सातारा / प्रतिनिधी : खासदार उदयनराजे भोसले यांनी सातार्यातील ग्रेड सेपरेटरचे (भुयारी मार्ग) काल उद्घाटन केले होते. या ग्रेड सेपरेटरच्या भिं...
सातारा / प्रतिनिधी : खासदार उदयनराजे भोसले यांनी सातार्यातील ग्रेड सेपरेटरचे (भुयारी मार्ग) काल उद्घाटन केले होते. या ग्रेड सेपरेटरच्या भिंतीवर लावण्यात आलेल्या महापुरषांचा नावाचा फलक रात्री अनोळखी व्यक्तींनी फाडला. ही बाब निदर्शनास येताच उदयनराजे समर्थकांनी शनिवारी घटनास्थळी पोचून निषेध नोंदविला. या प्रकाराने सातारा शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. छत्रपती संभाजीराजे भोसले भुयारी मार्ग असा नावाचा लावलेला फलक शुक्रवारी रात्री अज्ञात व्यक्तींनी फाडल्याचे आज (शनिवार) काही नागरिकांच्या लक्षात आले. त्याची माहिती उदयनराजे समर्थकांना देखील मिळाली. या प्रकाराचा समाज माध्यमातून तीव्र निषेध नोंदविण्यास प्रारंभ झाला. सकाळी 9 वाजता उदयनराजे समर्थकांनी पोवई नाका येथे जमण्यास प्रारंभ केला. त्याचप्रमाणे शिवभक्त देखील मोठ्या प्रमाणात घटनास्थळी जमा झाले. यावेळी उदयनराजे समर्थकांनी प्रकाराचा निषेध नोंदविला.