$type=ticker$snippet=hide$cate=0

काँग्रेसमध्ये पत नसलेल्यांचीच जादा उठाठेव

काँग्रेस हा 135 वर्षांचा भारतातील सर्वांत जुना पक्ष आहे. त्याची सध्याची अवस्था पाहिली, तर या पक्षानं खरंच देशात पन्नास राज्य केलं का, असा प्...


काँग्रेस हा 135 वर्षांचा भारतातील सर्वांत जुना पक्ष आहे. त्याची सध्याची अवस्था पाहिली, तर या पक्षानं खरंच देशात पन्नास राज्य केलं का, असा प्रश्‍न पडावा, अशी स्थिती आहे. पक्षाची सध्याची जी अवस्था आहे, तिला पक्ष संघटन, नेते जितके जबाबदार आहेत, तितकेच किंबहुना त्याहून अधिक आताचं नेतृत्व जबाबदार आहे, हे लक्षात घ्यायला हवं.

लोकसभेच्या गेल्या दोन निवडणुकांत काँग्रेसची काय स्थिती झाली, हे वेगळं सांगायला नको. ज्यांचं जनमाणसांत स्थान आहे, अशा नेत्यांचं खच्चीकरण आणि दरबारी राजकारण करणार्‍यांना पायघड्या असं सातत्यानं होत गेल्यानं काँग्रेसची अवस्था इतकी वाईट झाली, की गेल्या दोन निवडणुकांत काँग्रेसला विरोधी पक्षनेतेपदही मिळविता आलेलं नाही. अन्य राज्यंही हातची चालली आहेत. समाजातील काँग्रेसची पत खालावत चालली आहे. अशा काळात स्पष्ट भूमिका घेणार्‍या आणि पक्षाला दिशा देणार्‍या नेत्यांचं ऐकून पक्षश्रेष्ठींनी धोरण ठरवायला हवं; परंतु खूशमस्करी करणार्‍यांचं ऐकायचं आणि लाळघोटेपणा करणार्‍यांना पदं द्यायची अशी पद्धत यापुढंही चालू राहणार असेल, तर पक्षाची पत आणखी खालावेल. पक्षालाच पत नसेल, तर नेत्यांच्या पतीला काहीच अर्थ राहत नाही. ज्यांना पत नाही, तेच उठाठेव करतात, असा सामान्य जनतेतला जो अनुभव आहे, तोच काँग्रेसमध्येही येतो. लोकसभेच्या गेल्या दोन निवडणुकांत मानहानीकारक पराभव वाट्याला येऊनही काँग्रेस सुधारलेली नाही. वेगवेगळ्या राज्यांत झालेल्या निवडणुकीतही काँग्रेस फार चमकदार कामगिरी बजावू शकलेली नाही. राजकीय पक्षांना हार-जीत नवीन नसते. पराभवाचं आत्मचिंतन करून, झालेल्या चुका दुरुस्त करून पक्षाला दिशा द्यायची असते; परंतु काँग्रेसमध्ये यशाला अनेक वाटेकरी असतात आणि अपयश पोरकं  असतं. काँग्रेस जिंकली, की पक्षश्रेष्ठींचं श्रेय आणि हरली, की अपश्रेय मात्र कार्यकर्त्यांचं. अशी मानसिकता असलेला पक्ष अपयशातून बाहेर पडणं अवघड असतं. जनतेशी नाळ तुटलेली, युवा पिढीशी नातंच नाही, कार्यकर्ते गर्भगळीत झालेले. अशा परिस्थितीचा नेत्यांनी विचार करून संघटनेला दिशा द्यायला हवी. राजकारण हे पूर्णवेळचं असतं. सत्ताधारी पक्षानं केलेल्या चुकांमुळं मिळणार्‍या यशाची वाट पाहत बसलं, तर यश कायमच हुलकावणी देईल. लोकसभेच्या निवडणुकीनंतर राहुल गांधी यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. गांधी कुटुंबाहेरची व्यक्ती अध्यक्ष करण्याची भाषा वापरली गेली. सोनिया गांधी यांच्याकडं हंगामी अध्यक्षपदाची धुरा सोपवण्यात आली. लवकरच काँग्रेसला अध्यक्ष देण्याचं जाहीर करण्यात आलं; परंतु दोन वर्षे झाली, तरी काँग्रेसला नवीन अध्यक्ष मिळालेला नाही. एवढ्या मोठ्या पक्षाला अध्यक्ष मिळू नये, ही त्या पक्षाची नामुष्की आहे. राहुल अध्यक्ष नसले, तरी पक्षात तेच काम पाहत असतात. सोनियांचं आजारपण त्यांच्या कार्यक्षमतेत अडथळा ठरतं आहे. अशा वेळी नेते, कार्यकर्ते सैरभैर झाले आहेत. त्यांना सावरून पक्षाला नवी उभारी देण्याऐवजी काँग्रेसजण मात्र गटबाजीत गुंतले आहेत. दरबारी राजकारणाला काँग्रेसमध्ये महत्त्व आलं आहे. काँग्रेसची चिंता असणार्‍यांना दरबारी राजकारणी भाजपची फूस असलेले ठरवित आहेत. अशा परिस्थितीत काँग्रेसला संजीवनी मिळणं अवघड दिसतं.

काँग्रेसला पूर्ण वेळ अध्यक्ष आणि सर्वसमावेशक नेतृत्व हवं, अशी मागणी करण्यात गैर काहीच नाही. पक्षाला वारंवार येणार्‍या पराभवाचं आत्मचिंतन करण्याची मागणी ही गैर नाही. चिंतन करूनच त्यातून वाट काढता येत असते. एकीकडं पक्षांतर्गत स्वातंत्र्याच्या गप्पा करायच्या आणि दुसरीकडं असा आवाज उठविणार्‍यांची पत काढायची. अशा प्रकारामुळं काँग्रेस वैचारिक पातळीवर दुभंगली आहे. पक्षश्रेष्ठींच्या वर्तुळात वावरणारे लाचारीच्या आणि खूशमस्करीच्या प्रयत्नांत ज्यांनी रास्त मुद्दे मांडले, त्यांनाच पक्षद्रोही ठरवायला निघाले आहेत. भाजपशी लढण्याऐवजी काँग्रेसजण आपसांतच लढत आहेत. त्यात त्यांची शक्ती खर्च होत असल्यानं जनतेच्या प्रश्‍नावर लढायची ताकदच त्यांच्यात राहिलेली नाही. शक्तीपात झालेला पक्ष देशाची सत्ता कसा मिळवणार हा प्रश्‍न निर्माण होणं स्वाभावीक आहे. पक्षाला गतवैभव प्राप्त करायचं असेल, तर भाजपच्या चुकांवर केवळ लक्ष्य ठेवून चालणार नाही, तर समर्थ पर्याय आम्ही देऊ, असं दाखवावं लागेल. त्यासाठी युवकांना पक्षाशी जोडावं लागेल. केवळ ऐतिहासिक कामगिरीवर पुडची वाटचाल यशस्वी होत नसते. पक्षाला नवी दिशा, कार्यकर्त्यांना बळ, जनतेच्या प्रश्‍नांबरोबर राहण्याची कृती यातून पक्षाला संजीवनी मिळत असते. काँग्रेसमधील नेत्यांनी प6 पाठविताना हीच भूमिका घेतली होती. काँग्रेसमधील 23 नेत्यांनी सोनियांना लिहिलेल्या पत्रावर जे वाद, पडसाद उमटायचे, ते मागच्या काँग्रेस कार्यकारी समितीच्या बैठकीत उमटले होते. त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्यांची वेळ चुकीची असली, तरी मुद्दे चुकीचे नव्हते. त्यानंतर सोनिया यांनी गेल्या महिन्यात नाराज नेत्यांशी चर्चाही केली होती. सोनिया यांनी पत्रकर्त्या नेत्यांबाबत आपल्या मनांत अजिबात कटुता नाही, हे स्पष्ट केलं होतं. या पार्श्‍वभूमीवर राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबत भाष्य करणं चुकीचं होतं. राजस्थानच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत अपयश आलेल्या गेहलोत यांनी तिकडं लक्ष द्यायला हवं होतं. त्याऐवजी त्यांनी खूशमस्करी  करण्याच्या नादात वरिष्ठ नेत्यांवरच तोंडसुख घेतलं. त्यांची पत काढली. वर्षानुवर्षे जनतेतून निवडून येणार्‍या पी. चिदंबरम यांच्यासारख्या नेत्यावरही गेहलोत यांनी टीका केली. त्याचं कारण यातील बर्‍याच नेत्यांनी सचिन पायलट यांची बाजू घेतली होती, हे आहे. पायलट यांनी जेव्हा बंड केलं, तेव्हा गेहलोत पायलट यांना पक्षाबाहेर घालवण्याच्या तयारीत होते. त्या वेळी आनंद शर्मा यांच्यासह अनेक नेत्यांनी पायलट यांचं मतपरिवर्तन करून, त्यांना पक्षात ठेवण्याचा आग्रह धरला होता. गेहलोत यांची पोटदुखी कुठे आहे, हे त्यावरून समजायला हरकत नाही. बिहार विधानसभेच्या निवडणूक निकालानंतर शर्मा यांनी भाष्य केलं होतं; परंतु त्यानंतर त्यावर चर्चाही झाली होती. ही पार्श्‍वभूमी एकदा लक्षात घेतली, की काँग्रेसच्या बैठकीत प्रमुख नेत्यांमध्ये झालेल्या शाब्दिक युद्धामागचं कारण समजणं सोपं जातं.

एकीकडं काँग्रेसची निवड प्रक्रिया सुरू झाली असल्याचं निवडणूक अधिकार्‍यांनी सांगायचं आणि दुसरीकडं मात्र पाच राज्यांतील विधानसभांच्या निवडणुकीनंतरचा मुहूर्त काढायचा, हे परस्पर विसंगत आहे. काँग्रेस अध्यक्षाची निवड आणि कार्यकारिणीची निवडणूक या सगळ्यावरुन चर्चा सुरू असताना गेहलोत आणि शर्मा यांच्यात वाद झाला. गेहलोत यांनी सोनिया यांना पत्र लिहणार्‍या 23 ज्येष्ठ नेत्यांना चांगलंच फैलावर घेतलं. या नेत्यांनी नेतृत्त्वबदलाची मागणी केली होती. या सगळ्या नेत्यांना जाब विचारताना गेहलोत यांनी अत्यंत तिखट भाषेचा वापर केला. त्यामुळं शर्माही प्रचंड संतापले. त्यांनी गेहलोत यांना तितक्याच तिखट भाषेत प्रत्युत्तर दिलं. पाच राज्यांतील निवडणुकीचं कारण सांगून आणि नेत्यांवर टीका करून अध्यक्षपदाची निवडणूक टाळली असली, तरी आजचं मरण उद्यावर ढकलण्याचाच हा प्रकार आहे.

या बैठकीत गेहलोत यांनी गुलाम नबी आझाद आणि पी. चिदंबरम यांना पक्षाच्याबाहेर तुमची काय पत आहे, असा थेट सवाल विचारला. तेव्हा शर्मा आणि मुकूल वासनिक यांनी काँग्रेस पक्षाची घटना वाचून दाखवण्यास सुरुवात केली. कार्यकारिणीची निवडणूक जून महिन्यापर्यंत पुढं ढकलण्यात तुमचा अडथळा येत असल्याचं गेहलोत यांनी शर्मा यांना सुनावलं. जे नेते कधी लोकांमधून निवडून आले नाहीत, तरीही संयुक्त पुरोगामी आघाडीच्या सरकारमध्ये चांगल्या जबाबदार्‍या मिळाल्या. अशा लोकांना अंतर्गत निवडणुकीची मागणी करण्याचा काय हक्क आहे, असं गेहलोत यांनी विचारलं. एकीकडं सोनियांनी सामंजस्याची भूमिका घ्यायची आणि त्यांची चापलुसी करणार्‍या गेहलोत यांनी मात्र शिळ्या कढीला उत आणायचा, हे ठरवून तर केलेलं नाही ना, अशी शंका घ्यायला वाव आहे. गांधी परिवाराची कृपा असल्यामुळंच तुम्ही इतक्या मोठ्या पदांवर बसलेले आहात, असंही त्यांनी बंडखोरांना सुनावलं. तेव्हा संतापलेल्या शर्मा यांनी गेहलोत यांच्या भाषेबाबत आक्षेप घेतला. केवळ चाटुगिरी करण्यासाठी अपमानजनक भाषेचा वापर करू नका, असं शर्मा यांनी गेहलोत यांना सुनावलं. पक्षांतर्गत निवडणुकांची मागणी करणारे नेते इंदिरा गांधी यांच्या काळापासून काँग्रेसमध्ये असल्याची आठवण शर्मा यांनी करुन दिली. त्यामुळं काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीतील वातावरण प्रचंड तापलं होतं. बैठकीतील वातावरण प्रचंड तापल्यामुळं अखेर राहुल यांना मध्यस्थी करावी लागली. गेहलोत यांनी इतक्या तिखट भाषेचा वापर करायला नको होता. आपण निवडणुका घेऊन हा विषय संपवून टाकू, असं राहुल यांनी म्हटलं; परंतु त्यातून काय साध्य झालं, हा प्रश्‍नच आहे. त्याचं कारण दुखावलेली मनं अशानं जोडली जात नाहीत.


Name

] ब्रेकिंग,1,] ब्रेकिंग,876,Agralekh,3,baramati,2,desh,2,IPL 2020,19,kolhapur,8,Latest News,5971,letest News,603,Loksabha delhi,1,Loksabha-2019,164,Maharashtra,401,Maharashtra.,5,Mumbai,42,New Window,210,News,321,sangli,82,satara,295,satara.,7,solapur,2,solapur pandharpur,1,updates,453,Videsh,2,Vishesh,2,अर्थ,206,अहमदनगर,10903,औरंगाबाद,380,क्रीडा,681,दखल,749,देश,4614,नाशिक,829,पुणे,860,बीड,1449,बुलडाणा,41,बुलढाणा,878,ब्रेकिंग,17563,ब्रेकिंग न्युज,120,ब्रेकिंग महाराष्ट्र,1,मनोरंजन,175,महाराष्ट्र,14886,महाराष्ट्र सातारा,44,मुंबई,4205,विदेश,665,संपादकी,2,संपादकीय,1644,सातारा,3219,
ltr
item
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: काँग्रेसमध्ये पत नसलेल्यांचीच जादा उठाठेव
काँग्रेसमध्ये पत नसलेल्यांचीच जादा उठाठेव
https://1.bp.blogspot.com/-SBWvZZ_6xlg/YA1myKd1XqI/AAAAAAABnjk/zcnXHk6j7pkFaz-fiHC9en624Mt-3P2zgCLcBGAsYHQ/s0/image.png
https://1.bp.blogspot.com/-SBWvZZ_6xlg/YA1myKd1XqI/AAAAAAABnjk/zcnXHk6j7pkFaz-fiHC9en624Mt-3P2zgCLcBGAsYHQ/s72-c/image.png
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates
https://www.lokmanthan.com/2021/01/blog-post_969.html
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/2021/01/blog-post_969.html
true
1708963956808886337
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content