एक परीक्षा घेणार आहे. कामधेनू गौ-विज्ञान प्रचार-प्रसार परीक्षा असं नाव या परीक्षेला देण्यात आलं आहे. परीक्षेत गौ विज्ञान हा शब्द आहे. त्यामुळं वैज्ञानिक कसोट्यांवर गाईंचं महत्त्व या विषयावर परीक्षा घेतली, तर त्याला कोणाचा आक्षेप असण्याचं काहीच कारण नाही. यामध्ये चार प्रवर्गांतील परीक्षार्थींसाठी स्वतंत्रपणे परीक्षा घेतली जाईल. यातील तीन प्रवर्ग हे प्राथमिक, माध्यमिक व महाविद्यालयीन अशा शैक्षणिक स्तरांनुसार करण्यात आले आहेत, तर चौथा प्रवर्ग सर्वसाधारण जनतेसाठी आहे. या परीक्षेमध्ये बहुपर्यायी तथ्यात्मक प्रश्‍न विचारले जाणार आहेत. तथ्थ्यात्मक प्रश्‍न असं म्हटल्यानं तथ्थ्य आणि वैज्ञानिक कसोट्या लावूनच परीक्षा घ्यायला हवी होती.

 

केंद्रीय शिक्षणमंत्री, राज्यांचे शिक्षणमंत्री, सर्व राज्यांच्या गौसेवा आयोगांचे अध्यक्ष, जिल्हा शिक्षण अधिकारी, सर्व शाळांचे मुख्याध्यापक, मुद्रित व इलेक्ट्रॉनिक माध्यमं, स्वयंसेवी संस्था आणि गायींचे देणगीदार आदींना या कार्यात सहभागी करून घेतलं जाणार आहे. गोवंश रक्षणासाठी परीक्षा घेतली जाणार असेल, तर तिला कुणाचा विरोध नाही; परंतु हे करताना काही अवैज्ञानिक तर केलं जात नाही ना, हे पाहायला हवं. विद्यार्थ्यांना ही परीक्षा देण्यासाठी उत्तेजन देण्याच्या दृष्टीनं सरकारी शाळांतील अधिकार्‍यांना कोणत्या मर्यादेपर्यंत यात सहभागी करून घेतलं जाणार आहे, हे ज्ञात नसलं, तरीही विद्यार्थी नऊ महिन्यांच्या खंडानंतर प्रत्यक्ष अध्ययनास सुरुवात करत असताना तसंच त्यांची वार्षिक परीक्षा जवळ येऊन ठेपलेली असताना, ही परीक्षा घेतली जाणार आहे. ते गैर आहे. आताच परीक्षा घेतली नाही, तर आभाळ कोसळणार नाही. शैक्षणिक अभ्यासक्रमाच्या पूर्ततेला अगोदर महत्त्व द्यायला हवं. अर्थात राष्ट्रीय कामधेनू आयोगानं या परीक्षेसाठी प्रसिद्ध केलेले अभ्यास साहित्य हा यातील सर्वांत रोचक भाग आहे. राष्ट्रीय कामधेनू आयोगानं त्यांच्या वेबसाइटवर डाउनलोड करून घेण्यासाठी एक 54 पानांची पीडीएफ फाइल प्रसिद्ध केली आहे. याशिवाय आणखी काही ब्लॉग पोस्ट्स, व्हिडिओज तसेच साहित्य प्रसिद्ध केलं जाईल, असंही आयोगानं नमूद केलं आहे. या साहित्याची भाषा पाठ्यपुस्तकांत सामान्यपणे वापरल्या जाणार्‍या भाषेहून बरीच वेगळी आहे. भूकंप होण्यामागं गोहत्या हे कारण असू शकतं इथपासून ते जर्सी गाय ही भारतीय गायींप्रमाणं भावनाप्रधान नाही इथपर्यंत अनेक दावे या ‘अभ्यासक्रमात’ करण्यात आले आहेत. ज्या परीक्षेच्या नावात ‘विज्ञान’ हा शब्द आहे, त्याच्या अभ्यासक्रमात अशा अनेक आक्षेपार्ह बाबींचा समावेश आहे. या पीडीएफ फाइलमधील मजकुरामध्ये विषयाची सामान्य अंगं समाविष्ट करण्यात आली आहेत. वेदांमध्ये नमूद करण्यात आलेलं गायीचं महत्त्व, प्राचीन ग्रंथांमध्ये आलेले गायींचे उल्लेख, गायी मानवजातीसाठी देत असलेली पाच मोठी योगदानं (दूध, तूप, दही, गोमूत्र आणि शेण), गायींना अधिक चांगलं अन्न कसं दिले जाऊ शकतं, त्यांची अधिक चांगली काळजी कशी घेतली जाऊ शकते, भारतात किती प्रकारच्या गायी आहेत आणि त्या कुठं आढळतात याबद्दलची आणि आणखी बरीच माहिती यामध्ये देण्यात आली आहे. ती ठीक असली, तरी गोवंश कमी होणं आणि भूकंप यांचा परस्परांशी काय संबंध, हे मात्र राष्ट्रीय कामधेनू आयोग सांगू शकलेला नाही. देशी गायी आणि परदेशी किंवा ‘एग्झॉटिक’ गायींमधील फरक स्पष्ट करताना, देशी गायी आरोग्याच्या दृष्टीनं व उपपदार्थांबाबत श्रेष्ठ आहेत, हा दावा अत्यंत तुटपुंजे संदर्भ व तर्क वापरून करण्यात आला आहे. तथ्य आणि वैज्ञानिकतेला आव्हान देणार्‍या या बाबी आहेत आणि त्यांचा परीक्षांत समावेश करणं राज्य घटनेच्या विरोधात आहे.

 

जर्सी गायींच्या दुधाचा दर्जा फारसा चांगला नाही, त्या केवळ मुबलक दूध देतात असं यात म्हटले आहे. देशी गायीच्या दुधाचा रंग किंचित पिवळसर असतो, कारण, त्यात सोन्याचा अंश असतो (जो जर्सी गायीच्या दुधात नसतो) असा दावाही या साहित्यात करण्यात आला आहे. सोनं हा धातू आहे. तसंच या दाव्याच्या आधारादाखल देण्यात आलेली जुनागढ कृषी विद्यापीठातील संशोधकांची संशोधनं वादग्रस्त आहेत. भारतीय गायी या वैयक्तिक स्वच्छता राखणार्‍या आहेत, असा दावाही यात करण्यात आला आहे. देशी गायी काटक असतात तसंच घाणीत बसू नये ही समज त्यांना असते. याउलट जर्सी गायी आळशी असतात व आजारांना चटकन बळी पडतात, असं यात म्हटलं आहे. जर्सी गायींना होणार्‍या आजारांना त्या स्वत:च कशा जबाबदार आहेत हे स्पष्ट करताना या पीडीएफ फाइलमध्ये म्हटलं आहे, की, वैयक्तिक स्वच्छतेच्या सवयी जर्सी गायींना नसल्यानं त्या अनेक आजार ओढवून घेतात. भेदाचे एकूण 38 मुद्दे यात देण्यात आले आहेत. देशी गायीपुढे एखादी अपरिचित व्यक्ती आली, की ती लगेच उठून उभी राहते. उद्धट परदेशी गाय मात्र कोणतीही ‘भावना’ व्यक्त करत नाही, असा जावईशोध त्यात लावण्यात आला आहे. गायीपासून मिळणार्‍या उत्पादनांमुळं किंवा तिच्यापासून मिळणार्‍या पाच पदार्थांमुळं जवळपास प्रत्येक रोग बरा होतो, असा दावा या अभ्यासक्रमात अनेकदा करण्यात आला आहे. अर्भकांचं अन्न तर दूध होतंच, शिवाय सोरायसिससारखे आजार बरे करते, असं यात नमूद आहे. विशिष्ट रंगाचे केस अंगावर असलेल्या गायीपासून मिळणारी उत्पादनं विशिष्ट आजार कसा बरा करतात हे या अभ्यासक्रमात स्पष्ट करून सांगण्यात आलं आहे. यांमध्ये काही गंभीर विकारांचाही समावेश आहे.

गायीच्या उपपदार्थापासून पिकांवर फवारण्यासाठी मिश्रण कसं तयार करावं, याच्या कृती या अभ्यासक्रमात देण्यात आल्या आहेत. या प्रत्येक मिश्रणाच्या लाभावर चर्चा करण्यात आली आहे. 1984 साली भोपाळमध्ये झालेल्या वायूगळतीमध्ये वीस हजार जणांचा मृत्यू झाला. ज्या लोकांच्या घरांच्या भिंती शेणानं लिंपलेल्या होत्या, त्यांना काहीही झालं नाही. गायीमधील अनेक घटक हे जागतिक तापमानवाढीचा प्रतिबंध करू शकतात, यावर तसंच मानवाच्या विध्वंसक उपभोगवादावरही यात प्रकाश टाकण्यात आला आहे. तरीही या साहित्यामध्ये अनेक अतिसुलभ निष्कर्ष मांडण्यात आले आहेत. कर्म आपल्याला गोहत्येपासून, गोमांस भक्ष्यणापासून रोखते यापासून सुरू झालेला युक्तिवाद गोहत्येचा संबंध अत्यंत भूकंपाशी जोडणार्‍या बिनबुडाच्या व अशास्त्रीय दाव्यापाशी येऊन संपतो.

दिशांच्या ध्वनीविषयक विषमतांमुळं खडकांमध्ये मोठ्या प्रमाणात विषमदिक (अ‍ॅनिसोट्रॉपिक) ताण येतो. दररोज हजारो पशुंची हत्या अनेक वर्षे होत राहिल्यास मरणार्‍या प्राण्यांच्या शरीरातून उत्सर्जित होणार्‍या आइनस्टायनियन पेन वेव्ह्जमुळं ध्वनीशी संबंधित विषमदिकता निर्माण होतं. एकंदर या अभ्यासक्रमांतील बराच मजकूर वादग्रस्त तथ्यांनी भरलेला आहे, तर देशातील गायी या नृशंस हिंसाचाराचं आणि हिंदुत्ववादी संघटनांद्वारे होणार्‍या लिंचिंगच्या घटनांचं कारण ठरत आहेत.

 



Name

] ब्रेकिंग,851,Agralekh,3,desh,2,IPL 2020,19,Latest News,5550,letest News,584,Loksabha-2019,164,Maharashtra,103,Mumbai,41,New Window,210,News,314,satara,3,updates,452,Videsh,2,Vishesh,2,अर्थ,137,अहमदनगर,9974,औरंगाबाद,355,क्रीडा,675,दखल,660,देश,4147,नाशिक,776,पुणे,590,बीड,1423,बुलढाणा,858,ब्रेकिंग,15360,ब्रेकिंग न्युज,112,मनोरंजन,155,महाराष्ट्र,12457,महाराष्ट्र सातारा,26,मुंबई,3442,विदेश,635,संपादकीय,1465,सातारा,3157,
ltr
item
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: गोवंश रक्षणाच्या परीक्षेत अवैज्ञानिकता आणि असत्याचा आधार
गोवंश रक्षणाच्या परीक्षेत अवैज्ञानिकता आणि असत्याचा आधार
https://1.bp.blogspot.com/-6krngV62jKM/X_chqj32wYI/AAAAAAABm1U/jkzYlkTbk7w8RgvbIvqSIBGG9JwycT5ngCLcBGAsYHQ/s0/image.png
https://1.bp.blogspot.com/-6krngV62jKM/X_chqj32wYI/AAAAAAABm1U/jkzYlkTbk7w8RgvbIvqSIBGG9JwycT5ngCLcBGAsYHQ/s72-c/image.png
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates
https://www.lokmanthan.com/2021/01/blog-post_960.html
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/2021/01/blog-post_960.html
true
1708963956808886337
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content