$type=ticker$snippet=hide$cate=0

अण्णांची माघार : प्रश्‍न उपस्थित करणारी

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्यावर उजव्या विचारांचा प्रभाव आहे आणि त्यांची आंदोलनं उजव्यांना फारशी त्रासदायक ठरत नसतात. उजव्यांवर त्यांच...



ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्यावर उजव्या विचारांचा प्रभाव आहे आणि त्यांची आंदोलनं उजव्यांना फारशी त्रासदायक ठरत नसतात. उजव्यांवर त्यांचा विश्‍वास असतो. मागच्या वेळी उपोषण मागं घेताना दिलेली लेखी आश्‍वासनं जे सरकार दोन वर्षांत पूर्ण करू शकलं नाही आणि हजारे ज्यांच्यावर खोटारडं सरकार, हुकूमशाहीचं सरकार असे आरोप करीत होते, त्याच सरकारनं किमान हमी भावाबाबत उच्चाधिकार समिती नेमण्याच्या आश्‍वासनावर अण्णा कसे विश्‍वास ठेवू शकतात, असा प्रश्‍न निर्माण झाला असून अण्णांची विश्‍वासार्हताही त्यामुळं कमी झाली आहे.

गेल्या पन्नास वर्षांत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी वेगवेगळ्या प्रश्‍नांवर आंदोलनं केली. त्या वेळी त्यांनी सरकार कुणाचं आहे, हे पाहिलं नाही. त्यांची ओळख गांधीवादी विचाराचे अशी असली, तरी त्यांच्यावर प्रभाव आहे, तो स्वामी विवेकानंद यांच्या विचारांचा. ते त्यांनीही कधीही नाकारलं नाही. अण्णांच्या सामाजिक हेतूबद्दल कधीही शंका घेता येणार नाही; परंतु त्यांना सहज गंडविता येतं, अशी आता राज्यकर्त्यांची धारणा झाली आहे. आपुलीच प्रतिमा होते, आपुली वैरी असं बर्‍याचदा होत असतं. अण्णाही त्याला अपवाद नाहीत. अण्णांनी किती उपोषणं केली, त्यातून काय साध्य झालं, हा वेगळा अभ्यासाचा विषय आहे. अण्णांच्या गेल्या चार दशकांतील आंदोलनात त्यांच्यासोबत कोण कोण होते आणि ते का बाजूला झाले, तसंच अण्णांच्या आंदोलनाचा फायदा कुणी कसा उठविला, हा ही वेगळ्या अभ्यासाचा विषय आहे; परंतु अण्णांच्या आंदोलनाचा इशारा पूर्वी जसा सरकारच्या उरात धडकी भरवायचा, तशी ती आता गेल्या आंदोलनापासून भरतं का, याचा विचार करण्याची वेळ आली आहे. खरं तर अण्णांची ओळख जलसंधारण आणि माहिती अधिकार कायद्यामुळं देशभर झाली. लोकपालाच्या आंदोलनानं ते प्रसिद्धीच्या शिखरावर पोचले. भ्रष्टाचारविरोधी कायदा करण्यातलं त्यांचं योगदानही कुणी नाकारत नाही. अण्णांचं कोणतंही आंदोलन स्वार्थासाठी नसतं, हे ही मान्य; परंतु आंदोलनाच्या आडून काही स्वयंघोषित दुकानं उभी राहतात. अण्णांच्या आंदोलनाआडून ही दुकानं चालू राहतात. काहींनी मध्यस्थीच्या नावाखाली स्वतः चं महत्त्व वाढवून घेतलं, हे अण्णांनाही कळलं नसेल. काही जवळच्यांनी तर अण्णांचा गैरफायदा घेतला. अण्णांना हे ठावूकही नसेल; परंतु भिडस्त स्वभावाच्या अण्णांनी कधी त्यांना रोखलं नाही, ही वस्तुस्थितीही उरतेच. अण्णांनाही आपल्या आंदोलनाचा गैरफायदा घेतला जात असल्याचा साक्षात्कार झाल्यानं त्यांनी आंदोलनापासून राजकीय पक्ष, कार्यकर्त्यांना दूर ठेवण्याचं फर्मान काढलं होतंच की!  त्यांनी सरकारला लिहिलेल्या शेवटच्या पत्रांत लोकपाल व लोकायुक्तांच्या बिलात दुरुस्ती करून ते कमकुवत केल्याचा ठपका ठेवला होता. त्याअगोदरच्या पत्रात सरकार आपल्या कोणत्याच पत्राची दखल घेत नाही, असं त्यांनी म्हटलं होतं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात अण्णांना आदर्श राजकारणी दिसतो. तसं त्यांनी एकदा म्हटलंही होतं; परंतु मागं फडणवीस यांनाही मर्यादा असल्यानं ते निर्णय घेत नाहीत, अशी व्यथाही त्यांनी व्यक्त केली होती. नंतर त्यांनी फडणवीस यांच्यावरही एकदा टीका केली होती. सरकारनं लोकायुक्त व लोकपाल नियुक्तीसाठी समिती नेमण्याचा निर्णय घेतल्यानंतर दुसर्‍याच दिवशी अण्णांनी याच सरकारवर कृतघ्न असल्याची टीका करणारं पत्र लिहिलं होतं. एकीकडं केंद्र सरकारच्या तीनही कृषी कायद्याविरोधात शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. अशा वेळी किमान हमी भावासह अन्य मुद्यांवर अण्णांनी आंदोलन करण्याचा इशारा दिला होता.

तीस तारखेपासून त्यांनी उपोषण करण्याचं ठरविलं होतं.

आंदोलन करायचं की नाही, ते करायचं नसेल, तर का नाही, हे सर्व ठरविण्याचा अधिकार अण्णांना आहे. कुठपर्यंत ताणायचं आणि का ताणायचं, हे त्यांना कळत नसेल, असं नाही; परंतु पदरात काय पडलं, याचा तरी विचार करायला हवा. पदरात काही पडलं नसताना आंदोलन मागं घेणं हे आंदोलनाचं ही नुकसानच आहे. मागच्या आंदोलनाला अपेक्षित यश का मिळालं नाही, त्याची कारणं अशा प्रकारच्या धरसोड निर्णयात असतात, हे अण्णांना समजायला हवं. डॉ. स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणीबाबत सरकारचं धोरण किती उदासीन आहे, हे अण्णांना माहीत नाही, असं थोडंच आहे. डॉ. स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी करता येणार नाही, असं प्रतिज्ञापत्र सरकारनंच सर्वोच्च न्यायालयात दाखल केलं होतं. त्यानंतर अर्थमंत्री अरुण जेटली यांनी अर्थसंकल्पात डॉ. स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी सुरू झाल्याची घोषणा केली. उत्पादनखर्चाच्या दीडपट हमीभाव मिळतो, असं सरकारमधील अनेक लोक सांगतात. कांद्याचा उत्पादनखर्च सरकारच्या अहवालानुसार नऊ रुपये आहे आणि कांद्याला सरासरी भाव आहे चार ते सहा रुपये! टोमॅटोला एक रुपयाही भाव न मिळाल्यानं शेतकर्‍यांनी टोमॅटो रस्त्यावर फेकले. काही शेतकर्‍यांनी तर पाच-सहा एकर क्षेत्रातील उभ्या पिकांत जनावरं घातली. शेतकर्‍यांना हमीभाव दिला नाही, तर व्यापार्‍यांवर फौजदारी कारवाई करण्याचा निर्णय सरकारनं स्थगित ठेवला. व्यापार्‍यांच्या दबावाला सरकार बळी पडलं. मुगाला सहा हजार 975 रुपये हमीभाव असताना बाजारात साडेतीन ते चार हजार रुपये दरानं मूग खरेदी चालू आहे. अन्य पिकांची परिस्थिती फारशी वेगळी नाही. हमीभावापेक्षा कमी भाव झाले, तर बाजारात हस्तक्षेप करून खरेदीसाठी पाचशे कोटी रुपयांचा कोष सरकारनं तयार केला; परंतु त्याचा वापर केल्याचं ऐकिवात नाही. अण्णांनी सरकारला लिहिलेल्या पत्रातही राज्य कृषिमूल्य आयोगाच्या शिफारशी आणि प्रत्यक्ष शेतकर्‍यांना मिळत असलेला भाव यात मोठी तफावत असून शेतकर्‍यांच्या आत्महत्येमागं हेच कारण आहे आणि कृषिमूल्य आयोगाला स्वायत्ता देण्याची त्यांची प्रमुख मागणी आहे.

शेती आतबट्याची झाली आहे. अण्णा स्वतः उत्पादनखर्चाच्या दीडपट हमीभाव मिळण्याबाबत आग्रही होते. दीडपट जाऊ द्या; उत्पादनखर्चाइतका भाव मिळाला, तरी शेतकरी दुवा देतील; परंतु तसं नसतानाही सरकारच्या आश्‍वासनांना भुलून त्यांनी आंदोलन मागं घेतलं. ते ही दिल्लीत शेतकर्‍यांवर लाठीमार होत असताना! हरयाणा, उत्तर प्रदेश, कर्नाटक, पंजाब तसंच अन्य राज्यांतील शेतकरी हमीभावातही कशी फसवणूक होत आहे, हे सांगत असताना अण्णांनी सरकारवर विश्‍वास ठेवावा, याला काय म्हणावं? राज्याच्या कृषीमूल्य आयोगानं पाठविलेल्या उत्पादनखर्चात केंद्रीय कृषिमूल्य आयोग कसा बदल करतो, याचं पत्र अण्णांनीच केंद्र सरकारला दिलं होतं. उत्पादनखर्चाचे आकडेच सरकार चुकीचं धरतं आणि त्यावर हमीभाव ठरविले जातात. कृषिमूल्य आयोगाला निवडणूक आयोगासारखी स्वायत्ता देण्याची मागणी अण्णांनीच केली आहे. अण्णांनी ठिबक व तुषार सिंचनाचा जीएसटी 12 टक्क्यांवरून पाच टक्के करण्याची मागणी केली आहे; परंतु कृषिमूल्य आयोगानंच ऊस व अन्य पिकांसाठी ठिबक सिंचन बसविणार्‍या शेतकर्‍यांना 75 टक्के अनुदान देण्याची शिफारस करून सात वर्षे झाली, तरी त्याची सरकार दखल घ्यायला तयार नाही. केवळ काही मागण्या मान्य होण्यावर आंदोलन मागं घ्यायचं होतं, तर इतकी वातावरण निर्मिती आणि सरकारवर जहरी टीका करण्याची काहीच आवश्यकता नव्हती. सर्व मागण्या पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत कोणत्याही परिस्थितीत आंदोलन मागं घेणार नाही, असं सांगणारे अण्णा बहुतांश मागण्या पूर्ण झालेल्या आहेत आणि काही पूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत,’ या आश्‍वासनाला भुलले. गेल्या आठवड्यात आपल्या पत्रांना सरकार केराची टोपली दाखवित असल्याची भावना व्यक्त करणारे अण्णा सरकारच्या पत्रावर लगेच विश्‍वास ठेवायला तयार झाले, हेच आश्‍चर्य आहे. 


Name

] ब्रेकिंग,862,Agralekh,3,desh,2,IPL 2020,19,kolhapur,5,Latest News,5780,letest News,599,Loksabha-2019,164,Maharashtra,211,Maharashtra.,2,Mumbai,42,New Window,210,News,320,sangli,40,satara,156,satara.,4,solapur,1,updates,453,Videsh,2,Vishesh,2,अर्थ,173,अहमदनगर,10381,औरंगाबाद,366,क्रीडा,678,दखल,710,देश,4457,नाशिक,805,पुणे,753,बीड,1438,बुलडाणा,29,बुलढाणा,878,ब्रेकिंग,16545,ब्रेकिंग न्युज,117,मनोरंजन,166,महाराष्ट्र,13791,महाराष्ट्र सातारा,42,मुंबई,3740,विदेश,655,संपादकी,2,संपादकीय,1560,सातारा,3202,
ltr
item
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: अण्णांची माघार : प्रश्‍न उपस्थित करणारी
अण्णांची माघार : प्रश्‍न उपस्थित करणारी
https://1.bp.blogspot.com/-lgVJPyezin4/YBVYVAT4LSI/AAAAAAABnvM/fXWUWV80kREK6MJjODwayHErOrGe82u0wCLcBGAsYHQ/s320/777.png
https://1.bp.blogspot.com/-lgVJPyezin4/YBVYVAT4LSI/AAAAAAABnvM/fXWUWV80kREK6MJjODwayHErOrGe82u0wCLcBGAsYHQ/s72-c/777.png
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates
https://www.lokmanthan.com/2021/01/blog-post_986.html
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/2021/01/blog-post_986.html
true
1708963956808886337
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content