वर्धा : वर्धा येथील उत्तम गलवा कंपनीत बुधवारी पहाटे 5.30 वाजता भीषण स्फोट झाला. या अपघातात कंपनी काम करणारे 35 मजूर होरपळले आहेत. त्यापैकी ...
वर्धा : वर्धा येथील उत्तम गलवा कंपनीत बुधवारी पहाटे 5.30 वाजता भीषण स्फोट झाला. या अपघातात कंपनी काम करणारे 35 मजूर होरपळले आहेत. त्यापैकी तीन जणांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना नगापुरातील ऑरेंज सिटी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. या स्फोटामागचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. ब्लास्ट फर्निशचा स्फोट झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. उत्तम गाल्वा कंपनीत झालेल्या स्फोटाची चौकशी कामगार अधिकाऱ्यांमार्फत करण्यात येईल, तसे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. चौकशीनंतर दोषींवर कारवाई करण्यात येईल, असे घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर जिल्हाधिकारी यांनी सांगितले.