मुंबई : भारतात तयार झालेली कोरोनाची लस ब्राझील आणि मोरक्कोत पोहोचली. शुक्रवारी सकाळी ही लस भारतातून मुंबई विमानतळाहून ब्राझील आणि मोरक्कोच्य...
मुंबई : भारतात तयार झालेली कोरोनाची लस ब्राझील आणि मोरक्कोत पोहोचली. शुक्रवारी सकाळी ही लस भारतातून मुंबई विमानतळाहून ब्राझील आणि मोरक्कोच्या दिशेने रवाना झाली.लस मिळताच ब्राझीलचे राष्ट्रपती जैर एम बोलसोनारोने यांनी ट्विट करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत. यासोबतच त्यांनी हनुमानाचा फोटो शेअर करून धन्यवाद भारत असे म्हटले आहे. जैर एम बोलसोनारोने ट्विटरद्वारे म्हणाले की, ''नमस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी. अशा बिकट काळात तुम्ही दिलेला मदतीचा हात खूप मोलाचा आहे. तुम्ही केलेल्या मदतीबद्दल धन्यवाद. दरम्यान भारतातून भूटान, मालदीव, बांग्लादेश, नेपाळ, म्यानमार आणि सेशेल्सला ही कोविडची लस पाठवण्यात आली आहे.