$type=ticker$snippet=hide$cate=0

पतसंस्थांच्या १ लाख कोटी रुपयांचे वर असलेल्या ठेवींना संरक्षण देण्याची योजना : काका कोयटे

कोपरगाव / ता.प्रतिनिधी :  महाराष्ट्रातील नागरी सहकारी, महिला सहकारी, ग्रामीण बिगरशेती पतसंस्थांची संख्या १६००० चे वर असून या पतसंस्थांमध्ये ...

कोपरगाव / ता.प्रतिनिधी : महाराष्ट्रातील नागरी सहकारी, महिला सहकारी, ग्रामीण बिगरशेती पतसंस्थांची संख्या १६००० चे वर असून या पतसंस्थांमध्ये १ लाख कोटी रुपयांचे वर  ठेवी आहे. या ठेवींना संरक्षण देण्याची योजना महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन  ने तयार केली असून या योजनेद्वारे पतसंस्थांच्या ठेवींना ५०,००० रुपयांपासून ५ लाख रुपयांपर्यंत विमा संरक्षण मिळणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांनी दिली.


पतसंस्थांच्या ठेवींना संरक्षण देतांना IRDA इन्शुरन्स रेग्युलेटरी डेव्हलपमेंट अॅथॉरीटी या संस्थेची परवानगी मिळविण्यापूर्वी विमा हा शब्द वापरता येणार नाही तरी देखील नावात विमा शब्द नसला तरी तत्सम संरक्षण पतसंस्थांच्या  ठेवींना आता उपलब्ध होणार असल्याने ठेवीदारांनी पतसंस्थांमध्ये अधिकाधिक गुंतवणूक करावी असे आवाहन देखील त्यांनी केले. 
महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या वतीने शिर्डी येथे २ जानेवारी २०२१ रोजी आयोजित राज्यातील प्रमुख पतसंस्था पदाधिकाऱ्यांच्या बैठकीप्रसंगी ते बोलत होते. या बैठकीला मार्गदर्शन करण्यासाठी रिझर्व बँक ऑफ इंडिया चे संचालक श्री.सतीश मराठे, नॅशनल फेडरेशन ऑफ बँक अॅड क्रेडीट सोसायटीज या देशातील बँक व पतसंस्था फेडरेशनचे संचालक व सहकार भारतीचे राष्ट्रीय महामंत्री श्री.उदय जोशी यांचेसह भारतातील सर्वात मोठी पतसंस्था असलेल्या बुलडाणा अर्बन पतसंस्थेचे चेअरमन श्री राधेश्यामजी चांडक हे उपस्थित होते. महाराष्ट्रातील सहकारी पतसंस्थांना अडीअडचणीचे प्रसंगी अधिकाधिक निधी प्राप्त होण्याचे दृष्टीने Asset Reconstruction Company चे धर्तीवर Statbilization  Fund  या संस्थेची सहकारी तत्वावर स्थापना करण्याचा निर्णय या प्राथमिक बैठकीत घेण्यात आला. अशा प्रकारची संस्था स्थापन होण्यासाठी Statbilization  Fund म्हणुन १०६ कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा महाराष्ट्रातील विवीध उपस्थित पतसंस्थांद्वारे केली गेली. तसेच Liqiudity Base Protection Fund हि संकल्पना देखील याच संस्थेद्वारे राबविण्यात येणार आहे.  राज्य फेडरेशनचे महासचिव श्री.शांतीलालजी सिंगी या प्रसंगी बोलतांना म्हणाले कि,‘गेले अनेक वर्ष सहकार खाते, महाराष्ट्र शासन, RBI तसेच बँकांच्या ठेवींना विमा संरक्षण देणारी कंपनी डिपॉझीट इन्शुरन्स अॅड क्रेडीट गॅरंटी कॉर्पोरेशन (DICGC) यांच्याकडे आम्ही पाठपुरावा करीत होतो. परंतु आता आम्हाला सहकार चळवळीविषयी अभिमान असल्याने अशा प्रकारची संस्था सहकारी तत्वावर निर्माण करण्याचे आम्ही ठरविले असल्याचे  महाराष्ट्रातील विविध स्तरावरून या योजनेचे स्वागत  होत आहे.’
या योजनेला पाठबळ देण्यासाठी महाराष्ट्रातील बँका व पतसंस्थांची शिखर संस्था असलेली महाराष्ट्र राज्य सहकारी बँक तसेच भारतातील सर्वात मोठी पतसंस्था असलेली बुलडाणा अर्बंन पतसंस्था, शिवकृपा नागरी सहकारी पतसंस्था देश पातळीवर बँका व पतसंस्थांची शिखर संस्था असलेली नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑपरेटिव्ह बँक अॅड क्रेडीट सोसायटी यांचे देखील पाठबळ मिळत आहे. 
या योजनेसाठी नॅशनल इन्शुरन्स अॕकॅडमी (INIA) चे मार्दर्शन घेण्यात येणार आहे.   राज्य फेडरेशनचे खजिनदार श्री.दादाराव तुपकर व उपकार्याध्यक्ष श्री सुदर्शन भालेराव यांनी सांगितले कि, ‘सहकारी तत्वावर स्थापन झालेली अशा प्रकारची हि जगातील पहिलीच संस्था असेल’. 
.
Name

] ब्रेकिंग,844,Agralekh,3,desh,2,IPL 2020,19,Latest News,5534,letest News,582,Loksabha-2019,164,Maharashtra,103,Mumbai,41,New Window,210,News,314,satara,1,updates,452,Videsh,2,Vishesh,2,अर्थ,137,अहमदनगर,9939,औरंगाबाद,354,क्रीडा,675,दखल,657,देश,4141,नाशिक,773,पुणे,583,बीड,1423,बुलढाणा,858,ब्रेकिंग,15307,ब्रेकिंग न्युज,110,मनोरंजन,155,महाराष्ट्र,12388,महाराष्ट्र सातारा,6,मुंबई,3428,विदेश,635,संपादकीय,1458,सातारा,3146,
ltr
item
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: पतसंस्थांच्या १ लाख कोटी रुपयांचे वर असलेल्या ठेवींना संरक्षण देण्याची योजना : काका कोयटे
पतसंस्थांच्या १ लाख कोटी रुपयांचे वर असलेल्या ठेवींना संरक्षण देण्याची योजना : काका कोयटे
https://1.bp.blogspot.com/-IxfkvwhGAO4/X_MQp4KMyWI/AAAAAAABml0/9-F-l7NIRYQLkAKDLTCk0Qz5K-qOtXgYQCLcBGAsYHQ/s320/Kaka%2BKaoyte.jpg
https://1.bp.blogspot.com/-IxfkvwhGAO4/X_MQp4KMyWI/AAAAAAABml0/9-F-l7NIRYQLkAKDLTCk0Qz5K-qOtXgYQCLcBGAsYHQ/s72-c/Kaka%2BKaoyte.jpg
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates
https://www.lokmanthan.com/2021/01/blog-post_968.html
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/2021/01/blog-post_968.html
true
1708963956808886337
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content