$type=ticker$snippet=hide$cate=0

शस्त्रास्त्र बाजारपेठेत भारताचं पाऊल

भारत हा जगातील दुसर्‍या क्रमांकांचा शस्त्रास्त्र आयातदार देश आहे. याच देशानं आता जागतिक शस्त्रास्त्र बाजारपेठेत पहिलं पाऊल टाकलं आहे. अर्थात...


भारत हा जगातील दुसर्‍या क्रमांकांचा शस्त्रास्त्र आयातदार देश आहे. याच देशानं आता जागतिक शस्त्रास्त्र बाजारपेठेत पहिलं पाऊल टाकलं आहे. अर्थात यापूर्वी भारताचा जागतिक शस्त्रास्त्र बाजारपेठेतील अनुभव फारसा चांगला नाही. विक्रीपश्‍चात सेवा न दिल्यानं इक्वेडोर या देशाशी झालेला करार रद्द करण्याची नामुष्की आली होती. आता शस्त्रास्त्र बाजारपेठेत पुन्हा शिरकाव करताना भारताला अनेक गोष्टींचं भान ठेवावं लागेल.

जागतिक शस्त्रास्त्र बाजारपेठेत अगोदरच मोठी स्पर्धा आहे. अमेरिका, रशिया, चीन आणि इस्त्राईल या देशांची मक्तेदारी आहे. अमेरिका आणि रशियाची मक्तेदारी मोडीत काढून चीननं दक्षिण अमेरिका आणि आफ्रिका, आशिया खंडातील अनेक देशांची शस्त्रास्त्रांची बाजारपेठ काबीज केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताला जगाची मॅन्युफॅक्चरिंग हब बनविण्याचं ध्येय भारतानं ठरविलं आहे. त्यादृष्टीनं भारतानं पावलं टाकायला सुरुवात केली आहे. केंद्र सरकारनं जमिनीवरून हवेत मारा करणारे ‘आकाश’ क्षेपणास्त्र मित्र राष्ट्रांना निर्यात करायला हिरवा कंदील दाखवला. जागतिक शस्त्रास्त्र बाजारपेठेत दलालाची चलती असते. दलालीला भारत आतापर्यंत भ्रष्टाचार मानीत होता. आता मात्र त्यात बदल करून जागतिक बाजारात शस्त्रास्त्रांची दलाली कायदेशीर मानली जात असल्याचं भारताला ही ते मान्य करावं लागेल. जागतिक बाजारात शस्त्रास्त्रांची निर्यात वाढवण्यासाठी दलालांची साखळी तयार असावी लागते. गुणवत्ता, दर्जा आणि दलाली या त्रिसूत्रीवर जागतिक शस्त्रास्त्र व्यापार चालतो. भारताला त्याचं भान ठेवावं लागेल. जागतिक बाजारातून शस्त्रास्त्रांची खरेदी करताना त्याचं तंत्रज्ञान आत्मसात करून देशात ती उत्पादित करण्याचं तसंच त्यांची निर्यात करण्याचं भारताचं धोरण आहे. तसं असलं, तरी अजून तंत्रज्ञान हस्तांतरणाचे फारच कमी करार झाले आहेत.  ‘आकाश’ हे जमिनीवरून हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र आहे. या क्षेपणास्त्राची मारक क्षमता 25 किलोमीटरपर्यंत आहे. 2014मध्ये हे क्षेपणास्त्र भारताच्या हवाई दलात सामील करण्यात आलं. वर्षभरनंतर भारतीय लष्करातही या क्षेपणास्त्राचा समावेश झाला. गेल्या काही वर्षातील आंतरराष्ट्रीय प्रदर्शनं, डिफेन्स एक्स्पो आणि एअरो इंडियासारख्या आयोजनांमध्ये काही मित्र राष्ट्रांनी आकाश क्षेपणास्त्रात रस दाखवला होता. त्यासोबतच किनारपट्टी देखरेख यंत्रणा, रडार आणि एअर प्लॅटफॉर्म्समध्येदेखील रस दाखवला. आकाश हे  95 टक्के भारतीय बनावटीचं हे क्षेपणास्त्र आहे. हे क्षेपणास्त्र तयार करण्यासाठी 25 वर्षांचा कालावधी लागला. मित्रदेशांना हे क्षेपणास्त्र विकण्यात येणार असलं, तरी ते कोणत्या देशांना ते विकलं जाणार आहे, याची वाच्यता केलेली नाही. विक्रीसाठी तयार करण्यात येणारी आकाश क्षेपणास्त्रं भारतीय संरक्षण दलात कार्यरत आकाश क्षेपणास्त्रापेक्षा वेगळी असतील. व्हिएतनाम, थायलँडसारख्या देशांमध्ये ही क्षेपणास्त्रं निर्यात होऊ शकतात. 2016 मध्ये मोदी सरकार पश्‍चिम आशिया, दक्षिण-पूर्व आशिया आणि लॅटिन अमेरिका या देशांमध्ये आकाश आणि ब्रह्मोस क्षेपणास्त्र निर्यात करण्याचा विचार करत आहे. त्याशिवाय ज्या राष्ट्रांसोबत भारताचे चांगले संबंध आहेत, त्या देशांमध्येसुद्धा क्षेपणास्त्र निर्यात होऊ शकते. हे क्षेपणास्त्र इनकमिंग हेलिकॉप्टर, लढाऊ विमानं आणि काही क्षेपणास्त्र यंत्रणेला उद्ध्वस्त करू शकते. केंद्र सरकारनं 2024 सालापर्यंत संरक्षण सामुग्री निर्यात क्षेत्रात पाच अब्ज डॉलर्स निर्यातीचं लक्ष्य ठेवलं आहे, तरीही जगभरात ‘शस्त्रास्त्रं आयात करणारा देश’ अशीच भारताची ओळख आहे. गेल्या काही महिन्यांत सीमेवर चीनसोबत जो तणाव निर्माण झाला, तो पाहता भारत स्वतःचीच संरक्षण गरज भागवू शकत नाही, अशी प्रतिमा असणारा देश आता निर्यातदार होतो आहे. आपण दारुगोळा आणि क्षेपणास्त्र यंत्रणा खरेदी करतो. अशावेळी निर्यातीविषयी बोलणं, अतिशयोक्त वाटतं. याचं कारण आपली स्वतःची गरज पूर्ण होत नाही. अशावेळी निर्यातीविषयी कसं बोलता येईल. स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च या जगभरात शस्त्रास्त्र खरेदी-विक्रीवर लक्ष ठेवणार्‍या थिंक टॅकच्या एका अहवालानुसार 2015 ते 2019 या काळात शस्त्रास्त्र खरेदीत भारत जगात दुसर्‍या स्थानी होता. याशिवाय, संरक्षण उपकरणांची आयात-निर्यात ही उपकरणांपेक्षा भू-राजकीय परिस्थिती, शक्ती संतुलन, निर्यातदार आणि आयात करणार्‍या देशांचं अंतर्गत राजकारण आणि वैश्‍विक शक्तींवर अवलंबून असतं. अशावेळी मोठ्या शस्त्रास्त्र निर्यातदार देशांच्या रांगेत उभं राहण्यासाठीची इको-सिस्टिम भारत उभारू शकतो का, हा महत्त्वाचा प्रश्‍न आहे. आकाश क्षेपणास्त्र विक्रीला हिरवा कंदील दाखवणं, हे मोठ्या ध्येयाच्या दिशेनं उचललेलं पहिलं पाऊल आहे. क्षेपणास्त्र विक्री व्यापार एक क्लिष्ट आणि गुंतागुंतीचं क्षेत्र आहे. आपण पहिलं पाऊल उचललं आहे. संरक्षण सामुग्रीच्या निर्यातीसाठी एका अतिशय खास स्कील सेटची गरज असते आणि भारतानं आतापर्यंत स्वतःची क्षेपणास्त्रं, तोफा, लढाऊ विमानं, हेलिकॉप्टर्स आणि बंदुकांनी तो स्किल सेट अजून सिद्ध केलेला नाही. जागतिक बाजारातील संरक्षण साहित्याच्या विक्रीचा भारताबाबतचा जगाचा अनुभव चांगला नाही. भारतावर अनेक निर्बंध आहेत आणि काही त्रुटीदेखील आहेत. भारतानं इक्वाडोरला काही हेलिकॉप्टर्स विकली होती; मात्र आपण विक्रीपश्‍चात चांगली सेवा देऊ शकलो नाही. त्यामुळं तो करार पुढं जाऊ शकला नाही. ज्या बाजाराला गरज आहे, तिथं उत्तम उत्पादन नेऊन खरेदीदाराला उत्तम सेवा दिली असती, तर हळूहळू भारतीय उत्पादन संपूर्ण दक्षिण अमेरिकेत पोचली असती; मात्र तसं झालं नाही. याचा अर्थ एकतर तुमचं उत्पादन चांगलं नाही किंवा त्याची किंमत योग्य नाही किंवा 30 वर्षांच्या सेल आफ्टर सर्व्हिससाठी गरजेची उपकरणं किंवा इको-सिस्टिम तयारच केली नाही. अशा सगळ्या परिस्थितीत सध्या भारतानं जे पाऊल उचललं आहे, ती केवळ सुरुवात असल्याचं म्हणता येईल. भारत अशावेळी शस्त्रास्त्र निर्यात क्षेत्रात पाऊल ठेवतो, ज्या वेळी पारंपरिक शस्त्रास्त्र बाजारावर अमेरिका, चीन, रशिया आणि इस्राईलचा एकधिकार आहे आणि या बाजारात पाय रोवून उभं राहण्यासाठी भारताला या देशांची प्रतिष्ठा, संरक्षण क्षमता आणि अनुभव यांच्यांशी स्पर्धा करावी लागेल. त्याचवेळी ही गोष्टही लक्षात घेतली पाहिजे, की आज युद्धाची पद्धत वेगानं बदलतं आहे. युद्धात ड्रोन आणि आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचा वापर वेगानं वाढतो आहे आणि युरोपातील अनेक देश या दिशेनं काम करत जागतिक पातळीवरचे निर्यातदार म्हणून स्वतःचं स्थान निर्माण करत आहेत. अशावेळी भारत संरक्षण साहित्याची निर्यात वाढवण्यासाठी परंपरागत शस्त्रास्त्रांवर भर देतो, की आपल्या सॉफ्टवेअर क्षमतेचा वापर करत अत्याधुनिक शस्त्रास्त्रं आणि त्यांना रोखण्यासाठी सॉफ्टवेअर आधारित यंत्रणा निर्माण करतो, हे पाहणं महत्त्वाचं आहे. क्षेपणास्त्रं बनवा किंवा हेलिकॉप्टर; मूळ मुद्दा हा असतो की तुमच्या उत्पादनावर जगाचा विश्‍वास बसला पाहिजे. भारताची खरी समस्या हीच आहे. आपल्याकडं जागतिक दर्जाचं म्हणता येईल, असं काहीच नाही; मात्र अनेक प्रॉडक्ट्स सध्या पाईपलाईनमध्ये आहेत. आपल्या देशात शस्त्रास्त्रांचं डिझाईन, विक्री आणि सर्व्हिस यासाठीचं इको-सिस्टिम अजून तयार नाही; मात्र, आपल्याहून छोटे देश तंत्रज्ञानात आपल्याहून पुढं निघाले आहेत. पूर्व युरोपातील चेक स्लोवाकसारख्या छोट्याशा देशानेही एक-एक उत्तमोत्तम उत्पादन घेत जगात स्वतःचं स्थान निर्माण केलं आहे. सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांमध्ये निर्यातक्षम उत्पादन तयार करणं आपल्यासाठी जरा अवघड आहे, हे आपल्याला कळायला हवं. एअर इंडियाला जगातल्या सर्वोत्तम एअरलाईन कंपन्यांपैकी एक मानलं जायचं; मात्र आज त्याचं खासगीकरण करण्यावर विचार सुरू आहे. आपल्याकडं अमेरिका आणि इतर देशांमधल्या बोईंगसारख्या लढाऊ विमानं बनवणार्‍या कंपन्याप्रमाणं मजबूत मार्केटिंग, सेल्स पिच आणि सेलिंग फोर्स असायला हवा. या कंपन्यांना हे स्थान मिळवण्यासाठी अमाप पैसा आणि अनेक वर्षे लागली. कुठल्या उत्पादनांमध्ये भारताला संधी आहे, हे अत्यंत हुशारीनं आणि परिपक्वतेनं बघायला हवं. भारताकडं उत्तम कंट्रोल सिस्टिम बनवण्याची क्षमता आहे. यापुढं आर्टिफिशिअल इंटेलिजन्स आणि फाईव्ह-जी सारख्या क्षेत्रात पुढं जायला हवं. आपल्या आयआयटीमधून मोठ-मोठे इंजीनिअर्स तयार होतात; मात्र ते परदेशी कंपन्यांमध्ये जाऊन डिझाईन तयार करतात. त्यामुळं त्याचा भारताला काहीच उपयोग होत नाही. याहूनही मोठा विरोधाभास म्हणजे या बड्या कंपन्यांच्या आर अँड डी लॅब्ससुद्धा भारतातच आहेत. काही बंगळूरला आहेत तर काही हैदराबादमध्ये. त्यामुळं आपल्यालाही अशा प्रकारची इको-सिस्टिम तयार करायला हवी. आर्टिफिशिअल इंटेलिजन्ससारख्या क्षेत्रात सुरुवात करणारा देश म्हणून आपल्याला लाभ होऊ शकतो. ड्रोन डिसरप्शनवर काम करायला हवं. कारण प्रत्येक तंत्रज्ञानावर मात करणारं तंत्रज्ञान विकसित होत असतं. त्यामुळं आपण आज सुरुवात गेली तर पुढच्या 8-10 वर्षात निर्यातीसाठी सक्षम होऊ शकू.









Name

] ब्रेकिंग,844,Agralekh,3,desh,2,IPL 2020,19,Latest News,5533,letest News,582,Loksabha-2019,164,Maharashtra,103,Mumbai,41,New Window,210,News,314,satara,1,updates,452,Videsh,2,Vishesh,2,अर्थ,137,अहमदनगर,9933,औरंगाबाद,354,क्रीडा,672,दखल,656,देश,4132,नाशिक,772,पुणे,579,बीड,1423,बुलढाणा,858,ब्रेकिंग,15275,ब्रेकिंग न्युज,110,मनोरंजन,154,महाराष्ट्र,12354,महाराष्ट्र सातारा,6,मुंबई,3420,विदेश,634,संपादकीय,1456,सातारा,3141,
ltr
item
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: शस्त्रास्त्र बाजारपेठेत भारताचं पाऊल
शस्त्रास्त्र बाजारपेठेत भारताचं पाऊल
https://1.bp.blogspot.com/-gQL8Opt89qg/X_LtK1zjamI/AAAAAAABmlc/jjKWZzh6AUIA_ZniXRAKFWuFtt_yc9C0wCLcBGAsYHQ/s0/image.png
https://1.bp.blogspot.com/-gQL8Opt89qg/X_LtK1zjamI/AAAAAAABmlc/jjKWZzh6AUIA_ZniXRAKFWuFtt_yc9C0wCLcBGAsYHQ/s72-c/image.png
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates
https://www.lokmanthan.com/2021/01/blog-post_979.html
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/2021/01/blog-post_979.html
true
1708963956808886337
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content