नवी दिल्ली : भारतीय संघाचा फलंदाज आणि यष्टीरक्षक के एल राहुलला दुखापत झाल्याने तो ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या उर्वरित दोन कसोटी सामने खेळू शकणार ...
नवी दिल्ली : भारतीय संघाचा फलंदाज आणि यष्टीरक्षक के एल राहुलला दुखापत झाल्याने तो ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या उर्वरित दोन कसोटी सामने खेळू शकणार नाही. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात 'बीसीसीआय'ने आज सकाळी ट्विट करत के एल राहुलच्या दुखापतीसंबंधी माहिती दिली. शनिवारी मेलबर्न क्रिकेट मैदानावर सराव करत असताना के एल राहुलच्या डाव्या हाताच्या मनगटाला दुखापत झाली. दुखापतीतून पूर्ण बरे होण्यासाठी त्याला तीन आठवड्यांचा वेळ लागणार आहे. त्यामुळे तो बॉर्डर-गावसकर ट्रॉफीच्या उर्वरित दोन कसोटी सामन्यांसाठी उपलब्ध नसणार असल्याची माहिती बीसीसीआयने दिली आहे. के राहुल लवकरच भारतात परतणार असून बंगळुरुमधील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत उपस्थित राहणार असल्याची माहितीही बीसीसीआयने दिली आहे.