नवी दिल्ली : तुम्ही जर बँकेत पैसे काढायला जात असाल तर पैसे हातात घेतल्यावरच ते आधी नीट तपासून पाहा. तुमच्या हातात नकली नोटा येऊ शकतात. कें...
नवी दिल्ली : तुम्ही जर बँकेत पैसे काढायला जात असाल तर पैसे हातात घेतल्यावरच ते आधी नीट तपासून पाहा. तुमच्या हातात नकली नोटा येऊ शकतात. केंद्र सरकारची काळा पैशांविरोधातील कारवाई तसेच नोटबंदीच्या निर्णयामुळे नकली नोटांचा धोका आणखीनच वाढला आहे. अहमदाबादेतील 11 बँकांवरील कारवाईतून हे धक्कादायक वास्तव पुढे आले आहे. या बँकांमधून तब्बल 6 लाख 75 हजारांहून अधिक नकली नोटा जप्त करण्यात आल्या. यात 500, 200 आणि 2000 रुपयांच्या नकली नोटा होत्या.