पारनेर/प्रतिनिधी : तुम्ही सत्तेत असताना तुमच्या मंत्र्यांनी भ्रष्टाचार केला त्यावेळी आम्ही तुमच्या मंत्र्याला घरी पाठवले हे तुम्ही विसरलात क...
पारनेर/प्रतिनिधी : तुम्ही सत्तेत असताना तुमच्या मंत्र्यांनी भ्रष्टाचार केला त्यावेळी आम्ही तुमच्या मंत्र्याला घरी पाठवले हे तुम्ही विसरलात का असा सवाल ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनीही शिवसेनेला करत चांगलेच फटकारले आहे. हजारे यांनी आंदोलन स्थगित करण्याची भुमिका घेतल्यानंतर शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिकाच्या अग्रलेखात "कॉंग्रेसच्या काळात आंदोलने केली, आता काय रामराज्य आलं काय? " अशी टीका हजारे यांच्यावर करण्यात आली. त्यावर पत्रकारांनी प्रश्न विचारला असता हजारे यांनी त्यांची सडेतोड भूमिका मांडत शिवसेनेवर बोचऱ्या शब्दांत टीकास्र सोडले.
यावेळी बोलताना अण्णा हजारे म्हणाले की आम्ही आंदोलन करत असताना आमच्यासमोर पक्ष आणि पार्ट्या कोणी नसतात भाजप शिवसेना काँग्रेस अशाप्रकारे कोणी नसुन आमच्यासाठी समाज आणि देश महत्त्वाचा आहे जिथेजिथे समाजाला घातक आहे असे आपल्या निदर्शनास येईल तेथे आपण समाजासाठी पुढे येत असतो राज्याला देशाला घातक कृत्य होते तेथे आंदोलन केले आहेत हे काही पहिला आंदोलन नाही तुम्हाला पुराव्यांनिशी माहिती देईल की तुमच्या मंत्र्यानी कसा भ्रष्टाचार केला व त्याला तुम्ही कसे पाठीशी घातले. भाजप सरकार सत्तेवर आल्यानंतर माझे जवळ जवळ सहा आंदोलन झाले आहेत यासंदर्भातली माहिती घ्या मग त्यावर बोला भाजप सरकार सत्तेवर आल्यानंतर दिल्लीत दोन आंदोलन झाले आहेत आंदोलन करत असताना एक पक्ष आणि पार्टी समोर ठेवून करत नाही कोणीही पक्ष आणि पार्टी असो त्यांच्याकडून समाजाचे देशाचे राज्याचे अहित होते तिथे आम्ही आंदोलन केले आहेत 20 वेळा उपोषण तसेच अनेक वेळा आंदोलन करण्यात आले आहे सर्व पक्षांच्या कारकिर्दीत आंदोलन केले आहेत एकही पक्ष असा नाही की त्यांच्या सत्तेच्या कारकिर्दीमध्ये आपण आंदोलन केले नाही जे सहा मंत्री घरी गेले त्यामध्ये तुमचा आहे भाजपचा आहे काँग्रेसचा आहे सगळ्यांचा आहे मग तुम्ही असे कसे बोलता असे म्हणत शिवसेनेला अण्णा हजारे यांनी चांगली फटकारले तसेच एवढं सर्व चालत असताना आजच असा अग्रलेख लिहिण्याची काय कारण आहे पत्रकारांनीही त्यांना याबाबत विचारले पाहिजे ते काय म्हणतात ते मला सांगा मग मी सर्व काही त्यांचे बाहेर काढतो असा इशारा अण्णा हजारे यांनी शिवसेने