संवर्धनासाठी मावळ्यांबरोबर शिवकन्या पाटण / प्रतिनिधी : 19 फेब्रुवारी रोजी साजरी होणार्या शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर पाटण (टोळेवाडी...
संवर्धनासाठी मावळ्यांबरोबर शिवकन्या
पाटण / प्रतिनिधी : 19 फेब्रुवारी रोजी साजरी होणार्या शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर पाटण (टोळेवाडी) येथील सुंदरगडावर (दातेगड) शिवमावळे आणि शिवकन्या यांचे श्रमदान व संवर्धनाचे कार्य जोमाने सुरु झाले असून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेच्या प्रतिस्थापना जागेच्या संवर्धनासाठी लगबग सुरु झाली आहे. शनिवार व रविवार हे सुट्टीचे दिवस या शिवमावळ्यांनी सुंदरगडावर संवर्धनकार्यासाठी सतकर्मी लावले. शुक्रवार, दि. 19 फेब्रुवारी रोजी होणारी छत्रपती शिवजयंती सुंदरगडावर साध्या पध्दतीने कोरोना नियमांचे पालन करून होणार असल्याचे सुंदरगड संवर्धन समीतीच्या मावळ्यांनी सांगितले.
गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी पाया रचलेल्या सुंदरगडावर संवर्धनाचे कार्य गेले कित्येक वर्षे छत्रपती शिवमावळ्यांच्या श्रमदानातून सुरू आहे. या श्रमदानातून सुंदरगडाची किर्ती महाराष्ट्राच्या कानाकोपर्यात पोहचली आहे. पर्यटन दृष्ट्या नावारुपास आलेल्या सुंदरगडावर शिवमावळ्यांचे श्रमदानातून संवर्धनाचे कार्य सतत सुरु असते. 19 फेब्रुवारीला होणार्या शिवजयंतीची पुर्व तयारी शिवमावळे आणि शिवकन्यांनी सुरु केली आहे. शनिवार व रविवार हे सुट्टीचे दिवस या मावळ्यांनी सुंदरगडावर शिवजयंतीच्या पूर्व तयारीसाठी संवर्धन केले. या संवर्धन कार्यासाठी सुंदरगड संवर्धन समितीचे मनोहर यादव, शंकर मोहिते, लक्ष्मण चव्हाण, सुभाष कुंभार, यांच्यासह शिवकन्या शुभांगी पाटील, ऋतुजा चव्हाण, अनुजा डांगे, प्रियंका पाटील, गिता सुतार, शिल्पा कदम, शिवमावळे रोहित पवार, गणेश देसाई, अर्जुन पवार, सुरेश मोरे, राकेश राठोड, रोहित माने, मंदार डांगे, जय पाटील, रोहित जाधव, सुशांत कुंभार, रविराज पवार हे परिश्रम घेत आहेत .