शिराळा / प्रतिनिधी : विश्वासराव नाईक सहकारी साखर कारखान्यातील मयत कर्मचार्यांच्या वारसांना विश्वास साखर कामगार संघटनेमार्फत प्रत्येकी 75 ...
शिराळा / प्रतिनिधी : विश्वासराव नाईक सहकारी साखर कारखान्यातील मयत कर्मचार्यांच्या वारसांना विश्वास साखर कामगार संघटनेमार्फत प्रत्येकी 75 हजार रुपये तातडीची मदत देण्यात आली. अध्यक्ष आ. मानसिंगराव नाईक यांनी मयत झालेले इंजिनिअरिंग विभागातील कर्मचारी जयसिंग यशवंत साळुंखे (चिखली), अकाऊंट विभागातील दत्तात्रय महादेव गायकवाड (फुफिरे), केनयार्ड विभागातील जगन्नाथ बापू विभूते (नाटोली) यांच्या वारसांना मदतीचे धनादेश सुपूर्द केले. यावेळी कामगार संचालक दत्तात्रय पाटील, संघटनेचे अध्यक्ष तानाजीराव साळुंखे, उपाध्यक्ष विजय पाटील, जनरल सेक्रेटरी विजय देशमुख आदी उपस्थित होते.