मुंबई : मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाच्या बांद्रा युनिटने केलेल्या कारवाईदरम्यान सांताक्रुज, वाकोला येथे एका अफ्रिकन वंशाच्या तस...
मुंबई : मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाच्या बांद्रा युनिटने केलेल्या कारवाईदरम्यान सांताक्रुज, वाकोला येथे एका अफ्रिकन वंशाच्या तस्कराला अटक करण्यात आली आहे, त्याच्याकडून 51 लाख रुपये किमतीचे 204 ग्रॅम कोकेन हस्तगत करण्यात आले.
31 डिसेंबर रोजी मुंबई शहरात एएनसीकडून विदेशी अमली पदार्थ तस्करला अटक करण्यात आलेली ही एकमात्र घटना आहे. 31 डिसेंबरच्या रात्री नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून छापेमारी करण्यात आली. या कारवाईत शहरातील 3 अमली पदार्थ तस्करांना ताब्यात घेण्यात आले असून शुक्रवारी सकाळी देखील काही ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत. यातील एका छाप्यात अफ्रिकन नागरिकाला देखील अटक झाली आहे. पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून अमली पदार्थ विरोधी पथकाच्या बांद्रा युनिटने सांताक्रुज वाकोला येथे गस्त सुरू केली होती. या दरम्यान एका नॅनो कारमध्ये एक आफ्रिकन वंशाचा नागरिक संशयास्पदरित्या हालचाली करताना पोलिसांच्या नजरेस आला. पोलिसांनी तात्काळ त्याच्याकडे जाऊन चौकशी केली. मात्र या व्यक्तीने पळ काढायचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्याला पकडून झडती घेतली. यामध्ये त्याच्याकडे 204 ग्रॅम कोकेन सापडले. या अमली पदार्थाची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये 51 लाख रुपये आहे.
ड्रग्ज सिंडिकेटशी संबंध?
सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर नार्कोटिक्स ब्युरोकडून विविध सिने तारकांची चौकशी सुरू आहे. मागील पाच महिन्यांपासून मुंबई तसेच देशाबाहेर असणाऱ्या स्मगलर लॉबीचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. या प्रकरणात विविध ठिकाणी छापेमारी देखील करण्यात आली होती. बॉलीवूडच्या मोठ्या नावांची चर्चा यामध्ये होती. तसेच तत्कालीन कारवाई दरम्यान ड्रग्ज सिंडिकेट समोर आले होते. त्याच पार्श्वभूमीवर नार्कोटिक्स ब्युरो छापेमारी करत आहे.