$type=ticker$snippet=hide$cate=0

अन्नप्रक्रियेच्या 20 प्रकल्पांना मंजुरी

  नवी दिल्ली : प्रधानमंत्री किसान संपदा योजनेअंतर्गत 20 अन्न प्रक्रियेशी संबधित प्रकल्पांना आज मंजुरी देण्यात आली आहे. यामध्ये 363 कोटींची ग...

 




नवी दिल्ली : प्रधानमंत्री किसान संपदा योजनेअंतर्गत 20 अन्न प्रक्रियेशी संबधित प्रकल्पांना आज मंजुरी देण्यात आली आहे. यामध्ये 363 कोटींची गुंतवणूक होणार असून 12 हजार रोजगार उपलब्ध होणार आहेत. या प्रकल्पांचा आठ राज्यांमधील जवळपास 42 हजार शेतकर्‍यांना फायदा होईल, असे सरकारने म्हटले आहे. 

    प्रधानमंत्री किसान संपदा योजना (पीएमकेएसवाय) अंतर्गत अन्न प्रक्रिया आणि संरक्षण क्षमतांची निर्मिती/ विस्तार (सीईएफपीपीसी) तसेच अ‍ॅग्रो-प्रोसेसिंग क्लस्टर (एपीसी) साठी पायाभूत सुविधा निर्माण करण्याच्या योजनेंतर्गत आलेल्या प्रस्तावांचा विचार करण्यासाठी केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांच्या अध्यक्षतेखाली दोन आंतर-मंत्रालयीय मंजुरी समितीची (आयएमएसी) नुकताच बैठक झाली. राज्यमंत्री रामेश्‍वर तेली हेही बैठकीस उपस्थित होते. हिमाचल प्रदेश, मणिपूर, अरुणाचल प्रदेश, महाराष्ट्र, पश्‍चिम बंगाल, कर्नाटक, मिझोरम आणि गुजरात राज्यात 36.30 कोटी रुपये अनुदान सहाय्यासह 113.08 कोटी रुपयांच्या एकूण प्रकल्प खर्चासह 11 प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत. या प्रकल्पांद्वारे 76.78 कोटी रुपयांची खासगी गुंतवणूक होणार असून 3700 लोकांना रोजगार मिळेल, तर सहा हजार आठशे शेतकर्‍यांना फायदा होणार आहे. पीएमकेएसवाय अंतर्गत कृषी खाद्य उत्पादनांची प्रक्रिया, संवर्धन आणि अन्न प्रक्रियेचे आधुनिकीकरण, क्षमता वाढविण्यासाठी या योजनेस मंजुरी देण्यात आली. यामुळे प्रक्रियेची पातळी उंचावण्यात आणि मूल्यवर्धनात मदत होईल, ज्यायोगे कृषी उत्पादनांचा अपव्यय कमी होईल. मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्र, अरुणाचल प्रदेश, आसाम आणि राजस्थान या राज्यांमध्ये 66.61 कोटी रुपये अनुदान सहाय्यासह 250.32 कोटी रुपयांच्या एकूण प्रकल्प खर्चासह नऊ प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत. या प्रकल्पांद्वारे 183.71 कोटी रुपयांची खासगी गुंतवणूक होणार असून आठ हजार 260 रोजगार उपलब्ध होतील आणि 36 हजार शेतकर्‍यांना फायदा होण्याचा अंदाज सरकारने व्यक्त केला आहे. उद्योजकांना क्लस्टर पद्धतीवर आधारित अन्न प्रक्रिया उद्योगांची स्थापना करण्यास प्रोत्साहित करण्यासाठी एपीसीसाठी पायाभूत सुविधा निर्माण करण्याच्या योजनेस पीएमकेएसवाय अंतर्गत मान्यता देण्यात आली होती.

Name

] ब्रेकिंग,861,Agralekh,3,desh,2,IPL 2020,19,kolhapur,4,Latest News,5776,letest News,598,Loksabha-2019,164,Maharashtra,208,Maharashtra.,2,Mumbai,42,New Window,210,News,320,sangli,40,satara,153,satara.,4,updates,453,Videsh,2,Vishesh,2,अर्थ,173,अहमदनगर,10358,औरंगाबाद,366,क्रीडा,678,दखल,709,देश,4454,नाशिक,805,पुणे,751,बीड,1438,बुलडाणा,27,बुलढाणा,877,ब्रेकिंग,16509,ब्रेकिंग न्युज,117,मनोरंजन,166,महाराष्ट्र,13753,महाराष्ट्र सातारा,41,मुंबई,3731,विदेश,653,संपादकी,2,संपादकीय,1558,सातारा,3202,
ltr
item
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: अन्नप्रक्रियेच्या 20 प्रकल्पांना मंजुरी
अन्नप्रक्रियेच्या 20 प्रकल्पांना मंजुरी
https://i1.wp.com/www.dainikprabhat.com/wp-content/uploads/2021/02/food-processing.jpg?fit=569%2C325&ssl=1
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates
https://www.lokmanthan.com/2021/02/20_18.html
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/2021/02/20_18.html
true
1708963956808886337
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content