मुंबई : हिवाळी अधिवेशन रद्द केल्यामुळे विदर्भातील अनेक प्रश्न, विकासकामे प्रलंबित आहे. विदर्भाचा अनुशेष भरून काढण्यासाठी विदर्भात अर्थसंकल्प...
मुंबई : हिवाळी अधिवेशन रद्द केल्यामुळे विदर्भातील अनेक प्रश्न, विकासकामे प्रलंबित आहे. विदर्भाचा अनुशेष भरून काढण्यासाठी विदर्भात अर्थसंकल्पीय अधिवेशन घेण्याची मागणी ऊर्जामंत्री आणि काँग्रेसचे नेते डॉ . नितीन राऊत यांनी केली आहे. विदर्भातील प्रश्नांना सोडविण्यासाठी आणि विदर्भातील विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी नागपूर येथे अधिवेशन होणे खूप गरजेचे आहे. त्यामुळे आगामी अर्थसंकल्पी अधिवेशन नागपुरात आयोजित करण्यात यावे," अशी मागणी ऊर्जामंत्री राऊत यांनी केली.