$type=ticker$snippet=hide$cate=0

50 वर्षानंतर चरण गावाला बी. के. नायकवडी यांच्या माध्यमातून उपसभापतीपद

शिराळा / प्रतिनिधी : शेतकरी, कष्ठकरी व धरणग्रस्तासाठी सातत्याने संघर्ष करणार्‍या कार्यकर्त्याला तालुक्याचा उपसभापती पदाची जबाबदारी मिळाली आ...


शिराळा / प्रतिनिधी :
शेतकरी, कष्ठकरी व धरणग्रस्तासाठी सातत्याने संघर्ष करणार्‍या कार्यकर्त्याला तालुक्याचा उपसभापती पदाची जबाबदारी मिळाली आहे. त्याच्या माध्यमातून ते शेतकरी, कष्ठकरी व धरणग्रस्तांना न्याय देण्याचे काम करतील, असे प्रतिपादन आ. मानसिंगराव नाईक यांनी केले.

चरण (ता. शिराळा) येथील मुंबईस्थित गणेश मित्र मंडळ व चरण ग्रामस्थ यांच्या वतीने आयोजीत नायकवडी यांच्या नागरी सत्कार समारंभात बोलत होते. शेतकरी कामगार पक्षाचे भारत पाटील प्रमुख उपस्थित होते.

आमदार नाईक म्हणाले,  उपसभापती नायकवडी हे सर्वसामान्य लोकांना, शेतकार्‍यांना नाडणार्‍या भाजपच्या ध्येयधोरणावर हल्ला करून सर्वसामान्य माणसांना न्याय मिळवून देण्यासाठी सतत प्रयत्नशील आहेत. क्रांतिवीर स्व. नागनाथअण्णा नायकवडी यांच्या विचारांचे पाईक असणारे व कार्यतत्पर असणारे नेतृत्व सर्वसामान्य लोकांना हवे होते. जे लोकांना हवे तेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केले. त्यांच्या माध्यमातून तळागाळातील, शेतकरी, कष्टकरी, शेतमजूरांना न्याय मिळवून देण्यासाठी ते तळमळीने काम करतील.  

’शेकाप’चे कोल्हापूरचे भारत पाटील म्हणाले, आ. मानसिंगभाऊ यांनी चळवळीतील कार्यकर्त्याला प्रशासनात काम करण्याची संधी  दिली आहे. त्यामुळे त्या पदाची गुणवत्ता वाढवली आहे.

प्रारंभी आ. मानसिंग नाईक यांच्या हस्ते उपसभापतीपदी निवडीबद्दल नायकवडी यांचा सत्कार करण्यात आला. मुंबईस्थित गणेश मंडळ, आण्णाभाऊ साठे मंडळ, चरण ग्रामस्थ, ग्रामपंचायत, मुस्लिम बांधव, महिला मंडळ व अन्य विविध मंडळांनी नायकवडी यांचा नागरी सत्कार केला. यावेळी सूर्यकांत घोलप, श्रीरंग नायकवडी, ज्ञानदेव नायकवडी यांनी मनोगत व्यक्त केले. ’विश्‍वास’चे माजी संचालक रामचंद्र नायकवडी, शामराव नायकवडी, उपमहाराष्ट्र केसरी संपतराव जाधव, बाबुराव नेर्लेकर, पांडुरंग नेर्लेकर, माजी सरपंच सोनाली नायकवडी याच्यासह ग्रामस्थ, महिला, विविध संघटना मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार धर्मराज शिंगमोडे यांनी मानले सुत्रसंचालन किरण शिंदे यांनी केले. 

चरण येथील 1967 ते 1972 या कालावधीत विष्णू केरू नायकवडी यांना शिराळा पंचायत समितीच्या उपसभापतीपदी संधी मिळाली होती. त्यानंतर तब्बल 50 वर्षानंतर चरण गावाला बी. के. नायकवडी यांच्या माध्यमातून उपसभापतीपद मिळाले आहे.


Name

] ब्रेकिंग,858,Agralekh,3,desh,2,IPL 2020,19,kolhapur,3,Latest News,5741,letest News,597,Loksabha-2019,164,Maharashtra,190,Maharashtra.,2,Mumbai,42,New Window,210,News,319,sangli,31,satara,128,satara.,2,updates,453,Videsh,2,Vishesh,2,अर्थ,173,अहमदनगर,10277,औरंगाबाद,363,क्रीडा,678,दखल,700,देश,4420,नाशिक,802,पुणे,726,बीड,1435,बुलडाणा,23,बुलढाणा,876,ब्रेकिंग,16306,ब्रेकिंग न्युज,116,मनोरंजन,166,महाराष्ट्र,13529,महाराष्ट्र सातारा,41,मुंबई,3667,विदेश,650,संपादकीय,1540,सातारा,3197,
ltr
item
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: 50 वर्षानंतर चरण गावाला बी. के. नायकवडी यांच्या माध्यमातून उपसभापतीपद
50 वर्षानंतर चरण गावाला बी. के. नायकवडी यांच्या माध्यमातून उपसभापतीपद
https://1.bp.blogspot.com/--RzpEM2Bn38/YCD5M_4go_I/AAAAAAABoCc/5Og7Qklb7OYe4PYFb5z7Ba51-WIB8Mp6ACLcBGAsYHQ/s320/6-17.jpg
https://1.bp.blogspot.com/--RzpEM2Bn38/YCD5M_4go_I/AAAAAAABoCc/5Og7Qklb7OYe4PYFb5z7Ba51-WIB8Mp6ACLcBGAsYHQ/s72-c/6-17.jpg
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates
https://www.lokmanthan.com/2021/02/50.html
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/2021/02/50.html
true
1708963956808886337
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content