इस्लामपूर / प्रतिनिधी : येथील कामेरी तुजारपूर रस्त्या लगतच्या राजाराम बापू व कृष्णा सहकारी साखर कारखान्याला नोंदणी असणारा 20 ते 25 एकर ऊसाल...
इस्लामपूर / प्रतिनिधी : येथील कामेरी तुजारपूर रस्त्या लगतच्या राजाराम बापू व कृष्णा सहकारी साखर कारखान्याला नोंदणी असणारा 20 ते 25 एकर ऊसाला सोमवार, दि. 8 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 च्या सुमारास आग लागल्याने 1 ते 12 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज तलाठी व साखर कारखाना ऊसतोडणी कार्यकडून व्यक्त केला गेला आहे.
परिसरातील शेतकरी ही आग वीजेच्या शॉर्टसर्किटने लागल्याचे सांगत असले तरी वीज वितरण कंपनीच्या कामेरी कार्यालयातील कनिष्ठ शाखा अभियंता जितेंद्र पाटील यांनी हे साफ चुकीचे असल्याचे सांगितले. इस्लामपूर येथील ट्रान्सफॉर्मर दुरुस्तीसाठी विद्युत पुरवठा बंद असल्याने शॉर्टसर्किटने आग लागण्याचा प्रश्न येत नसल्याचे सांगितले.
कामेरी येथील पांढरी परिसरातील सुदर्शन पाटील, कापशे, माली, मदने मळ्यातील 15 ते 20 शेतकर्यांचा 20 ते 25 एकर ऊस या आगीमध्ये पूर्ण जळाल्याने शेतकर्यांचे अंदाजे 12 ते 15 लाख रुपयांचे नुकसान झाले असावे, असा अंदाज तलाठी रामेश्वर शिंदे यांनी मंडल अधिकारी मनोहर पाटील यांचे आदेशानुसार पंचनामा केल्यानंतर सांगितले.
11:30 च्या सुमारास सुदर्शन पाटील, श्रीकांत पाटील, प्रदीप पाटील, मुकुंद माळी यांनी या आगीबाबतची माहिती कोतवाल आनंदराव ठोंबरे याना दिली. इस्लामपूर येथे अग्निशमन उपलब्ध होऊ न शकल्याने व विदुयत पुरवठा बँड असल्याने आगीने उग्र रूप धारण केले होते. मात्र, श्रीकांत पाटील व मुकुंद माळी यांच्या वस्तीवर आग राहत्या घराकडे येऊ लागली होती. त्यावेळी ग्रामस्थ व युवकांनी पाणीपुरवठा संस्थेच्या चेंबरमधून पाणी उपलब्ध करून आग विझवली. त्यामुळे मोठे नुकसान टाळण्यासाठी मदत झाली. राजाराम बापू व कृष्णा कारखाना ऊस तोडणी कार्यालयात शेतकर्यांनी आपल्या जळीत उसाची नोंद केली असून उद्या पासून या ऊसाची तोडणी सुरू करण्याचा प्रयत्न करू असे शेतकर्यांना सांगण्यात आले.