$type=ticker$snippet=hide$cate=0

काँग्रेसमध्ये जी-23 चे पुन्हा बंड ; काश्मीरमध्ये एकत्र जमून पक्षश्रेष्ठींविषयी जाहीर नाराजी

जम्मूः ऑगस्ट महिन्यामध्ये काँग्रेस नेतृत्वाविरोधात उघडपणे नाराजी व्यक्त करणारे जी-23 समूहातील काही नेते पुन्हा एकदा जम्मूमध्ये एकाच मंचावर आ...

जम्मूः ऑगस्ट महिन्यामध्ये काँग्रेस नेतृत्वाविरोधात उघडपणे नाराजी व्यक्त करणारे जी-23 समूहातील काही नेते पुन्हा एकदा जम्मूमध्ये एकाच मंचावर आले. शनिवारी आयोजित करण्यात आलेल्या शांति संम्मेलनामध्ये पक्षाचे वरिष्ठ नेते गुलाम नबी आझाद, कपिल सिब्बल यांच्यासहीत अनेक बड्या नेत्यांनी पक्षासंदर्भातील नाराजी उघडपणे व्यक्त केली. या संमेलनामधील भाषणे आणि नाराजी पाहता जी-23 मधील नेत्यांनी पुन्हा एकदा सोनिया आणि राहुल गांधी यांच्याविरोधात नाराजीचा सूर आळवला आहे. माजी खासदार गुलाम नबी आझाद यांना पक्षश्रेष्ठींनी दिलेल्या वागणुकीबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली. 


या सर्व नेत्यांनी मागील वर्षी ऑगस्ट महिन्यात झालेल्या काँग्रेसच्या बैठकीमध्ये तत्काळ निर्णय घेण्याची आणि पक्षाची संघटनात्मक बांधणी करण्याची मागणी केली होती. जम्मूमध्ये आयोजित शांती संमेलनामध्ये आनंद शर्मा, मनीष तिवारी, हरयाणाचे माजी मुख्यमंत्री भूपिंदर सिंह हुड्डा, विवेक तन्खा आणि राज बब्बर यासारख्या वरिष्ठ नेत्यांनी हजेरी लावली. आम्ही काँग्रेसचे आहोत, की नाही हे आम्हाला कोणी सांगू शकत नाही, असे शर्मा यांनी स्पष्ट केले. जे काँग्रेसमध्ये आहेत ते महात्मा गांधीच्या विचारांचा आदर करतात. अशा लोकांमध्ये खरे बोलण्याची हिंमत नसेल असे कसे होईल, असा प्रश्‍न त्यांनी विचारला. मागील एका दशकामध्ये काँग्रेस कमकुवत झाली आहे. जसे जसे आमचे वय वाढत जाईल, तशी काँग्रेस आणखी कमकुवत व्हावी असे चित्र दिसून नये असे आम्हाला वाटते. आमच्यापैकी कोणीही थेट वरुन आलेले नाही किंवा दारे, खिडक्यांमधून आलेले नाही. आम्ही विद्यार्थी आंदोलनामधून पुढे आलो आहोत. आम्ही काँग्रेसी आहोत, की नाही हे सांगण्याचा अधिकार आम्ही कोणालाही दिलेला नाही, अशा शब्दांमध्ये शर्मा यांनी विरोधी विचारसरणीच्या काँग्रेस नेत्यांवर टीका करणार्‍यांना सुनावले. या वेळी कपिल सिब्बल यांनी, मला कळत नाही, की काँग्रेस पक्ष गुलाम नबी आझाद यांच्या अनुभवाचा उपयोग का करत नाही, असा सवाल करीत त्यांना पुन्हा राज्यसभेतच संधी न देण्याच्या काँग्रेसच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली. राज बब्बर म्हणाले, की जी-23; पण मी म्हणेल की गांधी 23. जी-23 काँग्रेसच्या भल्याचा विचार करत आहे. आझाद यांचा राजकीय प्रवास अजून पूर्ण झालेला नाही. आझाद यांनी, आज अनेक वर्षानंतर मी राज्याचा भाग नाही. आपली ओळख संपली आहे. राज्य हा दर्जा परत मिळवण्यासाठी आमचा संसदेबाहेर आणि संसदेमध्ये संघर्ष सुरू राहील. जोपर्यंत येथून निवडून आलेले लोक मंत्री किंवा मुख्यमंत्री नाही होत, तोपर्यंत बेरोजगारी, रस्ते, शाळा यांची हीच परिस्थिती राहणार आहे, असे म्हटले. मी राज्यसभेमधून निवृत्त झालो आहे, राजकारणामधून नाही. मी संसदेमधून पहिल्यांदाच निवृत्त झालेलो नाही, असे म्हणत आझाद यांनी सर्व पर्याय खुले असल्याचे संकेत दिले. 



हार्दिक पटेलनेही उपटले कान

गुजरातमध्ये चालवलेली धोरणे आणि निर्णयपद्धती यावर हार्दिक पटेलने कडाडून टीका केली आहे. हार्दिकने आपल्याच पक्षाचे कान उपटले आहेत. काँग्रेस पक्षाच्या धोरणावर बोलताना हार्दिकने तिखट शब्दांमध्ये टीका केली. गुजरातमध्ये माझे सातत्याने दौरे सुरू आहेत; पण माझा एकही दौरा गुजरात प्रदेश काँग्रेसने नियोजित केलेला नाही. मी स्वत:च सगळे करतो आहे. कारण मला पक्ष प्रबळ करायचा आहे. काँग्रेसच्या इतर नेत्यांना मला खाली खेचायचे असेल. त्यांनी ते खुशाल करावे; पण मी पुन्हा उठेन आणि कामाला लागेन, असे हार्दिक म्हणाला. काँग्रेसमध्ये आलो, तेव्हा वाटले होते पक्ष माझा चांगला वापर करून घेईल; पण तिथेही राज्यातील काँग्रेसचे प्रमुख अपयशी ठरले आहेत, अशी टीका त्याने केली.


Name

] ब्रेकिंग,8,] ब्रेकिंग,878,Agralekh,3,baramati,2,desh,2,IPL 2020,19,kolhapur,9,Latest News,6013,Latest News Maharashtra sangli,2,Latest News Maharashtra satara,4,Latest News Maharashtra sangli,1,Latest News Maharashtra satara,4,letest News,607,Loksabha delhi,1,Loksabha-2019,164,Maharashtra,446,Maharashtra.,5,Mumbai,42,New Window,210,News,321,sangli,95,satara,325,satara.,9,solapur,2,solapur pandharpur,1,updates,453,Videsh,2,Vishesh,2,अर्थ,208,अहमदनगर,11150,औरंगाबाद,380,क्रीडा,681,दखल,771,देश,4642,नाशिक,836,पुणे,917,बीड,1452,बुलडाणा,46,बुलढाणा,878,ब्रेकिंग,17898,ब्रेकिंग Latest News Maharashtra satara,3,ब्रेकिंग न्युज,122,ब्रेकिंग महाराष्ट्र,1,मनोरंजन,180,महाराष्ट्र,15277,महाराष्ट्र सातारा,44,मुंबई,4307,विदेश,666,संपादकी,2,संपादकीय,1690,सातारा,3223,
ltr
item
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: काँग्रेसमध्ये जी-23 चे पुन्हा बंड ; काश्मीरमध्ये एकत्र जमून पक्षश्रेष्ठींविषयी जाहीर नाराजी
काँग्रेसमध्ये जी-23 चे पुन्हा बंड ; काश्मीरमध्ये एकत्र जमून पक्षश्रेष्ठींविषयी जाहीर नाराजी
https://ichef.bbci.co.uk/news/640/cpsprodpb/102EA/production/_114028266_89a0ef90-4bef-40ac-b751-168f126ca75b.jpg
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates
https://www.lokmanthan.com/2021/02/23.html
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/2021/02/23.html
true
1708963956808886337
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content